महाराष्ट्रातील लोकप्रिय गाणं ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ याला राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आले आहे. कविवर्य राजा नीलकंढ बढे यांच्या गीताला राज्य गीत म्हणून घोषित करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात घेण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुगनंटीवार यांनी गाण्याला राज्य गीताचे रुप देण्याचा प्रस्ताव मांडला आणि तो सर्वांच्या संम्मतीने मान्य केला गेला. राज्यगीत हे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला असल्याने तेव्हापासून ते लागू होणार आहे.(Maharashtra Song)
हे गीत १ मिनिट ४१ सेकंदापर्यंत गायले जाईल किंवा पोलिसांच्या बँन्डवर वाजवले जाईल. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्याचे कोणतेही अधिकृत राज्यगीत नव्हते. आता राज्य गीतासाठी मंजूरी मिळाली आहे. याबद्दल सांगताना मुनगंटीवार यांनी असे म्हटले की, स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सव वर्षात नागरिकांमध्ये स्फुर्ति भरणे, प्रेरणा देणे किंवा महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे गीत जय जय महाराष्ट्र माझाला राज्यगीत म्हणून स्विकार केले गेले.
श्रीनिवास खळे याचे संगीतकार असून शाहीर कृष्णाराव साबळे यांनी त्याला आपला आवाज दिला आहे. शिवजयंती वेळी तो स्विकार केले जाणार आहे. आता पर्यंत १२ राज्यांचे आपले स्वत: चे अधिकृत राज्यगीत नाही. यापूर्वी आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, उडीसा, पाँन्डेचेरी, तमिळनाडू आणि उत्तराखंडचे अधिकृत राज्य गीत सुद्धा आहे. (Maharashtra Song)
हे देखील वाचा- पुणे ते कश्मीर पर्यंत रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या मानसी पवार यांचा वाचा प्रेरणादायी प्रवास
गाणं वादनासंदर्भात ‘ही’ आहे नियमावली
राज्य गीतासंदर्भात राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.
-राज्यातील सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवात राज्यगीतांपासून होईल किंवा त्याचे ऑडिओ चालवले जाईल
-१ मे रोजी महाराष्ट्र दिवसावेळी झेंडा वंदन झाल्यानंतर राष्ट्रगीतानंतर राज्य गीत वाजवले जाईल
-विधीमंडळाच्या दोन्ही सदनात अधिवेशनापूर्वी वंदे मातरमच्या नंतर लगेच राज्य गीत चालवले जाईल
-शाळांमध्ये दैनिक कामकाज सुरु होण्यापूर्वी परिपाठ, प्रतिज्ञा, प्रार्थना आणि राष्ट्रगीतासह राज्यगीत वाजवले जाईल
-राज्यातील सर्व शिक्षण संस्था, सर्व प्रकारच्या नॉन-शासकीय संघटना, स्वयंसेवी संघटना, खासगी प्रतिष्ठानांसह सर्व नागरिकांसाठी सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रिडा कार्यक्रमांमध्ये ही राज्य गीत सन्मानाने वाजवले जाईल
-राज्यगीत सुरु झाल्यानंतर सावधान अवस्थेत उभे राहत त्याचा सन्मान करावा
-यामध्ये गर्भवती महिला, लहान मुलं, आजारी व्यक्ती, दिव्यांग यांच्यासह वृद्धांना सुट दिली जाईल
-पोलिस बँन्डच्या माध्यमातून हे गीत वाजवले जाऊ शकते
-राज्यगीत पुढील शैक्षणिक सत्राच्या स्टेट बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ही सहभागी करण्यात येईल