महिला आपल्या आयुष्यात ब्रेक शिवाय एकाच वेळी विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतात. तर एखाद्याची आई, एखाद्याची पत्नी किंवा एक यशस्वी करियर वुमन या गोष्टींमध्ये बहुधा ती वारंवार आपली भुमिका व्यवस्थितीत सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. अशातच मानसिक तण, अशांतता, पूर्ण न झालेली झोप, डोके दुखणे अशा गोष्टी ही तिला सुद्धा सहन कराव्या लागत असल्या तरीही ती आपली कामे सुरळीत पार पाडते. परंतु काही वेळेस असे होते की, या सर्व गोष्टी महिलांच्या मानसिक तणावात अधिक भर घालतात. त्याचा थेट परिणाम त्यांच्या कामावर झाल्याचे ही काही वेळेस दिसते. मानसिक ताण सहन न झाल्यास त्यांची चिडचिड सुद्धा होते. तर धावपळीच्या आयुष्यात तुम्हाला ही मानसिक थकवा दूर करायचा असेल तर पुढील काही गोष्टी जरुर स्वत:साठी करा. (Mental stress of women)
-ब्रेक घ्या
मानसिक थकवा दूर करण्यासाठी एखाद्या गोष्टीतून ब्रेक घेणे फार उत्तम. पण जर तुम्हाला सुट्टी घेता येत नसेल तर तुम्ही लंच टाइममध्ये ऑफिसच्या बाहेर पडा. त्यावेळी आपल्या सहकार्यांशी चर्चा करा. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या कला जपण्यासाठी दिवसभरातील कमीतकमी २ तास तरी काढा. महिन्यात एकदा तरी कुठेतरी बाहेर फिरायला जा.

-अधिकाधिक झोप घ्या
तुम्ही अधिकाधिक झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमचा शारिरिक, मानसिक आणि इमोशनल आरोग्य हे संतुलित राहते. मानसिक आणि शारिरिक थकवा दूर करण्यासाठी तुम्ही ७-८ तासांची झोप घेतलीच पाहिजे. झोपण्यापूर्वी मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा एखादे पुस्तक वाचा. (Mental stress of women)
-व्यायाम करा
नियमितपणे व्यायाम केल्याने तुमच्या शरिराची हालचाल होईलच. पण तुमचा मूड, एनर्जी लेव्हल, ब्रेन फंक्शन आणि मेंटल रिलॅक्सेशन ही अगदी उत्तम होईल. अशातच तुम्ही व्यायामाला तुमच्या लाइफस्टाइलचा हिस्सा बनवा. त्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन, अरोमाथेरपी, मसल्स रिलॅसेक्शन सारख्या रिलॅक्स तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकता.
हे देखील वाचा- महिलांनाच का होते अधिक थायरॉइडची समस्या? ‘या’ घरगुती उपायांनी करा उपचार
महत्वाच्या गोष्टींकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
-तुम्ही संतुलित डाएट आणि योग्य हाइड्रेशनवर लक्ष द्या
-बागकाम, योगा, चालणे किंवा एकमेकांसोबत वेळ घालवणे या गोष्टी जरुर करा
-कोवळ्या उन्हात घराबाहेर पडा
-सोशल सर्कल वाढवा आणि त्यांच्यासोबत ही कधीतरी वेळ नक्की घालवा