बहुतांश लोक स्वत:ला वेगळे दिसावे म्हणून काही ना काही करत असतात. आपली आवड पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे पोषाक घालतात. याच लिस्टमध्ये बॉलिवूड मधील स्टार रणवीर सिंह आणि मॉडेल उर्फी जावेदच्या नावाचा समावेश आहे. परंतु काही लोक वेगळे दिसण्यासाठी सर्व काही मर्यादा ओलांडतात. काही लोकांच्या आवडीनिवडी अगदी विचित्रच असता. काही लोक बनावट जनावरांचे कपडे घालून काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. अशातच जापान मधील एका व्यक्तीने आपण स्वत: लांडग्यासारखे दिसावे म्हणून त्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. (Man looks like Wolf)
बालपणापासूनच जनावरांचे कपडे घालण्याची आवड
लोक जनावरांचे कपडे हे त्याच वेळी घालतात जेव्हा एखादे फॅन्सी कॉम्पिटीशन असते. अशातच आता जापान मधील एका व्यक्तीने आपल्या बालपणीची आवड जोपासली आहे. ती पूर्ण करण्यासाठी त्याला ३० लाख येन म्हणजेच जवळजवळ १८.५ लाखांचा खर्च करावा लागला. व्यक्तीला लांडगा बनण्यासाठी सर्वात प्रथम स्पेशल इफेक्ट्स वर्कशॉप जेपेटला संपर्क साधला. तेथे रियलिस्टिक लांडग्याचा ड्रेस बनवून दिला.

व्यक्तीला जनावरांवर आहे प्रेम
ऑर्डर दिल्यानंतर ५० दिवसांमध्ये लांडग्याचा लूक असणारा पोषाक तयार झाला. ज्याला खास फिचर्सच्या रुपात तयार करण्यात आले आहे. त्यामुळे जो कोणताही व्यक्ती तो ड्रेस घालेल तो लांडग्याच्या लूक मध्ये दिसून येईल.या कॉस्ट्युम बद्दल व्यक्तीने सांगताना असे म्हटले की, त्याला लहानपणापासूच जनावरांवर प्रेम आहे. टीव्हीवर दिसणारे असे काही अॅनिमल शूट पाहिले त्यानंतर त्याला लांडगा खुप आवडला. अशातच त्याने एक दिवस आपण असाच लूक करायचा असे स्वप्न पाहिले. जेव्हा व्यक्तीने तो कॉस्ट्युम घालून पाहिला तेव्हा तो आश्चर्यचकीत झाला. तेव्हा त्याला आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे वाटू लागले. तर Zeppet हे ग्राहकांना विचित्र पद्धतीचे ड्रीम कॉस्ट्युम बनवून देतात.(Man looks like Wolf)
हे देखील वाचा- जगातील सर्वाधिक विषारी साप, चावल्यास घेतो १०० हून अधिकांचा बळी
यापूर्वी कुत्र्याच्या लूकचा घातला होता ड्रेस
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने यापूर्वी कुत्र्याचा वेश धारण केला होता. व्यक्तीला जनावरांचे ड्रेस घालण्याची आवड ही फार चर्चेत आली आहे. तो व्यक्ती जनावरांचे कपडे घालून फिरतो. व्यक्तीच्या या विचित्र आवडीमुळे आणि स्वप्नामुळे त्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा होत आहे.
