प्रयागराजमधील महाकुंभमध्ये रोज करोडो भाविक येत असून पवित्र त्रिवणी संगमावर स्नान करीत आहेत. या महाकुंभनिमित्त प्रयागराजमधील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. जगभरातील हिंदू धर्मियांचे गुरु, आणि साधू संत या महाकुंभमध्ये आलेले आहेत. हेच निमित्त साधून महाकुंभमध्ये येत्या 27 जानेवारीला धर्म संसदेचे आयोजन केले आहे. या धर्मसंसदेमध्ये देशभरातील 13 आखाड्यांचे प्रमुखही सामिल होत असून यासोबत अनेक मान्यवर कथावाचक आणि साधू, संत सहभागी होणार आहेत. देशभरात वक्फ बोर्डोकडून जमिन ताब्यात घेण्यात येत आहे. महाकुंभ जिथे भरला आहे, ती प्रयागराजची जमिनही वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळेच या वक्फ बोर्डाच्या आधारावर हिंदू धर्मियांसाठी सनातन बोर्ड स्थापन करावे अशी प्रमुख मागणी या धर्म संसदेमध्ये कऱण्यात येणार आहे. (Prayagraj)

याशिवाय महाकुंभामध्ये असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या शिबिरात 25 जानेवारी रोजी संतांचे संमेलन होणार आहे. या संत परिषदेत साधु आणि ऋषीमुनींचे मत घेऊन काशी आणि मथुरा या हिंदू धर्मियांच्या पवित्र पूजनीय स्थानांची मुक्ती करण्याची रणनिती आखण्यात येणार आहे. यासंदर्भातील विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन कधी चालू होईल, याचीही घोषणा या संत परिषदेमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळेच महाकुंभमधील या दोन्हीही परिषदांकडे देशाचे लक्ष लागले आहे. महाकुंभमध्ये सामिल झालेल्या साधू संतांनी सनातन बोर्डची मागणी केली आहे. याबाबत कथाकार देवकीनंदर ठाकूनर यांनी पुढाकार घेत धर्म संसदेचे आयोजन केले आहे. ही धर्म संसद महाकुंभमध्ये 27 जानेवारी रोजी होणार आहे. यात देशभरातील 13 आखाड्यांचे प्रमुख आणि सनातन धर्माचे जगभरातील उपासक सामिल होणार आहेत. जगभरातील सर्व सनातनींना एकाच छताखाली आणणे हा या धर्म संसदेचे उल्लेख आहे. याच धर्म संसदेच्या मार्फत भारत सरकारपुढे सनातन बोर्डाची प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षापासून अनेक साधू संतांनी सनातन बोर्डाची मागणी केली आहे. वक्फ बोर्डाकडे असलेल्या जमिनीबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. (Social News)
वक्फ बोर्डाच्या ताब्यात देशभरातील 9 ते 10 लाख जमिन असल्याची माहिती सनातन बोर्डाची आग्रहानं मागणी करणा-या महंत रवींद्र पुरी यांनी दिली. ही जमिन वक्फ बोर्डाकडे कशी आली याची साधी माहितीही सरकारकडे नाही, याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. अनेक मंदिरांच्या जमिनी आणि गावांवरही वक्फ बोर्डानं दावा केल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र हिंदू मंदिरांवर सरकारचा ताबा आहे. या मंदिरामध्ये भक्तांकडून देण्यात येणा-या वर्गणीवर सरकारची मालकी असते. या पैशाचा समाजातील सर्वांसाठी उपयोग होतो. मात्र देशभरातील वक्फ बोर्डांच्या मालकीवर सरकारचा ताबा का नाही, असा सवालही त्यांनी केला आहे. या सर्वांतून समानत हवी म्हणूनच सनातन बोर्डाची स्थापना होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. धर्म संसदेमध्ये या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी सनातन बोर्डाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यासाठी सर्व साधु, संत आणि मठ, मंदिरांची संमती घेण्यात येणार आहे. सनातन मंडळात सर्व 13 आखाड्यांमधील संत पदाधिकारी असतील. यासाठीची सर्व माहिती 27 रोजी होणा-या धर्म संसदेत देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी असतील. धर्म संसदेत फक्त भारतातीलच नव्हे तर परदेशातीलही साधू, संत सहभागी होणार आहेत. (Prayagraj)
================
हे देखील वाचा : Trump And Musk : ट्रम्प आणि मस्क कट्टर विरोधक ते पक्के मित्र !
Saif Ali Khan : पतौडी कुटुंबाचा शेवटचा नवाब
================
धर्म संसद 27 रोजी होणार आहे, मात्र याआधी विश्व हिंदू परिषदेने 25 जानेवारी रोजी संत संमेलनाचे आयोजन केले आहे. यामध्ये अयोध्याप्रमाणे काशी आणि मथुरा येथील मंदिरे पूर्णपणे मुक्त करण्याच्या चळवळीच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्यामुळे या संत परिषदेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी याबाबत माहिती दिली असून संत समुदाय आता तीर्थस्थळांना अतिक्रमणांपासून मुक्त करण्यासाठी पुढे येणार असल्याचे सांगितले. 1989 मध्ये, विहिंपने कुंभमेळा प्रयागराज येथूनच राम मंदिर चळवळ सुरू केली होती. त्यातून सुरु झालेल्या आंदोलनातून 1992 मध्ये अयोध्येतील रामजन्मभूमीवरील वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली. आता तिथेच श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. त्यामुळेच आता विश्व हिंदू परिषदेच्या संत परिषदेत काय निर्णय घेण्यात येत आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Social News)
सई बने
