Home » मानसिक तणाव ‘ या ‘ आजारांचे ठरते कारण, असे राहा दूर

मानसिक तणाव ‘ या ‘ आजारांचे ठरते कारण, असे राहा दूर

अलीकडल्या काळात मानसिक तणाव आणि एंग्जायटीसारख्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामागे काही कारणे असू शकतात. पण तुम्हाला माहितेय का, बिघडलेली मानसिक स्थिती काही आजारांचे कारण ठरू शकते.

by Team Gajawaja
0 comment
Mental health care
Share

Mental Health Care : सध्याच्या घडीला बिघडलेली मानसिक स्थिती एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. मानसिक आरोग्य उत्तम नसल्यास याचा परिणाम संपूर्ण शरिरावर झाल्याचे दिसून येतो. याशिवाय व्यक्ती नैराश्य आणि तणावाखाली जातो. जर वेळीस स्ट्रेवर नियंत्रण न मिळवल्यास मानसिक आरोग्याचे संतुलन बिघडले जाऊ शकते. अशातच व्यक्तीच्या चालण्याबोलण्यात फार फरक होतो. व्यक्ती हळूहळू डिप्रेशन, एंग्जायटी आणि सिजोफ्रेनियासारख्या मानसिक आजारांचा सामना करतो.

मानसिक आरोग्याची स्थिती ढासळल्यास आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की, एखाद्या कामात मन न लागणे, लोकांची संवाद कमी होणे, नेहमीच एकटे राहणे अशा काही गोष्टी व्यक्तीसोबत घडण्यास सुरुवात होते. गंभीर प्रकरणात व्यक्ती आत्महत्या करण्याचा देखील विचार करू शकतो. चिंतेची बाब अशी की, मानसिक आरोग्य बिघडल्यास अन्य काही आजारपण देखील मागे लागते. यापासून दूर राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेणार आहोत.

मानसिक आरोग्य बिघडण्यामागील कारण काय?
मानसिक आरोग्य बिघडल्यास त्याचा शरिराचा अन्य अवयवांवरही परिणाम होतो. खरंतर, मानसिक आरोग्य बिघडण्यामागे काही कारणे असू शकतात. याची सुरुवात चिंता आणि भीतीने होते. अशातच मेंदूत असलेले न्यूरोट्रांसमीटर आणि केमिकलची अॅक्टिव्हिटी फार वाढल्याने अथवा कमी झाल्याच्या कारणास्तव तुम्हाला चिंता आणि भीती वाटत राहते.

कोणते आजार मागे लागतात?
बिघडलेल्या मानसिक आरोग्यामुळे व्यक्तीच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. याशिवाय संपूर्ण आरोग्यावरही हळूहळू परिणाम होऊ लागतो. यामध्ये ब्लड प्रेशर वाढल्यास त्याचा थेट प्रभाव हृदयावर होतो. यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढली जाते. मानसिक स्थिती बिघडल्यास पुर्ण झोपही होत नाही. अशातच मधुमेह आणि लठ्ठपणाची समस्या मागे लागू शकते. (Mental Health Care)

मानसिक आरोग्य कसे सुधारावे?
-दररोज अर्धा तास व्यायाम करावा
-मेडिटेशन करा
-दररोजच्या कामांचे प्लॅनिंग करा
-आपल्या मनातील भावना मित्रपरिवारासोबत शेअर करा
-झोपण्याच्या एक तास आधी फोनचा वापर करू नका
-खाण्यापिण्याकडे लक्ष द्या


आणखी वाचा :
जान्हवी कपूर ते मलाइका अरोडा दररोज करतात तूपाचे सेवन, रहाल फिट आणि हेल्दी
सकाळ ते संध्याकाळपर्यंत या 4 हेल्दी सवयी अंगी बाळगा, आजारपणापासून रहाल दूर

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.