हिंदू धर्मात गणेशास प्रथा पूजनीय असल्यास मान मिळाला आहे. प्रथमपुज्य असणारा श्री गणेश आपल्या सर्वच लोकांचे आराध्य आणि लाडके दैवत आहे. चौदा विद्या चौसष्ट काळाचा अधिपती असलेल्या गणेशाची लवकरच जयंती साजरी होणार आहे. संक्रांतीचा सण साजरा झाला की, सगळीकडे तयारी सुरु होते माघी गणपतीची. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. यंदा २२ जानेवारी रोजी माघी गणपती असणार आहे. (Maghi Ganpati)
पुराणानुसार गणपतीचे तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिल्या अवताराचा जन्मदिन वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीला साजरा केला जातो. दुसऱ्या अवताराचा जन्मदिन भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश जन्मदिवस साजरा होतो. हा जन्मदिन संपूर्ण जगामध्ये गणेशोत्सव म्हणून साजरा होतो. तर तिसऱ्या अवताराचा जन्मदिन माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीला साजरा केला जातो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. (Marathi)
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो. तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची परंपरा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते, भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढय़ा मोठय़ा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. (Todays Marathi Headline)

गणपतीने पृथ्वीचे राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी आणि या दृष्ट राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे सांगितले जाते. पहिली अवतार म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते. दुसरा अवतार म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी अर्थात गणेशचतुर्थी. या दिवशी गणपतीच्या मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते, तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती म्हणजेच माघी गणेशोत्सव म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ आणि साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते. (Top Marathi News)
गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणले जाते. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी प्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे. या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असेही म्हणले जाते. गणेश जयंती माघी विनायक चतुर्थीला असते. त्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला. जे लोक गणेश जयंतीचे व्रत ठेवून गणपती महाराजांची आराधना करतात त्यांचे सर्व संकट दूर होऊन त्यांचे कार्य सफल होते. (Latest Marathi Headline)
माघी गणपतीला अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात गणेशाची स्थापना केली जाते आणि विधिवत पूजा केली जाते. यासोबतच घरोघरी देखील गणपती बाप्पाची यथासांग पूजा होते. एक दिवसासाठी गणेशाची स्थापना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. या तिथीला स्नान, दान,जप व होम केल्यामुळे या विघ्नविनायकाची कृपादृष्ट सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते असे म्हणतात. गणेश पुराणानुसार, माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. (Top Trending News)
=========
Maghi Ganpati : गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमधील फरक
=========
गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असेही म्हणतात. या दिवशी ढुंढिराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते. काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते. (Social News)
(टीप : येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
