Mobile data saving tips : मोबाइल डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वापर करता येत नाही. अशातच पुन्हा डेटाचा रिचार्ज करावा लागतो. तर काही स्मार्टफोन युजर्सला वाटते की, डेटाचा अधिक वापर केला नाही तरीही तो संपला जातो. यावरच सोपा उपाय पाहणार आहोत. पुढील काही पाच सेटिंग्सच्या माध्यमातून तुम्ही संपणाऱ्या डेटाची बचत करू शकता.
बॅकग्राउंड अॅप बंद करा
काहीवेळेस फोनच्या बॅकग्राउंडला अॅप सुरु असतात. यामुळेही डेटा संपला जातो. अशातच फोनच्या डेटाची बचत होण्यासाठी फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन अॅप्लिकेशनवर क्लिक करा. यानंतर अशा अॅपवर क्लिक करा ज्याची अधिक गरज नाही. आता बॅकग्राउंड डेटाचा ऑप्शन मिळेल जो आधीपासून ऑन असेल तो ऑफ करा. यामुळे डेटाची बचत होऊ शकते.
ऑटो-अपडेट्स बंद करा
फोनमधील प्ले स्टोर अथवा अॅप स्टोरमध्ये जाऊन अॅप सेटिंग येथे जाऊन काही मोबाइल अॅप डेटाच्या माध्यमातून अपडेट होत आहेत की नाही हे तपासून पाहा. अशातच अॅप वायफायच्या माध्यमातून अपडेट होण्यासाठी ठेवा.
व्हॉट्सअॅप टिप्स
व्हॉट्सअॅप युजर्स अॅपमध्ये दिलेल्या कॉलिंग फीचरवेळी डेटाचा वापर केला जातो. पण यावेळीही डेटाची बचत केली जाऊ शकते. व्हॉट्सअॅपमधील फीचर Use Less Data For Calls चा ऑप्शन सुरु करा.
लोकेशन सर्विस बंद करा
फोनमधील सतत लोकेशन सर्विस ऑन असल्यास डेटा वेगाने संपला जाऊ शकतो. अशातच डेटाची बचत करण्यासाठी फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन हा ऑप्शन बंद करा. (Mobile data saving tips)
व्हिडीओ स्ट्रिमिंग सेटिंग्स
मोबाइल डेटाच्या माध्यमातून युट्यूब, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ अथवा नेटफ्लिक्स वापर असल्यास डेटा लवकर संपला जाऊ शकतो. यावेळी व्हिडीओ क्वालिटी कमी करुन पाहू शकता.