Home » उत्तरप्रदेश प्रयागराज येथे 2025 मध्ये महाकुंभ होणार

उत्तरप्रदेश प्रयागराज येथे 2025 मध्ये महाकुंभ होणार

by Team Gajawaja
0 comment
Mahakumbh 2025
Share

उत्तरप्रदेश प्रयागराज येथे 2025 मध्ये महाकुंभ होणार (Mahakumbh 2025) आहे.  13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेच्या स्नान उत्सवापासून महाकुंभ सुरू होणार आहे.  त्यानंतर 45 दिवसांनी, म्हणजे 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीला महाकुंभ संपणार आहे.  जगभरातील हिंदू धर्मियांसाठी हा सर्वात महत्त्वाचा काळ असतो.  महाकुंभच्या निमित्तानं प्रयागराजमध्ये आत्तापासूनच मोठ्या प्रमाणात विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे.  मात्र या सर्वात अजून एका बातमीनं लक्ष वेधून घेतलं आहे, ती बातमी म्हणजे, हिंदू आचारसंहिता. 

351 वर्षानंतर हिंदू आचारसंहिता तयार करण्यात आली आहे.  यात यज्ञ करणाऱ्या महिलांपासून ते विवाहापर्यंत अशा अनेक नियमावली बनवण्यात आल्या आहेत.  2025 मध्ये होणा-या महाकुंभात (Mahakumbh 2025) हिंदू आचारसंहिता जाहीर केली जाणार आहे.  काशी विद्वत परिषद आणि देशभरातील विद्वानांनी या आचारसंहितेसाठी गेली चार वर्ष अभ्यास आणि विचारमंथन केले आहे.  देशभरातील मान्यवरांची मते घेतली आहेत.  त्यानंतर तयार झालेली ही हिंदू आचारसंहिता 2025 मध्ये होणा-या महाकुंभमध्ये धर्मपरिषदेसमोर ठेवण्यात येणार असून त्यानंतर ती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.  

2025 मध्ये होणारे महाकुंभ (Mahakumbh 2025) अनेक दृष्टीने विशिष्ट होणार आहे. त्यात 351 वर्षांनंतर हिंदू आचारसंहिता देशासमोर येणार आहे. काशी विद्वत परिषदेने ही आचारसंहिता तयार केली आहे.  जातिभेद, कुप्रथा नष्ट करणे, दलितांना मंदिरात पूजा करण्याचा अधिकार देणे यासह अनेक विकसित विचारांचा यात समावेश करण्यात आला आहे.  तसेच हिंदू धर्मातील तरुणांना आपल्या धर्माची शास्त्रशुद्ध माहिती देण्याचाही यातून प्रयत्न होणार आहे.  तसेच हिंदू धर्मात काही चालीरितींमध्ये अनावश्यक खर्च करण्यात येतो, त्यालाही पायबंध घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

यासाठी काशी विद्वत परिषद आणि देशभरातील विद्वानांच्या संघानं चार वर्ष अभ्यास केला आहे. प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभात शंकराचार्य आणि महामंडलेश्वर या आचारसंहितेवर अंतिम शिक्कामोर्तब करतील.  त्यानंतर धर्माचार्य देशातील जनतेला ही नवीन हिंदू आचारसंहिता स्वीकारण्याचे आवाहन करणार आहेत.  ही आचारसंहिता तयार करण्यामागे देशाचे एकीकरण आणि सनातन धर्माला बळकटी देणे, तहे उद्देश असल्याचे काशी विद्वत परिषदेने स्पष्ट केले आहे. तसेच कर्म आणि कर्तव्यावर आधारित ही हिंदू आचारसंहिता आहे.  यात श्रीमद भागवत गीता, रामायण, महाभारत आणि पुराणातील उतारे समाविष्ट करण्यात आल्याची माहितीही काशी विद्वत परिषदेने दिली आहे.  

हिंदू आचार संहिता तयार करण्यासाठी काशी विद्वत परिषदेने 70 विद्वानांच्या 11 संघ आणि तीन उप-संघ तयार केले होते. प्रत्येक संघात उत्तर आणि दक्षिणेतील प्रत्येकी पाच विद्वान सदस्य होते.  यात सहभागी झालेल्या अभ्यासकांनी मनुस्मृती, पराशर स्मृती आणि देवल स्मृती यांचाही आधार हिंदू आचारसंहिता तयार करण्यासाठी घेतला आहे.

महाकुंभात प्रथमच हिंदू आचारसंहितेच्या एक लाख प्रती वितरणासाठी छापल्या जाणार आहेत. यानंतर देशातील प्रत्येक शहरात 11 हजार प्रती वितरित केल्या जातील.  या आचारसंहितेत हिंदूंना मंदिरात बसून पूजा करण्यासाठी समान नियम करण्यात आले आहेत. महिलांना अशुद्ध अवस्थेशिवाय वेदांचा अभ्यास आणि यज्ञ करण्याची परवानगी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रात्री होणा-या विवाहाऐवजी दिवसा विवाह करण्याचे सूचित करण्यात आले आहे.  तसेच विधवा पुनर्विवाह पद्धतीचाही समावेश करण्यात आला आहे. (Mahakumbh 2025)

=============

हे देखील वाचा : व्यापार-उद्योगधंद्यात नुकसान आणि घरात सतत वाद होतात? करा ‘हे’ उपाय

=============

हिंदू आचारसंहितेत प्रत्येक विधींचा बारकाईनं अभ्यास करण्यात आला आहे.  यात सोळा विधी अधिक सुलभरित्या करण्यात आले आहेत. विशेषत: अंत्यसंस्कारानंतर होणा-या जेवणावरही मर्यादा आणण्यात आली आहे.   मृत व्यक्तीच्या होणा-या विधींना किमान 16 ची संख्या निश्चित करण्यात आली आहे.  तसेच प्रार्थना, उपवास, तीर्थयात्रा आणि धार्मिक सणांमध्ये सहभागी होणा-या तरुण पिढीचे प्रमाण वाढवण्यासाठी आवाहन आहे.  याशिवाय काही खाद्यपदार्थ आणि खाण्याच्या सवयींवर बंधने घालण्याचेही आवाहन आहे.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पेहरावाबाबत नियम करण्यात आले आहे.  धार्मिक स्थळी जातांना कपडे आणि दागिने कसे असावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

काशी विद्वत परिषदेने तयार केलेली ही आचारसंहिता महाकुंभ 2025 मध्ये सादर करण्यात येणार आहे.  त्यापूर्वी त्यामध्ये आणखी काही हिंदू धर्मातील विधींचा अभ्यास करुन सुधारणा सुचवण्यात येणार आहेत.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.