Mental Health Care Tips : वाढत्या वयासह आपल्या फिजिकल आणि मानसिक आरोग्यामध्ये काही बदल होत असतात. खरंतर, वाढत्या वयासह हार्मोनल बदल होत असल्याने याचा संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. वयाच्या 20 व्या वर्षानंतर स्वभाव थोडा बदललेला दिसतो. यावेळीच मानसिक आरोग्य सांभाळणे अत्यावश्यक आहे. मानसिक आरोग्याची काळजी प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने घेतली पाहिजे. मात्र 20 व्या वर्षात का असे करणे गरजेचे आहे हे जाणून घेऊया.
आयुष्य वेगाने बदलते
वयाच्या 20 व्या वर्षात आयुष्य वेगाने बदलत असते. यावेळी व्यक्तीवर काही जबाबदाऱ्या येण्यास सुरुवात होते. अशातच काहींना घर सोडावे लागते, कमाई करावी लागते तर काही नवे नातेसंबंध प्रस्थापित होतात. अशा काही गोष्टींमुळे स्ट्रेस, एंग्जायटी आणि आत्मविश्वास कमी होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

Social anxiety reasons
मानसिक विकास होतो
वयाच्या 20 व्या वर्षात व्यक्तीचा मानसिक विकास वेगाने होतो. अशातच आयुष्यात काही मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. यावेळी स्वत:ला सांभाळणे फार महत्वाचे असते. या वयादरम्यान मानसिक आणि भावनिक आरोग्य अधिक प्रभावित होते.
=======================================================================================================
हेही वाचा :
Sunglasses : उन्हाळासाठी सनग्लासेस खरेदी करायचे…? त्याआधी हा लेख नक्की वाचा
Sweating : जास्त घाम येण्यामुळे चिडचिड होते मग करा ‘हे’ सोपे उपाय
=======================================================================================================
सवयी बदलतात
वाढत्या वयासह आपल्या लाइफस्टाइलमध्ये काही सवयी बदलतात. या वयादरम्यान अशा काही सवयी लागतात की, त्या आपल्या मेंदू आणि शरीरानुसार वागण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे योग्य सवयी लावणे फार महत्वाचे आहे.
नवीन नातेसंबंध निर्माण होतात
वयाच्या 20 व्या वर्षात सोशल कनेक्शन सर्वाधिक वाढले जातात. शिक्षण आणि नोकरीदरम्यान आपण नव्या लोकांना भेटतो. या वयावेळी काहीजणांचे पर्सनल तर काहींचे प्रोफेशनल कनेक्शन होतात. याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. काही नातीसंबंध दूर गेल्यास त्याचा मानसिक त्रास होतो. यामुळे मानसिक आरोग्य नेहमीच मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. (Mental Health Care Tips)
मानसिक ताण अधिक असतो
वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक ताण अधिक असतोय प्रोफेशनल आणि पर्सनल जबाबदाऱ्यांमुळे काहीजण तणावाखाली जातात. दीर्घकाळ हीच स्थिती कायम राहिल्यास मानसिक आरोग्य बिघडले जाते. यामुळे वयाच्या विशीत वाढत्या वयासह मानसिक आरोग्य मजबूत असावे.