देशातील सायबर क्षेत्रात नवा मोबाईल बँकिंग वायरस पसरत आहे. नागरिकांना टार्गेट करत असलेला हा मोबाईल बँकिंग ट्रोजन वायरस सोवा एक रॅसमवेयर असून जो अॅन्ड्रॉइड फोनच्या फाइलचा नुकसान पोहचवू शकतो. तसेच अखेरीस संबंधित व्यक्तीची आर्थिक फसवणूक सुद्धा करु शकतो. एकदा मोबाईल मध्ये तो आल्यानंतर हटवणे सुद्धा फार मुश्किल आहे. देशभरात साइबर सुरक्षा एजेंसीने आपल्या नुकत्याच एका सुचनेत हे सांगितले आङे. भारतीय सायबर क्षेत्रात या वायरस संबंधित सर्वात प्रथम जुलै मध्ये शोध लागला होता. तेव्हापासून त्याचा पाचवे वर्जन आला आहे.(Mobile Banking Alert)
सीईआरटी-इन यांनी असे म्हटले की, संस्थांना असे सांगितले की भारतीय बँकांच्या द्वारे ग्राहकांना नव्या सोवा अॅन्ड्रॉइड ट्रोजनच्या माध्यमातून टार्गेट केले जात आहे. यामध्ये मोबाईल बँकिंग ग्राहकांना लक्ष्य केले जात आहे. या मालयवेयरचा पहिले वर्जन छुप्या पद्धतीने सप्टेंबर २०२१ मध्ये बाजारात विक्रीसाठी आला होता. तो लॉगिंगच्या माध्यमातून नाव आणि पासवर्ड, कुकीज चोरी करणे आणि अॅपला प्रभावित करण्यास सक्षम आहे. त्यांनी पुढे असे म्हटले की, हा मालवेयर प्रथम अमेरिका, रशिया आणि स्पेन सारख्या देशात अधिक सक्रिय होता. मात्र जुलैमध्ये त्याने भारतासह अन्य देशांना सुद्धा टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.

त्यानुसार या मालवेयर नवे वर्जन नागरिकांची फसवणूक करण्यासाठी बनावट अॅन्ड्रॉइड अॅपच्या सोबत लपवला जातो. त्यानंतर तो क्रोम, अॅमेझॉन, एनएफटी सारख्या लोकप्रिय अधिकृत अॅपमध्ये लोकांना दिसतो. याचे रुप अशा प्रकारे असते की, जसे लोकांनी हे अॅप इंस्टॉल केले तरीही त्यांना कळत नाही. सीईआरटी-इन सायबर हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी केंद्रीय तंत्रज्ञान युनिट तयार करण्यात आले आहे. याचे उद्दिष्ट फिशिंग आणि हॅकिंगसह ऑनलाइन मालवेयर वायरसच्या हल्ल्यांपासून इंटरनेटची सुरक्षा करणे आहे.(Mobile Banking Alert)
एजेंसीने असे ही म्हटले की, निर्मात्यांनी नुकत्याच तो बनवला असून त्याचे पाचवे वर्जन अपडेटेड आहे. या वर्जनमध्ये अॅन्ड्रॉइड फोनवर सर्व क्रमांक मिळवणे आणि त्याचा दुरुपयोग करण्याची क्षमता आहे. हा वायरस नागरिकांची संवेदनशील माहिती आणि सुरक्षितता धोक्यात टाकू शकतो. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. एजेंसीने याच्या बचावासाठी काही सल्ले दिले आहेत.
हे देखील वाचा- Instagram ला ३२ अरब रुपयांचा दंड, मुलांच्या खासगी डेटासह छेडछाड केल्याचा आरोप
तर मोबाईल बँकिंगचा वापर करणाऱ्या युजर्सने अॅप हा अधिकृत अॅप स्टोरच्या माध्यमातूनच डाउनलोड केला पाहिजे. त्याचसोबत अॅप डाउनलोड करताना त्याबद्दल रिव्हू सुद्धा वाचले पाहिजेत. युजर्सचे अनुभव, प्रतिक्रिया येथे सुद्धा लक्ष द्यावे. त्याचसोबत नियमित रुपात अॅन्ड्रॉइडच्या डिवाइससाठी आलेले अपडेट करावे आणि ईमेल किंवा मेसेच्या माध्यमातून फक्त विश्वासू लिंकवरच क्लिक करावा.