पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे कायम वादात असतात. त्यांचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख होणे ते लष्करी अधिका-यांच्या उपस्थितीत बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये जाणे, आदी सर्वांमुळे पाकिस्तानच्या या फील्ड मार्शलवर टीका कऱण्यात आली आहे. आता नव्यानं झालेली एक घटना चर्चेत आली आहे, त्यामुळे असीम मुनीर पुन्हा चर्चेत आले आहेत. असीम मुनीर यांच्या तिस-या मुलीचा विवाह नुकताच झाला. पाकिस्तानमधील अत्यंत हायप्रोफाईल अशा या विवाहाची बातमी खूप गुप्त ठेवण्यात आली. आता ही आनंदाची बातमी असीम मुनीर यांनी गुप्त का ठेवली, याचे रहस्य खुले झाले आहे. कारण मुनीर यांनी आपल्या या तिस-या मुलीचे लग्न आपल्याच भावाच्या मुलाशी करुन दिले आहे. मुनीर यांचा भाऊ कासिम मुनीर यांचा मुलगा अब्दुर रहमान हा आता असीम मुनीर यांचा पुतण्या आणि जावईही झाला आहे. मुनीर यांच्या तिस-या मुलीचा, महनूरच्या या विवाहानं पुन्हा पाकिस्तानमधील लग्नसंस्थेबद्दल टीका सुरु झाली आहे. नात्यानं बहिण असलेल्या मुलीसोबत लग्न करणे हे कितपत योग्य असल्याचा प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र असीम मुनीर यांनी आपल्या मुलीच्या या विवाहामध्येही आपला स्वार्थ अधिक बघितल्याची माहिती आहे. कारण त्यांचा जावई हा सहाय्यक आयुक्त असून मुनीर भविष्यात त्याला पाकिस्तानी सरकारमध्ये मोठं पद देण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ( Asim Munir )

Asim Munir
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या तिस-या मुलीचे लग्न नुकतेच गुपचूप पार पडले. या लग्नाची बातमी अतिशय गुप्त ठेवण्यात आली कारण असीम मुनीर यांनी आपल्या सख्या भावाच्या मुलालाच आपला जावई करुन घेतले आहे. असिम मुनीर यांचा हा जावई पूर्वी सैन्यात कॅप्टन होता पण नंतर नागरी सेवेत सामील दाखल झाला आहे. रावळपिंडीमध्ये झालेल्या या विवाह समारंभाचा एखादा फोटोही पाकिस्तानी सोशल मिडियावर झळकला नाही, एवढी त्याबाबत गुप्तता राखली गेली, ती याच गोष्टीमुळे. सख्या भावाचे आणि सख्या बहिणीचे झालेल्या या लग्नावर टीका होईल, अशी भीती असिम मुनीरला होती, त्यामुळे या लग्नाला पाकिस्तानमधील निवडक लोकांना आमंत्रण देण्यात आले होते. ( Asim Munir )
फील्ड मार्शल असीम मुनीर याचा भाऊ कासिम मुनीरचा मुलगा अब्दुर रहमान हा पूर्वी पाकिस्तानी सैन्यात कॅप्टन पदावर होता. मात्र आता त्यानं या कॅप्टन पदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तानमध्ये, नागरी सेवेत लष्करी अधिकाऱ्यांसाठी कोटा आहे. या कोट्याचा फायदा घेन अब्दुल रहमान आता सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत आहे. याच अब्दुलचे आता असिम मुनीरला यांच्या तिस-या मुलीबरोबर, महनूरसोबत लग्न झाले आहेत. रावळपिंडी येथील आर्मी हाऊसच्या लॉनमध्ये हा विवाह सोहळा झाला. सुरक्षेच्या कारणामुळे असीम मुनीर यांनी कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा हॉलमध्ये हा विवाह केला नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. या विवाहाला पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शाहबाज शरीफ, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांच्यासह अनेक काही मोजक्या प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. सोबतच अनेक निवृत्त जनरल आणि लष्कर प्रमुखांनीही लग्नाला हजेरी लावली. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, हे याच लग्नाच्या निमित्तानं पाकिस्तानला आल्याची माहिती आहे. मात्र युएईचे अध्यक्ष लग्नाला उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी फक्त पाकिस्तानच्या विमानतळावरच आपली हजेरी लावली आणि ते परत गेले. ( Asim Munir )
=======
हे देखील वाचा : Bangladesh News : बांगलादेशात पत्रकारांचे जगणं झालंय कठीण
=======
पाकिस्तानचा सर्वेसर्वा असलेल्या असीम मुनीरच्या मुलीच्या लग्नाला फक्त ४०० पाहुणे उपस्थित असल्याची माहिती आहे. आर्मी हाऊसमध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये हा सोहळा झाला. त्यामागे दोन प्रमुख कारणे सांगण्यात येत आहेत. एकतर सध्या असीम मुनीर यांनां त्यांच्यावर हल्ला होईल अशी प्रचंड भीती वाटत आहे. या भीतीपोटीच मुनीर झोपतांना सुद्धा बुलेटप्रुफ जॅकेट घालत असल्याची माहिती आहे. शिवाय नात्यात झालेल्या या विवाहामुळे टीका होईल, अशीही भीती वाटत असल्यामुळे हा विवाह गुपचूप उरकण्यात आला. असीम मुनीर यांच्या पत्नीचे नाव सय्यदा इरुम आहे. असीम मुनीर यांचे बालपण रावळपिंडी येथील एका मदरशात गेले, तिथे त्यांचे वडील इमाम होते. याच मदरशात मुनीरचेही शिक्षण झाले असून त्यामुळेच मुनीरचे विचार हे कट्टरवादी आहेत. ( Asim Munir )
सई बने
