Home » ऑनलाइन बेटींग प्लॅटफॉर्ममुळे तमन्ना भाटीया अडचणीत

ऑनलाइन बेटींग प्लॅटफॉर्ममुळे तमन्ना भाटीया अडचणीत

by Team Gajawaja
0 comment
tamannaah2
Share

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटीया (Tamannaah Bhatia) हिला महाराष्ट्र सायबर सेलनेमहादेव बेटींग‘ प्रकरणी समन्स धडल्याने ती चर्चेत आली. हे प्रकरण ‘फेयरप्ले अॅप’शी संबंधित आहे जे महादेव गेमिंग आणि सट्टेबाजी अॅपशी संबंधित आहे.

या प्लॅटफॉर्मवरुन २०२३ चा आयपीएल सीझन अवैधरित्या दाखवला गेला होता. याचप्रकरणात सर्वप्रथम रॅपर बादशाह आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांना समन्स धाडण्यात आले होते, परंतु त्यांनी या चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी काही दिवसांची मुदत मागून घेतली. या सेलिब्रिटीजनी आयपीएल पाहण्यासाठी हा प्लॅटफॉर्म प्रमोट केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

आता यापाठोपाठ अभिनेत्री तमन्नालादेखील (Tamannaah Bhatia) समन्स धाडण्यात आले आहेत. आयपीएलचा हा सामना अवैध रित्या दाखवल्याने व्हायाकॉम कंपनीलाही प्रचंड नुकसान झाले होते.

हा प्लॅटफॉर्म प्रमोट करणाऱ्या सेलिब्रिटीजमध्ये तमन्नाचंही नाव असल्याने आता तिला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. २९ एप्रिलला तमन्नाला (Tamannaah Bhatia) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

tamannaah

 

या प्रकरणी एक साक्षीदार म्हणून तमन्नाचं (Tamannaah Bhatia) स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाणार असून या अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी कुणी संपर्क साधला, आणि तिला यासाठी किती रुपये मिळाले असे प्रश्न तिला विचारले जाण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी आतापर्यंत रॅपर बादशहाचं स्टेटमेंट देखील घेण्यात आलं आहे. याबरोबरच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिजलाही याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

===

हेदेखील वाचा : आफ्रिकेच्या लाखो गाढवांच्या तस्करीला चीन कारणीभूत

===

डिसेंबर २०२३ मध्ये या प्लॅटफॉर्मच्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. ‘महादेव ऑनलाइन अॅप’ हे ऑनलाईन बेटींग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते पोकर, कार्ड गेम्ससारखे बरेच गेम्स ऑनलाइन खेळतात. (Tamannaah Bhatia)

या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉलसारख्या खेळांच्या सामन्यावर बेटींग केलं जातं. इतकंच नव्हे तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निवडणुकांवरसुद्धा बेटींग केलं जातं. सुरुवातीला लोकांचा जबरदस्त फायदा करून देणाऱ्या या प्लॅटफॉर्मने नंतर लोकांची फसवणूक करायला सुरुवात केली.

 

mahadev-betting

 

या प्लॅटफॉर्मचा सर्वेसर्वा दुबईमध्ये आहे. याचे दोन्ही प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल हे दुबईत स्थित आहेत आणि तिथूनच ते हा सगळा कारभार सांभाळतात. या प्लॅटफॉर्ममधून मिळणारा ८०% नफा ते स्वतःकडे ठेवतात. या अॅपशी जोडलेल्या वेबसाइटवर तुम्हाला बऱ्याच सेलिब्रिटीजचे प्रमोशनल व्हीडिओज पाहायला मिळाले. (Tamannaah Bhatia)

श्रद्धा कपूर, शक्ति कपूर, बोमन इराणी, कपिल शर्मा, विवेक ओबेरॉय, हुमा कुरेशीसारख्या बड्या कलाकारांची नावेही सध्या समोर आली आहेत. आता या प्रकरणी तमन्ना भाटीया (Tamannaah Bhatia) नेमकी काय पावलं उचलणार ते लवकरच समोर येईल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.