बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने, डान्सने आणि बोल्ड अदांनी सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni). तिने ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला होता. त्याकाळी ती सिनेविश्वातील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये तिची गिनती होत होती. मात्र तिचे अंडरवर्ल्डच्या लोकांशी असलेले संबंध जगजाहीर झाले आणि तिचे संपूर्ण करियर बुडाले. त्यानंतर ममताने देश सोडला आणि ती दुबईमध्ये गेली. (Mamta Kulkarni)
मात्र आता पुन्हा ममता चर्चत येण्याचे कारण म्हणजे ममताने प्रयागराजमध्ये संपन्न होत असलेल्या कुंभमेळ्यामधे संन्यास स्वीकारला आहे. महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याकडून तिने दीक्षा प्राप्त केली असून ती आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. प्रयागराजमधील संगममध्ये तिने स्वत:चे पिंडदान केले. त्याच ठिकाणी तिचा पट्टाभिषेक देखील पार पडला. ममता कुलकर्णीला यानंतर नवीन नाव देखील मिळाले असून ती श्री यमाई ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाणार.(Mahamandleshwar)
ममताने संन्यास घेतला आणि ती महामंडलेश्वर देखील झाली. किन्नर आखाड्यात तिने आध्यात्मिक जीवन अंगीकारले आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की महामंडलेश्वर म्हणजे काय? हे महामंडलेश्वर पद म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय, ते काम कसे करते, महामंडलेश्वर कसा बनवला जातो आणि काय नियम आहेत हे आपण जाणून घेऊया. (Marathi Top News)
महामंडलेश्वर हे सर्वोच्च आध्यात्मिक आणि धार्मिक पद आहे. हे स्थान हिंदू धर्मातील प्रमुख आखाड्यांमध्ये ओळखले जाते. हे पद अशा लोकांसाठी धार्मिक प्रमुखांसाठी आहे जे पंथ, संप्रदाय किंवा आध्यात्मिक संघटनेचे नेतृत्व करतात. हे पद भूषवणाऱ्या लोकांना कधीकधी “महामंडलेश्वराचार्य” किंवा “महामंडल स्वामी” असेही संबोधले जाते. महामंडलेश्वराचे कार्य प्रामुख्याने धार्मिक व आध्यात्मिक मार्गदर्शन करणे हे आहे. (Latest Marathi News)
आखाड्यांमधील महामंडलेश्वर पद वैभवशाली आणि प्रभावी आहे. महामंडलेश्वर छत्र परिधान करून चांदीच्या सिंहासनावर बसले आहेत. महामंडलेश्वराचे जीवन त्यागाने भरलेले असते. या पदावर येण्यासाठी पाच स्तरांची परीक्षा, ज्ञान आणि त्यागाची परीक्षा पस करावी लागते. महामंडलेश्वर ही पदवी मिळाल्यावर आयुष्यभर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. अनेक नियमांचे पालन करावे लागते. या नियमांचे पालन न केल्यास आखाड्यातून हद्दपार केले जाऊ शकते.
जेव्हा एखादी व्यक्ती संन्यास किंवा महामंडलेश्वर या पदवीसाठी आखाड्याशी संपर्क साधते तेव्हा त्या व्यक्तीला त्याचे नाव, पत्ता, शिक्षण, नातेवाईकांचा तपशील आणि नोकरी आणि व्यवसायाची संपूर्ण माहिती द्यावी लागते. यानंतर आखाड्याचे पोलीस ठाण्याचे अधिकारी त्या व्यक्तीची संपूर्ण चौकशी करतात. पोलिस ठाण्यात तपासणी केल्यानंतर आखाड्याचे सचिव आणि पंचायतही तपास करतात. या तपासामध्ये इच्छुक व्यक्तीचे कुटुंबीय, नातेवाईक, शाळा, कॉलेजमध्ये जाऊन माहिती गोळा केली जाते. यासोबतच त्याचा काही गुन्हेगारीशी संबंध आहे का, याचीही माहिती स्थानिक पोलीस ठाण्यातून गोळा केली जाते.
हा संपूर्ण तपास अहवाल आखाड्याच्या अध्यक्षांना दिला जातो, त्यानंतर ते देखील त्यांच्या स्तरावर चौकशी करतात. तपास पूर्ण झाल्यावर आखाड्याचे पंच त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेतात. ती व्यक्ती उत्तीर्ण झाल्यावर त्याला महामंडलेश्वर ही पदवी देण्याचा निर्णय घेतला जातो. महामंडलेश्वर झाल्यानंतर अनेक नियमांचे पालन करणे बंधनकारक होते. कोणताही नियम तोडल्यास मोठी कारवाई देखील केली जाते.
===============
हे देखील वाचा : Prayagraj : मस्क्युलर बाबा आणि एमटेक बाबा
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
महामंडलेश्वर झाल्यानंतर व्यक्तीला कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते. त्यांच्या त्यांच्या कुटुंबाशी संपर्क उघड झाल्यास त्या व्यक्तीला आखाड्यातून हाकलून दिले जाते. यासोबतच वर्णदोषही नसावा. तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कोणत्याही व्यक्तीशी संबंध नसावा. भोग आणि ऐशोआरामापासून दूर राहून मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहावे लागते. या सर्वांचे पालन न केल्यास हद्दपार केले जाते.
महामंडलेश्वर झाल्यानंतर व्यक्तीला किन्नर आखाड्याच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे नेतृत्व करावे लागते. धर्माचा प्रचार करणे, आखाड्याच्या परंपरा पुढे नेणे आणि समाजातील ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांसाठी काम करणे ही त्यांची जबाबदारी आहे.