Home » Maharashtra : ब्राह्मणांसाठी राज्य सरकारची पहिलीच आर्थिक लाभाची योजना जाहीर

Maharashtra : ब्राह्मणांसाठी राज्य सरकारची पहिलीच आर्थिक लाभाची योजना जाहीर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Maharashtra
Share

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे ८ ते १० टक्के ब्राह्मणांची लोकसंख्या आहे. मात्र या समाजाला आजवर कोणत्याही प्रकारच्या योजना किंवा लाभ मिळाले नाहीये. हा समाज कायम सरकारच्या योजनांपासून लांबच होता. मात्र आता ब्राह्मणांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारने खास ब्राह्मणांसाठी एक योजना सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजासाठी जाहीर करण्यात आलेल्या महामंडळाकडून कर्जव्याज परतावा योजना जाहीर करण्यात आली आहे. (Marathi)

विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजनेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर सरकारकडून केलेली ही आणखी एक महत्वाची घोषणा मानली जात आहे. ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य या तिन्ही समाजासाठी सरकारकडून घोषित झालेली वैयक्तिक स्वरूपाची पहिलीच आर्थिक योजना आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने ब्राह्मण समाजासाठी एक विशेष योजना लागू केली आहे. कर्जव्याज परतावा योजनेमध्ये दरवर्षी ५० लाभार्थीना या योजनेचा लाभ मिळणार आहे. (Marathi News)

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध समाजाला आकर्षित करण्यासाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा लावला होता. त्यानुसार ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास, राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप तर आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक महामंडळ स्थापन केले होते. (Todays Marathi Headline)

Maharashtra

आर्थिक दुर्बल घटकांसाठी नोकरी व शिक्षणातील १० टक्के आरक्षणाचा लाभ वगळता ब्राह्मण समाजासाठी जाहीर करण्यात आलेली आर्थिक लाभाची ही पहिलीच योजना आहे. राजपूत आणि आर्य वैश्य समाजातील घटकांसाठीही हीच योजना लागू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्यात आली. मात्र या महामंडळांना प्रत्यक्षात निधीच देण्यात आला नव्हता. स्थापनेपासून ही मंडळे केवळ कागदावरच होती अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परशुराम महामंडळावर अध्यक्षांची नेमणूक करून या महामंडळांना प्रत्येकी १० कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात आले आहे. (Top Marathi News)

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजातील तरुणांसाठी ‘कर्जव्याज परतावा योजना’ लागू केली आहे. या निर्णयामुळे तिन्ही समाजातील सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांना व्यवसाय आणि उद्योगासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र तरुणांना कर्ज मिळेल आणि त्यांनी घेतलेले कर्ज हप्त्यांनुसार वेळेवर फेडले, तर त्यांना भरलेले व्याज परत दिले जाणार आहे. त्यामुळे नवउद्योजकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi HEadline)

=======

SBI १ डिसेंबर २०२५ पासून बंद करणार ही सर्विस खातेदारांना होईल मोठा परिणाम

=======

महायुती सरकारने ब्राह्मण, राजपूत, आर्यवैश्य समाजासाठी घोषणा केलेल्या कर्जव्याज परतावा योजनेनुसार, तिन्ही समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज दिले जाईल. दरवर्षी 50 लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानुसार १५ लाखांपर्यंतच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास महामंडळाकडून भरलेल्या व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. व्याज परताव्याची कमाल मर्यादा साडेचार लाख रुपये इतकी असेल. तसेच गट कर्ज परतावा योजनेतंर्गत ५० लाखांपर्यंत मंजूर झालेल्या कर्जाचे हप्ते नियमितपणे फेडल्यास महामंडळाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात व्याजाचे पैसे जमा केले जातील. गट कर्ज परतावा योजनेची कमाल मर्यादा १५ लाख रुपये इतकी असेल. मात्र, त्यासाठी लाभार्थ्याने बँकांना हप्ता भरल्यानंतर १५ दिवसांच्या आत कळवणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. (Top Trending News)

यापूर्वी यापूर्वी राज्य सरकारने ब्राह्मण समाजाला आर्थिक आणि दुर्बल घटकांसाठीचे नोकरी व शिक्षणात १० टक्के आरक्षण देऊ केले होते. यानंतर पहिल्यांदाच ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक योजना सुरु करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने परशुराम महामंडळाची स्थापना केली होती. या महामंडळावर अध्यक्षांची नेमणूक करुन १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.