प्रेमाला वय नसते असे आपण म्हणतो खरे. पण तेच नाते जर आयुष्यभर टिकवायचे म्हटले तरी काही गोष्टी एकमेकांच्या सांभाळून घ्या लागतात. नात्यात रुसवे-फुगवे आले तरीही पार्टनरला आपण आयुष्यभर साथ देऊ अशा पद्धतीने स्वत:ला घडवायचे असते. अशातच जर लग्न करायचे म्हटले तर सर्वसामान्यपणे लोक कुठे करतात? एखादे सुंदर हॉटेल, डेस्टिनेशन वेडिंग किंवा मंदिरात. मात्र अमेरिकेतील एका कपलने किराणा मालाच्या दुकानात लग्न करुन प्रत्येकालाच हैराण केले आहे. एरिझोना येथे राहणारे ७८ वर्षीय डेनिस डेलगाडो यांनी ७२ वर्षीय ब्रेंडा विलियम्स हिच्याशी १९ नोव्हेंबरला एका किराणा मालाच्या दुकानाच लग्न केले. खरंत लग्न करण्यामागे काही खास कारण नाही. पण त्यांच्यासाठी ही जागा फार महत्वाची आहे. या ठिकाणीच दोघे गेल्या वर्षी एकमेकांना प्रथम भेटले होते.(Marriage in grocery store)
ते गेल्या वर्षात ऑगस्ट मध्ये कासा ग्रांडे मध्ये सुपरमार्केट, फ्राईच्या फूड अॅन्ड ड्रग्ज स्टोर मध्ये भेटले. त्यानंतर त्यांनी लगेच एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपल्या नात्याला नाव मिळावे म्हणून अशा ठिकाणाची निवड केली जेथे त्यांच्या भावना जोडल्या गेल्या होत्या. फॉक्स१३ सोबत बोलताना ब्रेंडा यांनी त्या दिवसाबद्दल सांगितले जेव्हा त्या पहिल्यांदाच डेनिस यांना भेटल्या. त्यांनी असे म्हटले की, मी कॉरिडोयर येथून खाली गेली होती आणि एकजण माझ्याकडे आला आणि असे म्हटले… डेनिसने हे बोलून आपले वाक्य पूर्ण केले की, तुम्ही मास्क घालण्यासंदर्भात उत्तम गोष्टी जाणता.
त्यानंतर ब्रेंडा यांनी असे म्हटले की, ते काही वेळ एकत्रित उभे राहिले आणि एकमेकांबद्दल काहीतरी वेगळेच त्यांना वाटले. तेव्हाच एकमेकांचा क्रमांक शेयर केला. तर दीर्घकाळ वाट न पाहता त्यांची प्रेम कथा सुरु झाली. महिन्याभऱ्याच्या डेटिं नंतर एप्रिलमध्ये डेनिस ब्रेंडा यांच्या घरी आला आणि तिला सांगितले की, तो तिला प्रपोज करुन अंगठी देणार आहे. त्यावेळी त्याने तिला लग्नाची सुद्धा मागणी घातली. तेव्हा ब्रेंडाने वेळेचा विलंब न लावता त्याचा प्रस्ताव स्विकार केला.(Marriage in grocery store)
हे देखील वाचा- महिलेने दान केले ६ कोटी, मुलीला दिला नाही एकही रुपया, पण का?
ब्रेंडा यांच्या लग्नाला तीन दशक झाली होती. त्यानंतर त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. तरीही त्यांचा देवावर विश्वास होता. पण डेनिस याने असे म्हटले की, तो आपल्या पत्नीच्या निधनामुळे अत्यंत रागात होता.