Home » सांगलीत फॉरेन रिटर्न सरपंचचा विजय, वडिलांच्या सांगण्यावरुन लढली निवडणूक

सांगलीत फॉरेन रिटर्न सरपंचचा विजय, वडिलांच्या सांगण्यावरुन लढली निवडणूक

by Team Gajawaja
0 comment
Maharashtra Gram Panchayat Election
Share

२१ वर्षीय यशोधारा शिंदे हिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी ती अमेरिकेत जाऊन जॉर्जियात मेडिकलचे शिक्षण घेत होती. पण तिच्या नशीबात वेगळेच काहीतरी लिहिलेले होते. कारण महाराष्ट्रातील आपल्या गावात ती परतली असता आणि वडिलांच्या सांगण्यावरुन तिने निवडणूक लढवली. पण त्यात तिचा दणदणीत विजय झाला. या विजयनानंतर सांगली जिल्ह्यातील मिराज येथील आपल्या गावात उत्तम काम करण्यासह आणि आपले शिक्षण ऑनलाईन पद्धतीने तिने पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. (Maharashtra Gram Panchayat Election)

महाराष्ट्रातील काही हिस्स्यांमध्ये ७६८२ ग्राम पंचायतीसाठी १८ डिसेंबरला मतदान झाले. निवडणूकीचे निकाल नुकतेच जाहीर केले गेले. त्याच दरम्यान, २१ वर्षीय यशोधरा शिंदे सुद्धा निवडणूकीत जिंकल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. यशोधरा हिचे असे म्हणणे आहे की, तिला महिलांना आत्मनिर्भर बनवायचे हे. विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग आणि अन्य उपकरणे उपलब्ध करुन देणे, मुलांना उत्तम आरोग्याच्या सवयी शिकण्यास मदत करणे, तरुणांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आणि शेतकऱ्यांसाठी कल्याण करायचे आहे.

यशोधराने आपल्या शिक्षणासंदर्भात असे म्हटले की, मी जॉर्जियात न्यू विजन युनिव्हर्सिटी मध्ये एमबीबीएसचा कोर्स करत आहे. सध्या मी चौथ्या वर्षात असून कोर्स पूर्ण होण्यासाठी आणखी दीड वर्ष शिल्लक आहे.

परिवारासह, गावातील लोक सुद्धा आनंदित
तिने असे म्हटले की, जेव्हा माझ्या गावात निवडणूकीची घोषणा झाली तेव्हा स्थानिक लोकांना वाटत होते की, आमच्या परिवारातील कोणीतरी सरपंच पदासाठी निवडणूक लढवावी. तेव्हा मला निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. मला माझ्या घरातील मंडळींचा फोन आला तेव्हा मी जॉर्जियातून परतली. निवडणूक लढवली आणि माझा विजय झाला

यशोधरा हिचे वडिल सुद्धा यामुळे आनंदित आहेत. त्यांनी मुलीला परदेशातून बोलावून चूक केली असे आता त्यांना अजिबात वाटत नाही. यशोधरा आपले शिक्षण सुद्धा पूर्ण करणार आहे आणि राजकरण सुद्धा समजून घेणार आहे. गावाच्या विकासासाठी सरपंचाच्या रुपात काही योजनांबद्दल तिला विचारले असता, तिने असे म्हटले की, माझे लक्ष महिलांच्या मुद्द्यांवर आहे.(Maharashtra Gram Panchayat Election)

हे देखील वाचा- इंजिनिअर ते मोदी यांचे आवडते नेते म्हणून ओळख असणाऱ्या भूपेंद्र पटेल यांचा ‘असा’ आहे राजकीय प्रवास

महिला आणि मुलांवर अधिक लक्ष
यशोधरा हिने असे म्हटले की, महिला आपल्या आयुष्यात काय काय करु शकतात हे साध्य करुन दाखवण्यासाठी त्यांना संधी दिली पाहिजे. तसेच त्यांना मला शिक्षित आणि स्वतंत्र बनवायचे आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या प्राथमिकता यादीत मुलांचे कल्याण आणि त्यांचा शिक्षणाचा समावेश आहे.

यशोधरा शिंदे असे ही म्हणाली की, मी मुलांना ई-लर्निंग आणि नव्या शिक्षण व्यवस्थेबद्दल सांगू इच्छिते. मला, गावात शौचालय बांधणीच्या दिशेने काम करायचे आहे. तसेच महिला आणि तरुणींसाठी सॅनिटरी नॅपकिनची सहज उपलब्धता सुनिश्चित करायची आहे. तसेच मुलांनी उत्तम आरोग्याच्या सवयी अंगवळणी लावल्या पाहिजेत. त्याचसोबत मी गावाच्या विकासाच्या अजेंड्यावर तरुणांसह काम करेन असे ही म्हटले आहे. गावातील ७०-८० टक्के लोक ही कृषी सेक्टरमधील आहेत. त्यामुळे सातत्याने त्यांच्या विकासासाठी सुद्धा मला काम करायचे आहे असे तिने म्हटले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.