Home » Health : मनात सतत नकारात्मक विचार येताय मग करा ‘हे’ उपाय

Health : मनात सतत नकारात्मक विचार येताय मग करा ‘हे’ उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

‘मन चिंती ते वैरी न चिंती’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. अर्थात काय तर आपल्या मनात जे वाईट नकारात्मक विचार येतात ते आपल्या शत्रूंच्या देखील मनात आपल्याबद्दल येत नसतील. कधी कधी एकटे असताना आपल्या मनात असंख्य विचार सुरु असतात. अगदी विचारांचे वादळ मनात सुरु असते. या विचारांमध्ये जवळपास ९० टक्के विचार हे नकारात्मकच असतात. या नकारात्मक विचारांमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होण्यास सुरुवात होते, आणि आरोग्य बिघडते. (Health)

कामाच्या ताणावामुळे, कुटुंबिक तणावामुळे, विविध जबाबदाऱ्यांमुळे, टेन्शन्समुळे आपले मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर मनामध्ये मानसिक तणाव निर्माण होतो आणि यातूनच अनेकदा नकारात्मक विचार मनात येऊ लागतात. सतत नकारात्मक विचार केल्यामुळे मानसिक संतुलन बिघडून जाते. सतत एकटे राहणे, प्रत्येक गोष्टीची तुलना करणे, स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी न घेणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. (Marathi News)

या नकारात्मक विचारणामुळे आपल्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील त्याचा त्रास जाणवू लागतो. आपण अनेकदा हे नकारात्मक चुकीचे विचार मनात येऊ नये याचा प्रयत्न करतो. स्वतःला नकारात्मक विचार न करण्यास बजावतो देखील. मात्र मनात विचार येणे हे कोणाच्या हातात थोडी असते. विचार तर येतातच. मग असे चुकीचे आणि नकारात्मक विचार मनात येऊ नये यासाठी आपण थोडे प्रयत्न नक्कीच करू शकतो. मग मनात येणारे नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी काही सोप्या टिप्स आज आम्ही सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि नेहमी सकारात्मक विचार येतील. (Latest Marathi News)

Health

सकारात्मक राहा
सकारात्मक रहा नकारात्मक गोष्टींचा विचार करू नका. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील, तेव्हा थोडेसे चाला किंवा शारीरिक हालचालींमध्ये स्वतःला व्यग्र ठेवा. तुमचं लक्ष नेहमी सकारात्मक गोष्टींवर केंद्रित करा आणि सकारात्मक गोष्टींचा विचार करा. तुम्हाला आनंद देणार्‍या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घ्या.

जागरूकता
मनात येणाऱ्या विचारांबद्दल तुम्ही सतत जागरूक असणे आवश्यक आहे. आपल्या मनात येणारे विचार नकारात्मक आहेत हे ओळखणे महत्वाचे आहे. नकारात्मक विचार ओळखल्यास, त्यांच्यावर जास्त लक्ष न देता, त्यांना शांतपणे स्वीकारणे चांगले. (Top Stories)

अपेक्षा करणं सोडा
इतरांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवण्याची सवय सोडून द्या. लोकांनी कायम आपल्या म्हणण्यानुसार वागावं, ही आपली सर्वांत मोठी अपेक्षा असते आणि ही मोठी चूक ठरते. अपेक्षाभंगाचं दुःख होत राहतं. शिवाय, न राहवून आपण त्या व्यक्तीला कधी कधी निष्कारण वाईट वागणूकही देत राहतो. यामुळं नातेसंबंध बिघडू शकतात. यातून नकारात्मक परिस्थिती निर्माण होऊन मनात नकारात्मक विचार येत राहतात. त्यामुळे कोणाकडूनही कोणतीच अपेक्षा ठेऊ नका. (Top Marathi HEadline)

कामात व्यस्त ठेवा आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा
स्वतःला कामात व्यस्त ठेवल्याने, नकारात्मक विचारांना वेळ मिळत नाही. तुम्हाला आवडणाऱ्या कामांमध्ये किंवा छंदात स्वतःला व्यस्त ठेवा. नकारात्मक गोष्टी आणि लोकांच्या संपर्कात कमी राहा. सकारात्मक गोष्टी आणि लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा.

Health

 

आराम करा, गाणी ऐका
पुरेसा आराम आणि झोप घेणे आवश्यक आहे. आराम केल्याने शरीर आणि मन शांत राहते. शांत आणि आवडती गाणी ऐकल्याने मन प्रसन्न होते. यामुळे नकारात्मक विचार कमी होऊ शकतात. (Top Marathi Headline)

व्यायाम आणि ध्यान करा
ध्यान केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवता येते. शिवाय नियमित व्यायाम केल्याने शरीर आणि मन दोघेही निरोगी राहतात. व्यायामामुळे सकारात्मक विचार वाढतात आणि नकारात्मक विचार कमी होतात. जेव्हा जेव्हा मनात नकारात्मकता असते तेव्हा शारीरिक हालचाली वाढवा. वर्कआउटमुळं तुमचं आरोग्य तर चांगलं राहतंच. शिवाय, तुम्ही मानसिकदृष्ट्याही निरोगी राहता.

===========

हे देखील वाचा : Curd : दररोज दही खाण्याचे फायदे

Salad : सॅलड खाण्याचे फायदे आणि विविध सॅलड रेसिपी

============

नेहमी समाधानी राहा
प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे वेगवेगळे आहे. त्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यात येणारी सुख दुःख सुद्धा वेगळी असतात. नेहमी इतरांकडे काय आहे हे पाहत बसण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा जास्त विचार करावा. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यात नेहमी समाधानी राहावे. यामुळे मन शांत राहत. नकारात्मक विचार डोक्यात येत नाही. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.