मेटा इंडियाचे डायरेक्टर आणि हेड ऑफ पार्टनरशिप मनीष चोपडा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप सारख्या बड्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची पॅरेंट कंपनीला अलविदा करण्याचे सत्र गेल्या काही काळापासून सुरुच आहे. नोव्हेंबर २०२२ नंतर कंपनी सोडणारे चोपडा हे चौथे सीनियर ऑफिसर आहेत. त्यांनी जानेवारी २०१९ मध्ये मेटाचा पदभार सांभाळला होता. पण आता त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय. राजीनामा देण्यासंदर्भातील घोषणा त्यांनी लिंक्डिइनवर केली. (Meta India)
त्यांनी असे म्हटले की, कंपनी मधून एक्झिटच्या प्रोसेससाठी पुढील काही आठवडे ते कार्यालयासाठी उपलब्ध असतील. या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या मेटाच्या प्रवासासाठी कंपनीचे आभार ही मानले.
मनीष चोपडा यांनी पुढे असे म्हटले की, फेसबकु, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या डेवलमेंट आणि ग्रोथसाठी मेटाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यासाठी मेटाचे आभार. तसेच देशभरातील क्रिएटर्स आणि बिझनेस यांच्या संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या टीमने आणि त्यांनी जे काम केले त्यावर त्यांना गर्व आहे. रिजाइन पोस्टमध्ये त्यांनी प्रत्येकाचे आभार मानले.
चोपडा यांनी मेटासह जगभरात झालेल्या नोकर कपातीचा सुद्धा उल्लेख केला. त्यांनी असे म्हटले की, प्रत्येक महिना हा प्रत्येकासाठी कठीण काळ होता. पण त्यांच्या टीमने कोणत्याही परवाह न करता एकमेकांची मदत केली. पुढे असे म्हणतात की, ते प्रोफेशनल लाइफमध्ये पुढील टप्प्याकडे जाऊ पाहत आहेत. येणाऱ्या काळात जे काही होईल त्याची माहिती मी देईन असे ही त्यांनी म्हटले.
मेटा इंडियाचे हेड संध्या देवनाथन यांनी चोपडा यांच्या योगदानासाठी आभार मानले. गेल्या वर्षात नोव्हेंबर नंतर मेटा सोडणारे ते चौथे सनियर अधिकारी आहेत. त्यांच्या आधी अजीत मोहन, राजीव अग्रवाल, अभिजित बोस यांनी सुद्धा एकामागून एक राजीनामा दिला होता.मेटा इंडियाचा पदभार सांभाळण्यापूर्वी मनीष चोपडा हे एका अॅपचे सीईओ आणि को-फाउंडर होते.पेटीएमने २०१७ मध्ये त्यांच्या कंपनीला खरेदी केले होते. या व्यतिरिक्त चोपडा हे ऑनलाईन कंपनीचा ब्रँन्ड Zovi चे को-फाउंडर सुद्धा होते. त्यांनी ९ वर्ष मायक्रोसॉफ्टमध्ये काम केलेय. २०१९ मध्ये मेटा इंडियात एन्ट्री केली. (Meta India)
हेही वाचा- iPhone लॉक असेल तरीही पाहू शकता युट्यूबचे व्हिडिओ
चोपडा यांनी अशावेळी राजीनामा दिला आहे ज्यावेळी कंपनीत कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले जात आहे. कंपनी कॉस्ट कटिंगसाठी सातत्याने कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. आतापर्यंत मेटामधून २१ हजार लोकांना बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला आहे.