आयुष्यात आपल्याला त्या गोष्टी मिळत नाही ज्या खरोखर आपल्याला हव्या असतात. यामुळे याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. ही एक मनोवैज्ञानिक समस्या आहे, ज्याला मिसिंग टाइल सिंड्रोम असे म्हटले जाते. सध्या बहुतांश लोक या समस्येचा सामना करत आहेत. आयुष्यात कितीही काही गोष्टी उत्तम चालू असतील. मात्र आपण अशाच गोष्टींकडे पाहतो ज्या आपल्याकडे नाहीत किंवा ज्यामुळे आपल्याला दु:ख होते. परंतु जे नाही त्याकडे दुर्लक्ष करुन जे आहे त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. (Missing Tile Syndrome)
मिसिंग टाइल सिंड्रोम म्हणजे नक्की काय?
काही लोकांकडे आयुष्यात सर्वकाही असते. तरीही ते एका गोष्टीवरुन त्रस्त राहतात, जी त्यांच्याकडे नाही. ती लहानशी गोष्ट नसल्याने आनंदाचे क्षण अनुभवताना समस्या येतात. मिसिंग टाइल सिंड्रोम एक मानसिक विकार आहे. जो आपला विचार आणि दृष्टीकोनाच्या माध्यमातून ठिक केला जाऊ शकतो.
यापासून कसे दूर व्हाल
-आभारी रहा
आपल्याकडे ज्या काही सुख-सुविधा आहेत त्याबद्दल विचार करा. त्यासाठी आभारी रहा. आपल्या आयुष्याच्या जगण्याचा अर्थ समजून घ्या. त्याचसोबत तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे पहा. आयुष्याला एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा.
स्पर्धेशी तुमची तुलना करू नका
सध्या स्पर्धात्मक जगात तुम्ही तुम्हाला हरवू नका. इतर लोक तुमच्याशी स्पर्धा करतील. मात्र तुमच्यातील वेगळेपण नेहमीच जपून ठेवा. कारण असे केले नाही तर तुम्ही चिडचिडे आणि स्वत:ला कमी लेखाल. (Missing Tile Syndrome)
दृष्टीकोन बदला
जी लोक मिसिंग टाइल सिंड्रोमचे शिकार होतात त्यांना प्रत्येक गोष्टीत काही ना काही कमतरता जाणवते. याच कारणास्तव हे ते आपल्या आनंदापासून दूर राहू लागतात. यासाठी गरजेचे आहे की, आपले विचार आणि एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. दुसऱ्यांना आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हेही वाचा- ‘या’ कारणास्तव मॅरेज काउंसिलरची गरज भासते
संतुष्ट रहा
आयुष्यात जे काही मिळाले आहे त्यासाठी संतुष्ट रहा. तुमच्याकडे अशाकाही गोष्टी असतील ज्या इतरांच्या आयुष्यात नसतील. आयुष्यात सर्व गोष्टी मिळाव्यात म्हणून कष्ट करतो. मात्र याच दरम्यान आपण आनंदाचे क्षण आणि महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा गमावून बसतो.
इतरांना आनंद द्या
मिसिंग टाइल सिंड्रोम पासून दूर राहण्यासाठी दुसऱ्यांसोबत तुमचा आनंद शेअर करा. यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की, जे तुम्हाला मिळाले आहे त्यात तुम्ही आनंदित आहात. आनंद शेअर केल्याने तो द्विगुणित होतो.