गुढीपाडवा सणाच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व कोरोना निर्बंध सरकारने काढून टाकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
कोरोना व्हायरस महामारी नियंत्रणासाठी राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे राज्यात साजऱ्या होणाऱ्या सर्व सण, उत्सव आणि सार्वजनिक उपक्रमांवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या.
मात्र, मराठी नववर्षाच्या निमित्ताने महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेत नागरिकांना गुढी पाडव्याची भेट दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातूनही याबाबत माहिती दिली आहे.
गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 31, 2022
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
====
हे देखील वाचा: काँग्रेसचे अनेक आमदार नाराज, सोनिया गांधींना भेटण्यासाठी मागितली वेळ
====
कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक होते. त्यामुळे सहाजिकच राज्य सरकारने निर्बंधही मोठ्या प्रमाणावर लावले होते. प्रामुख्याने सण, उत्सव, आणि सार्वजनिक कार्यक्रम यांवर विशेष बंधणे होती.
राज्यातील व्यायामशाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, लग्नसमारंभ आणि त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या सर्व कार्यक्रमांवर बंधणे होती. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्बंधावर विरोधी पक्षासह राज्यातील अनेक नागरिक, व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
काय म्हणाले राजेश टोपे?
राज्यातील निर्बंध हटविल्यामुळे यापुढे साजरे होणारे सर्व सण, उत्सव नागरिकांना मोठ्या उत्साहात साजरे करता येणार आहेत. मग तो सण गुढी पाढवा असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आले आहे.
महत्त्वाचं म्हणजे मास्क लावण्याचीही सक्ती नसेल. मात्र निर्बंधमुक्त केलं असंल तरी खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. मास्क वापरणे ऐच्छिक असेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
====
हे देखील वाचा: सुयोग्य नेतृत्वाअभावी काँग्रेस रसातळाला जाणार?
====
त्यामुळे आता निर्बंध कायम ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचेही टोपे यांनी सांगितले.