भारताने आता महारोगाच्या स्थितीत झालेली सुधारणा पाहता देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये प्रवाशांना मास्क लावणे हे ऑप्शनल झाले आहे. याच संदर्भात नुकत्याच एका शासकीय आदेसात असे म्हटले गेले आहे की, चेहऱ्यावर मास् लावल्यास तर उत्तमच आहे. मात्र आता विमानातून प्रवास करताना फेस मास्क लावला नाही तरीही चालेल आणि त्यासाठी दंड ही स्विकारला जाणार नाही. या बदलावासह प्रवाशांना आता मास्कशिवाय प्रवास करता येणार आहे. मात्र फ्लाइट पकडण्यापूर्वी अनिवार्य रुपात एयर सुविधा फॉर्म भरावा लागणार आहे. (Mask on Flights)
ज्योतिरादित्य सिंधिंया यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने एक आदेश जाहीर केला. त्यानुसार एअरलाइंस द्वारे जाणाऱ्या इन-फ्लाइट अनाउंसमेंटमध्ये केवळ हा उल्लेख केला जाईल की, कोविड१९ चा धोका पाहता सर्व प्रवाशांना मास्क/आपला चेहरा झाकला पाहिजे. इन-फ्लाइट घोषणांमध्ये तुमच्याकडून त्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाईल असे सुद्धा सांगण्याची गरज नाही. दरम्यान, मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना प्लाय लिस्टमध्ये स्थान नव्हते. मात्र मास्क न घालणाऱ्यांना नो-फ्लाय लिस्टमध्ये ही टाकले गेले होते. मात्र आता विमान प्रवासात मास्क घालणे अनिवार्य नसल्याने प्रवाशांसह केबिन क्रूलासुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे.

हळूहळू उठवले जातायत निर्बंध
भारताकडून कोविड संदर्भात लागू करण्यात आलेले निर्बंध आता विमानतळावर हळूहळू हटवले जात आहेत. जसे की, इन-फ्लाइट भोजन किंवा पेय देणे/विक्री करणे. देशाअंतर्गत उड्डाणांची संख्या, तर आंतरराष्ट्रीय उड्डाण आणि चाचणी, क्वारंटाइन सारखे निर्बंध हटवण्यात आले आहेत.
हे देखील वाचा- आता गॅस सिलिंडरवर लावला जाणार QR कोड, अशा पद्धतीने करणार काम
एअर सुविधा फॉर्म हटवण्याची मागणी
फ्लाइट्समध्ये अधिक प्रवास करणारे आणि ट्रॅवल इंडस्ट्री आता भारतासाठी उड्डाण करण्यापूर्वी एयर सुविधा फॉर्म भरणे आणि जमा करण्याची आवश्यकता बंद करण्याची मागणी केली जात आहे. एका प्रमुख ट्रॅवल एजेंटने असे म्हटले की, परदेशातून भारतात येण्यासाठी एखाद्या प्रवासाची तपासणी करण्यापूर्वी, एयरलाइन्स कर्मचारी त्याची संपूर्ण तपासणी करतात. त्याचसोबत वॅक्सिनेशन झाले आहे की नाही हे पहावे पण एयर सुविधा एक अनावश्यक त्रास आहे. (Mask on Flights)
दरम्यान, शासकीय माहिती आणि न्यूज वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोराना व्हायरसच्या रुग्णांचा देशातील एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा हा ०.०२ टक्के होता. पण नव्या आकडेवारीनुसार पुर्नप्राप्तीचा दर ९८.७९ टक्क्यांपर्यंत वाढला गेला आहे. तर आतापर्यंत ४,४१,२८,५८० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून मृत्यूचे प्रमाण १.१९ टक्के आहे.