Home » मेट्रिमोनियल साइड्सवर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

मेट्रिमोनियल साइड्सवर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

आपल्या येथे लग्न हा एक अत्यंत गंभीर मुद्दा मानला जातो. यावेळी नवं वधू आणि वरापेक्षा अन्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिले जाते. अशातच आजकाल पालक आपल्या मुलांसाठी मेट्रिमोनियल साइड्सवर पार्टनर शोधतात.

by Team Gajawaja
0 comment
Marriage Tips
Share

आपल्या येथे लग्न हा एक अत्यंत गंभीर मुद्दा मानला जातो. यावेळी नवं वधू आणि वरापेक्षा अन्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिले जाते. अशातच आजकाल पालक आपल्या मुलांसाठी मेट्रिमोनियल साइड्सवर पार्टनर शोधतात. मात्र तुम्हाला माहितेय का, येथे सुद्धा काही वेळेश तुमच्याशी खोटे बोलले जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने या साइट्सवरील पार्टनरशी पहिल्यांदा संपर्क साधताना सावध राहिले पाहिजे. त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही या साइट्सवर आल्यानंतर लक्षात ठेवल्या पाहिजेत याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Marriage Tips)

-पैशांची मागणी करणे
आजकाल सोशल मीडियात अशा काही घटना समोर येतात की, जेथे दोन लोक मेट्रिमोनियल साइट्सवर एकमेकांना भेटतात. दोघांमध्ये जवळीकता ही वाझते. मात्र त्यानंतर मुलगा अथवा मुलगी एकमेकांकडून पैशांची मागणी करू लागतात. अशा प्रकारची फसवणूक सध्याच्या घडीला होणे सामान्य मानले जाते. त्यामुळे तुमच्या सोबत अशी घटना घडू नये म्हणून जर एखाद्याने मेट्रिमोनियल साइट्सवर पैशांची मागणी केली तर सतर्क रहा.

-उंचीबद्दल खोटं बोलणे
मेट्रिमोनियल साइट्सवर नेहमीच मुलगा अथवा मुलगी आपल्या खऱ्या उंचीबद्दल खोटं बोलतात. जेणेकरुन नाते जुळवण्यासाठी अडचणी येऊ नयेत. मात्र असे करणे अत्यंत चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही सुद्धा कधी एखाद्या मेट्रिमोनियल साइटवर एखाद्या मुलाशी किंवा मुलाशी बोलत असाल तर त्याला तुमच्या बद्दलच्या सर्व गोष्टी खऱ्यापणाने सांगा.

-परिवाराबद्दल खोटं बोलणे
आजकाल पालक मेट्रिमोनियल साइट्सवर आपल्या मुलांसाठी परदेशातील स्थळ शोधतात. मात्र काही प्रकरणात असे समोर आले आहे की, मुलाच्या परिवाराकडून खोटं बोलले जाते. यामुळे असे स्थळ शोधताना थोडा विचार करावा. त्याचसोबत मुलाबद्दल सर्व माहिती मिळवाली. कारण मेट्रिमोनियल साइट्सवर तुम्हाला सर्वकाही सत्य मिळणार नाही

-पार्टनर बद्दल खोटं बोलणे
मेट्रिमोनियल साइट्सवर मुलगा किंवा मुलगी नेहमीच अशा पार्टनरचा शोध घेतात जे त्यांच्या बरोबरीचे अशतात. मात्र ते आपल्या प्रोफाइलमध्ये रंग, जात, कुंडली किंवा वजनाबद्दल नेहमीच खोटं बोलतात. अशातच आता जेव्हा कधी एखाद्या मुलाशी किंवा मुलीशी बोलताना त्याच्या बद्दल आधी सर्व काही गोष्टी जाणून घ्या. जेणेकरुन भविष्यात एखाद्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. (Marriage Tips)

-चुकीचे वय आणि महत्त्वाची माहिती
नेहमीच मेट्रिमोनियल साइट्सवर मुलगा किंवा मुलीच्या परिवारातील लोक आपल्या मुलांबद्दलचे वय लपवतात. जेणेकरुन स्थळ शोधण्यास अधिक त्रास होऊ नये. एक किंवा दोन वर्षांचे अंतर चालते. मात्र काही लोक ८-१० वर्षापर्यंत आपले वय लपवतात. जे असे करणे चुकीचे आहे.


हेही वाचा- वैवाहिक आयुष्यात सुखी राहण्यासाठी संवाद हवाच…


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.