Home » नवरा-बायकोच्या नात्यात फूट पाडण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी

नवरा-बायकोच्या नात्यात फूट पाडण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी

सध्या प्रत्येकाच्या हातात असलेला फोन आणि सोशल मीडिया यामुळे जरी जगातील कोपऱ्यात वसलेल्या माणसाशी नाते जोडता येत असले तरीही जवळचे संबंध दूरावले जात आहेत.

by Team Gajawaja
0 comment
Mistakes in relationship
Share

सध्या प्रत्येकाच्या हातात असलेला फोन आणि सोशल मीडिया यामुळे जरी जगातील कोपऱ्यात वसलेल्या माणसाशी नाते जोडता येत असले तरीही जवळचे संबंध दूरावले जात आहेत. सतत हातात असलेला मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. त्यामुळे जरा काही घडले तर त्याचे स्टेटस, फोटो सोशल मीडियात अपलोड केले जातात. परिणामी याचा कुठे ना कुठे तरी नात्यावर परिणाम होतो. अशातच तुम्ही वैवाहिक आयुष्य जगत असाल आणि नात्यासंबंधतीच्या काही गोष्टी सतत सोशल मीडियात पोस्ट करत असाल तर तसे करण्यापासून दूर रहा. याचा मानसिक परिणाम तुमच्यावर आणि पार्टनवर सुद्धा होऊ शकतो हे लक्षात घ्या. तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळे पार्टनरसोबत वाद होऊ शकतात आणि हेच कारण तुमच्या नात्यात फूट पडण्याचे ठरू शकते. (Mistakes in relationship)

एखाद्या गोष्टी सवय लागणे
जर तुम्हाला सोशल मीडिया, अल्कोहोल, ड्रग्ज, शॉपिंग किंवा जुगार अशा सवयी असतील तर तुमचे वैवाहिक आयुष्य डिस्टर्ब होऊ शकते. असे समोर आले आहे की, असे झाल्यास थर्ड पार्टी तुमच्या नात्यात अगदी सहज प्रवेश करू शकते आणि लग्नाच्या नात्यात फसवणूकीसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. ऐवढेच नव्हे तर जर तुम्ही दिवस रात्र फोनवरच असता तर हे कारण सुद्धा तुमचे लग्न मोडू शकते.

नात्यात संवाद नसणे
जर तुमच्यामधील संवादाला नेहमीच वादाचे वळण लागत असेल तर तुम्ही चुकीच्या नात्यात आहात असे संकेत दर्शवले जातात. त्यामुळे हेच योग्य ठरेल की, एकमेकांचे शांतपणे ऐकावे आणि चुकीच्या भाषेचा वापर पार्टनरसाठी करू नये. हे थोडं कठीण जाईल पण असे करणे फार महत्त्वाचे आहे.

पार्टनरला शत्रू समजणे
जर तुमचा दिवस उत्तम गेला नाही तर यामध्ये पार्टनरची काहीही चूक नाही. त्याच्याशी वाद घालण्याऐवजी तुम्ही प्रयत्न करा की, सेल्फ केअर करा. पार्टनरला आधीच सांगा की, तुमचा आजचा दिवस वाईट गेला आहे आणि तुम्हाला थोडावेळ स्पेस हवा आहे. (Mistakes in relationship)

दोघांमध्ये तिसरा येणे
नवरा-बायकोच्या वादात तिसऱ्या व्यक्तीने एन्ट्री केल्याने वाद अधिक वाढू शकता. समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकते. त्यामुळे पार्टनरशी शांतपणे बोला, एकमेकांना समजून घ्या.

हेही वाचा- पार्टनरचा तुमच्यावर विश्वास नाही? ‘या’ ट्रिक्स वापरा

लहान-लहान गोष्टीवरुन वाद घालणे
जर तुम्ही पार्टनरच्या लहान-लहान गोष्टी घेऊन त्यावरुन वाद घालत असाल तर तुमच्या नात्यात फूट पडू शकते. तुम्हाला तुमचे नाते टिकवायचे असेल तर नात्यात एकतर विश्वास असावा आणि दुसऱ्यावर अलंबून राहण्याची चूक कधीच करू नये.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.