भारतातील अशी काही ठिकाणं आहेत जी खरंच सुंदर आहे. त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे तेथे वारंवार भेट द्यावीशी वाटते आणि त्याच्या निर्सगात एखादा वेडा होऊन जातो. तर सध्या उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे त्यामुळे डोंगर-पर्वतांमध्ये नव्हे तर समुद्र किनारी सुद्धा जाणे बेस्ट पर्याय ठरु शकतो. भारतात काही सुंदर समुद्र किनारे आहे, जेथे पर्यटकांची फार मोठी गर्दी होते. खासकरुन परदेशी पर्यटकांची. अशात तुम्हाला भारतातील सर्वाधिक मोठा समुद्र किनारा कोणता आहे हे माहितेय का? (Marina Beach)
चेन्नईतील हा बीच आहे सर्वाधिक मोठा
खरंतर तमिळनाडू मधील मेट्रो सिटी चेन्नईच्या मरीना बीच हा जवळजवळ ८.१ माइल्स म्हणजेच १३ किमी लांबलचक असा बीच आहे. याची एक बाजू बंगालच्या खाडीला मिळते. भारतातील सर्वाधिक सुंदर बीचपैकी हा एक आहे. या समुद्र किनाऱ्यावरील सोनेरी वाळू, तेथील सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्वामुळे त्याला सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
या समुद्रकिनाऱ्यावर सुर्योदय आणि सुर्यास्त पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. त्याचसोबत येथे काही अॅक्टिव्हिटी जसे की, स्विमिंग आणि स्ट्रोलिंगची मजा घेता येते. तसेच येथील स्ट्रिट फूडची चव सुद्धा छान आहे.
मरिना बीचच्या आसपास फिरण्यासारखी ठिकाणे
मरीना बीच हे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे कारण आजूबाजूला अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. मरीना बीचचे नाईटलाइफ हा एक प्रकारचा अनोखा अनुभव आहे. इथल्या शांत वातावरणात कुटुंब, जोडीदार किंवा मित्रांसोबत क्वालिटी टाइम घालवण्याची मजाच वेगळी आहे. (Marina Beach)
येथे गेल्यावर तुम्ही Santhome Cathedral Basilica बघायला जाऊ शकता. हे एक चर्च आहे ज्याच्या आत सेंट थॉमसचा पुतळा देखील आहे. तसेच येथे सुमारे ४९ मीटर लांब एक लाईट हाऊस आहे, जे समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. त्यात लिफ्ट देखील आहे असे म्हणतात. याशिवाय १९०९ मध्ये स्थापन झालेले एक आकर्षक पॉइंट एक्वैरियम आहे. याशिवाय मरीना बीचच्या आसपास अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत.
हे देखील वाचा- बेवारसी असलेला ‘हा’ एक हजार कोटींचा बंगला…
मरीना बीचवर जाणार असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा-
-प्रवास करताना तुमच्या सामानाची स्वतः काळजी घ्या.
-शक्य असल्यास कमी पैसे सोबत ठेवले तर बरे.
-सोबत मुलं असतील तर त्यांची काळजी घ्यावी.
-कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून अन्न किंवा पेय घेऊ नये.
-जर तुम्हाला तेथे पोहायचे असेल तर खोलवर जाऊ नका.