Home » Viral Nike Tracksuit : कोणाचं काय आणि कोणाचं काय….

Viral Nike Tracksuit : कोणाचं काय आणि कोणाचं काय….

by Team Gajawaja
0 comment
Viral Nike Tracksuit
Share

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेच्या सैन्यानं ताब्यात घेतलं. अवघ्या अर्धा तासाच्या या कारवाईनंतर मादुरो यांना अमेरिकेच्या एलिट डेल्टा फोर्सने मादुरोंना रातोरात अमेरिकेत आणलंही. हातात बेड्या घातलेल्या मादुरोंचा फोटो सर्वत्र झळकला आणि अमेरिकेच्या या कारवाईनं अवघ्या जगाला मोठा धक्का बसला. डेल्टा फोर्सचे जवान मादुरो यांना पकडून नेत असतांना त्यांच्या हातात बेड्याही घालण्यात आल्या होत्या. या बेड्या घातलेल्या हातात मादुरो यांनी एक पाण्याची बाटली पकडली होती. एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाची अमेरिकेनं केलेली ही अवस्था पाहून अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी अमेरिकेच्या दादागिरीपुढे नमते घेतले. ( Viral Nike Tracksuit )

पण या सर्वात सोशल मिडियावर काय चालू होते, याचा शोध घेतला तर आणखी धक्कादायक माहिती पुढे येते. कारण निकोलस मादुरो यांना अटक झाल्यावर त्यांचे हातात बेड्या घातलेले फोटो सर्वाधिक व्हायरल झाले. मादुरो यांना अमेरिकेच्या सैन्यानं ताब्यात घेतलं, तेव्हा त्यांनी ट्रॅक सूट घातला होता. त्यामुळे हा ट्रॅक सूट कुठला आहे, याची शोधाशोध सुरु झाली. मादुरो यांच्या अटकेनंतर जे फोटो आले, त्यात अगदी बारीक अक्षरात हा नायकेच्या नावाचा लोगो दिसत होता.

Viral Nike Tracksuit

Viral Nike Tracksuit

पण सोशल मिडियावर अनेक कलाकार असतात. याच कलाकारांनी मग मादुरो कुठला ट्रॅकसूट घालतात याचा शोध लावला. एकदा हा शोध लागवल्यावर मग काय, त्या कंपनीच्या ट्रॅकसूटच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. इकडे मादुरो यांना न्यायालयासमोर उभं करण्यात येईपर्यंत त्यांनी घातलेल्या ट्रॅकसूटची मागणी एवढी वाढली, की कंपनीला काही काळ हा ट्रॅकसूट स्टॉकमध्ये नाही, अशा शब्दात ग्राहकांची माफी मागवी लागली. ( Viral Nike Tracksuit )

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांची अटक ही जगासाठी धक्कादायक बातमी ठरली. मादुरोंच्या हातात बेड्या घातलेले फोटो समोर आले, आणि अमेरिकेची ही कृती बरोबर की चूक याची चर्चा सुरु झाली. पण ही चर्चा सुरु असतांना सोशल मिडियावर मादुरो हे कुठल्या ब्रॅण्डचा ट्रॅकसूट घालतात याची शोधाशोध सुरु झाली. मादुरो यांचा जो फोटो आला, त्यात त्यांनी नायके या कंपनीचा ट्रॅकसूट घातला होता. त्या ट्रॅकसूटची भारतात किंमत ९००० रुपये आहे.

निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर, अगदी तासाभरातच त्यांनी घातलेला राखाडी रंगाचा नायके ब्रँडेड फ्लीस ट्रॅकसूट एकदम लोकप्रिय झाला. हा फोटो जेवढा व्हायरल झाला, तेवढी या ट्रॅकसूटला मागणी येऊ लागली. लोकांनी मादुरो यांनी घातलेल्या सारखाच ट्रॅकसूटची ऑनलाईन ऑर्डर करण्यास सुरुवात केल्यावर, कंपनीलाही अचानक काय झालं आहे, याचा अंदाज आला नाही. त्यातही फक्त राखाडी रंगाच्या ट्रॅकसूटला अधिक पसंती देण्यात येत होती. मादुरो यांना अटक झाल्यावर तीन तासात हे ट्रॅकसूट स्टॉकमध्ये नाहीत, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. भारतात या नायके फ्लीस ट्रॅकसूटची किंमत ६००० ते ९००० रुपयांपर्यंत आहे. अमेरिकेचा नायके हा लोकप्रिय ब्रॅण्ड आहे. ज्या देशानं मादुरो यांना अटक केली, त्याच देशाचे कपडे मादुरो वापरतात, हे उघड झाल्यावर त्यांच्यावर आणि नायकेच्या या ट्रॅकसूटवर मीम्सचा पाऊसही सुरु झाला. ( Viral Nike Tracksuit )

=======

हे देखील वाचा : Venezuela : मादुरो यांच्या वकीलाचं नाव ऐकून ट्रम्प प्रशासनही हादरले…

=======

मादुरो यांनी घातलेल्या या राखाडी रंगाच्या ट्रॅकसूटबाबत अनेकांनी गुगलवरही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गुगल ट्रेंड्स सर्चनुसार, जगभरातील लाखो लोकांनी विचारले की, मादुरोंनी कोणत्या ब्रँडचा ट्रॅकसूट घातला आहे. व्हेनेझुएला, अमेरिका, त्रिनिदाद टोबॅगो, जमैका आणि चिली सारख्या देशांमध्ये या ट्रॅकसूटसाठी शोध वाढला. त्यानंतर मादुरोच्या लूकबद्दल आणि नायकेच्या या ट्रॅकसूटबद्दल मीम्स सोशल मीडियावर शेअर होऊ लागल्या. ( Viral Nike Tracksuit )

अमेरिकेतील प्राख्यात स्पोर्ट्स ब्रँड असलेल्या नायके हा टेक फ्लीस त्याच्या आरामदायी आणि स्टायलिश स्पोर्ट्सवेअरसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू नायके ब्रॅण्डचे कपडे आणि शूज वापरतात. याच नायकेला निकोलस मादुरो यांची अटक ही फायद्याची ठरली आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.