बॉलिवूड मधील जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची वेगळी ओळख करून द्यायला नको. अभिनेत्याने काही सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या फिल्मी करियरदरम्यान काही सुपरहिट सिनेमातील आपल्या भुमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये ‘मृगया’ मधून आपला बॉलिवूड मध्ये डेब्यू केला होता. यासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याच्या पुरस्कार देखील मिळाला होता. पाहता-पाहता मिथुन चक्रवर्ती मल्टी टॅलेंन्टेड अभिनेते होत गेले. जे अॅक्शन-ड्रामा आणि डांन्समध्ये अव्वल होते. नुकतेच ते एका टेलिव्हिजन शो च्या मंचावर आले होते. यावेळी अभिनेत्याने आपल्या खासगी आयुष्याबद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या. (Mithun Chakraborty)
मिथुन चक्रवर्तींनी शेअर केली आपली लव्ह स्टोरी
‘सा रे ग म पा’ मध्ये एका कंटेस्टेंटने ऐवढा भावनात्मक परफॉर्मेन्स दिला की चक्रवर्ती यांच्या डोळ्यात पाणी भरून आले. रिंकूचा परफॉर्मेन्स पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या लव्ह लाइफ बद्दल थोडेसे सांगितले. मिथुन यांनी असे म्हटले ते एका मुलीवर खुप प्रेम करायचे. परंतु त्यावेळी त्यांचे मोठे नाव आणि घरही व्यवस्थितीत नव्हते. यामुळे ती त्यांना सोडून गेली.
ब्रेकअप नंतर बदलले आयुष्य
पुढे त्यांनी असे म्हटले, तो माझ्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट काळ होता. त्यावेळी मला कळले नाही मी नक्की काय केले पाहिजे. मी प्रेमात बुडालो होतो आणि ती मला सोडून गेली होती. मी पूर्णपणे आतमधून निराश झालो होतो. त्याचवेळी माझे संपूर्ण आयुष्य बदलले गेले. मला खुप दिवस कळत नव्हते मी काय केले पाहिजे.
मिथुन यांनी केले 2 विवाह
मिथुन यांनी हिंदीच नव्हे तर बंगाली आणि उडिसा भाषेतील सिनेमांमध्ये देखील काम केले होते. मिथुन चक्रवर्तींनी एकेकाळी योगिता बालीला डेट केले होते. दोघांनी 1979 मध्ये लग्न केले. मिथुन चक्रवर्ती यांनी योगिता हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी हेलेना ल्यूक सोबत विवाह केला होता. पण या दोघांचा विवाह केवळ चार महिनेच टिकला आणि मोडला गेला.(Mithun Chakraborty)
कोण आहे योगिता
मिथुनच नव्हचे तर त्यांची दुसरी पत्नी योगिता देखील घटस्फोटित आहे. योगिता किशोर यांची तिसरी पत्नी होती. योगिता किशोर यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान होती. हे सर्व माहिती असूनही योगिताने किशोर सोबत लग्न केले होते. परंतु लग्नाच्या दोन वर्षानंतर एकमेकांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा-सरोज खानच्या नवऱ्याने मुलांना नाव देण्यास का दिला नकार?