मेट गाला २०२३ मध्ये स्टार्ससह जगातील नामांकित व्यक्ती एका अनोख्या अंदाजात दिसून आल्या. फॅशनधील या सर्वाधिक मोठ्या इवेंटमध्ये सेलेब्सने आपल्या ग्लॅमर आणि स्टाइलिश लूक्समुळे रेड कार्पेटवर आपली छाप सोडली. २०२३ मेट गालाची यंदाची थीम ही लेगरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी अशी ठेवण्यात आली होती. यावेळी रेड कार्पेटवर ईशा अंबानीने सुद्धा आपल्या ग्लॅमरस लूकने अनेकांची मनं जिंकली. (Met Gala 2023)
खरंतर ईशा अंबानी हिचा ड्रेसच नव्हे तर तिच्या हातात असलेली डॉल बॅगची सुद्धा जोरदार चर्चा झाली. ईशा अंबानीच्या हातातील बॅग ही अमेरिकन डिझाइनर प्रबल गुरुंग यांनी डिझाइन केली होती. क्रिस्टलने सजवलेल्या साडीत ईशा अधिकच सुंदर दिसत होती. पण बॅगचीच तिच्या लूकपेक्षा चर्चा झाली.
अधिकृत वेबसाइटनुसार याची किंमत जवळजवळ ३०५०० डॉलर म्हणजेच २४,९७,९५१.३० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तर ईशाने मेट गाला मध्ये जी काळ्या रंगाची साडी नेसली होती त्यावर सिल्वर क्रिस्टल आणि मोत्यांचे काम केले होते. तसेच साडीला ब्लॅक टेल सुद्धा जोडण्यात आली होती. ईशाच्या लूक बद्दल बोलायचे झाल्यास तर तिने मिनिमल मेकअप केला होता. गळ्यातील चोकर हा हिऱ्यंचा होता. ईशा यापूर्वी सुद्धा मेट गालाच्या रेट कार्पेरटवर दिसून आली होती. २०१७ आणि २०१९ मध्ये मेट गाला मध्ये तिने एन्ट्री घेत आपल्या स्टाइल आणि फॅशनेबल अंदाजाने सर्वांना आपल्या मोहात पाडले होते.
हे देखील वाचा- मेट गालामध्ये आलिया, प्रियंका आणि ईशाची चर्चा….
ईशा सोबत तिची बहिण श्लोका मेहता सुद्धा दिसून आली. दीयाने आपल्या वेस्टर्न लूकला इंडियन टच देण्यासाठी केसांची वेळी घातली होती. तसेच तिने हॉल्टर नेक असणारा ब्लॅक अॅन्ड ग्रीन लॉन्ग गाउन घातला होता. त्यामध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत होती. दीया मेहताच्या लूकची सुद्धा खुप चर्चा झाली. (Met Gala 2023)
मेट गाला नक्की काय आहे?
मेट गाला हा खरंतर एका कॉस्ट्युम कंपनीसाठी पैसे जमा करण्यासाठी एलेनोर लॅम्बर्ट यांच्याद्वारे एका इवेंटच्या रुपात सुरु करण्यात आला होत. तेव्हा पासून तो प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो. जेव्हा ‘डायना वेरलँन्डला कॉस्ट्युम इंस्टिट्युट’ च्या सल्लागार रुपात आणले तेव्हा या कार्यक्रमाने एक सांस्कृतिक बदल घडवला. मेट गालाच्या इवेंटला मेट्रोपॉलिटीन म्युझियम ऑफ आर्ट मध्ये बदलले गेले आणि यामध्ये एक गाला थीम ही जोडली गेली. आता वोगचे एडिटर अन्ना विंटोर गेस्ट लिस्ट आणि थीम पाहते. या इवेंटसाठी प्रत्येक वर्षी मेटसोबत मिळून काम करते. असे सुद्धा म्हटले जाते की, ती असे ठरवते की हाय प्रोफाइल पाहुणे कोणत्या डिझाइनरचे कपडे घालतात आणि कोणत्या गेस्ट्सला त्यासाठी निवडले जाते. खरंतर मेट गाला हा असा एक इवेंट आहे ज्याची रेड कार्पेट फॅशन ही संपूर्ण जगात चर्चेत असते.