Home » ती पाहतांच बाला कलिजा खलास झाला

ती पाहतांच बाला कलिजा खलास झाला

by Team Gajawaja
0 comment
Luana Alonso
Share

ती पाहतांच बाला, कलिजा खलास झाला,
छातीत इष्कभाला, कीं आरपार गेला

आचार्य अत्रे लिखित लग्नाची बेडी या नाटकातील हे प्रसिद्ध गाणं याच आशयासारखे एक गाणे सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिंम्पिक २०२४ मध्ये गाजलं आहे. त्याला कारण ठरली आहे ती लुआना अलोन्सो ही सुंदरी. पराग्वेची या देशाची जलतरणपटू असलेल्या लुआना अलोन्सोला ऑलिंम्पिक समितीनं ऑलिंम्पिक शहर सोडण्याचे आवाहन केले. त्याला कारण म्हणजे, लुआनाचे सौंदर्य आणि त्यावर घेतलेला अन्य खेळाडूंनी आक्षेप. पराग्वेची जलतरणपटू असलेली लुआनाला कमालीची सौंदर्यवान आहे. (Luana Alonso)

तिच्या या सौंदर्यामुळे अनेक खेळाडूंचे लक्ष विचलीत होत असल्याचा आरोप करण्यात आला. हा आक्षेप मान्य करत लुआनाला ऑलिंम्पिक शहर सोडण्यास सांगितले आहे. इकडे भारतात कुस्तीपटू विनेश फोगटने वजन वाढल्यामुळे गमावलेली गोल्ड मेडलची संधी, यावर मोठा वादविवाद सुरु आहे. दुसरीकडे लुआनाने आपल्यावर घेतलेला आक्षेप मान्य करीत ऑलिंम्पिक व्हिलेजला टाटा केला आहे. तिच्यावर घेतलेला हा आक्षेप खरं म्हणजे, तिच्या सौंदर्याचा अपमान होता. ती यावर ऑलिंम्पिक समितीला कोर्टात खेचू शकतली असती. पण लुआनाने यातील काहीही न करता शांतपणे आपल्या देशात निघून आली. तिच्या या खेळाडू वृत्तीचे कौतुक होत आहे. (Luana Alonso)

पॅरिस ऑलिंम्पिक आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशातच एका खेळाडूने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. ही खेळाडू म्हणजे, पराग्वे या देशाची जलतरणपटू लुआना अलोन्सो. २० वर्षाच्या या लुआनाचे नाव ऑलिंम्पिक व्हिलेजमध्ये बरेच गाजत आहे. लुआनाना ऑलिंम्पिक व्हिलेजमधील तिची खोली रिकामी करण्यास सांगण्यात आले. तसेच त्वरित ऑलिंम्पिक व्हिलेज सोडण्याचा सल्लाही देण्यात आला. कारण लुआना ही अत्यंत सुंदर युवती आहे. तिचे अनेक फोटो सोशल मिडियात धुमाकूळ घालत आहेत. असा सौंदर्यवतीचा वावर ऑलिंम्पिक व्हिलेजमध्ये असतांना अन्य खेळाडूंचे लक्ष विचलीत न झाले तर नवलच. लुआना विरोधात अशीच तक्रार करण्यात आली आहे. लुआना विरोधात काही खेळाडुंनी आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केली . त्यात लुआनाच्या सौंदर्यामुळे आपली एकाग्रता भंग होत असल्यासे स्पष्ट करण्यात आले होते. ही तक्रार आल्यावर अधिका-यांनी लुआनाला तिचे सामान बांधायला सांगितले. (Luana Alonso)

दरम्यान लुआना अलोन्सोने तिची निवृत्ती जाहीर केली आहे. जलतरणपटू असलेल्या लुआनाचे करिअर आत्ताच सुरु झाले होते. पण तिनं निवृत्ती जाहीर केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. १९ सप्टेंबर २००४ रोजी जन्मलेली लुआना बटरफ्लाय स्ट्रोक इव्हेंटमध्ये मास्टर आहे. लुआनाने १७ व्या वर्षी २०२० टोकियो ऑलिंम्पिकमध्ये पराग्वेचे प्रतिनिधित्व केले. तेव्हाही तिच्या सौंदर्यानं अनेकांचे लक्ष वेधलं होतं. मात्र तेव्हा जलतरणामध्ये ती २८ स्थानावर राहिली आणि उपांत्य फेरीत जाण्यात अपयशी ठरली. त्यानंतर तिने अमेरिकेतील डॅलस येथील सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठात प्रवेश घेतला. पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये तिनं अमेरिकेकडून प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश आल्यानं पराग्वेकडून ऑलिंम्पिकमध्ये प्रवेश मिळवला. परंतु यावेळीही ती सहाव्या स्थानावर राहीली. १०० मीटर बटरफ्लायमध्ये ती सेमीफायनलमध्ये जाण्यात अयशस्वी ठरली. केवळ ०.२४ सेकंदांनी लुआनानं पात्रता गमावली. त्यानंतर निराश होत तिने निवृत्तीची घोषणा केली. (Luana Alonso)

====================

हे देखील वाचा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वाटले गेले २ लाख कंडोम ?

===================

निवृत्तीच्या घोषणेनंतर ऑलिंम्पिक व्हिलेजमध्ये लुआना रहात होती. खेळाडू म्हणून ती ११ ऑगस्टपर्यंत या व्हिलेजमध्ये राहू शकली असती. मात्र इथे तिचे सौंदर्य आड आले. लुआनानं या ऑलिंम्पिक व्हिलेजमध्ये आपले अनेक फोटो काढून ते सोशल मिडियावर शेअर केले. त्यामुळे तिच्या सौंदर्याची तारीफ सर्वच करु लागले. लुआना या ऑलिंम्पिक व्हिलेजमध्ये सर्वाधिक पसंतीची खेळाडू ठरली. ती जिथे जात असे, तिथे ती अनेकांचे लक्ष वेधून घेत असे. अशातच खेळाडूंच्या खेळावरही तिच्या उपस्थितीचा परिणाम होऊ लागला. लुआना आली की आपले लक्ष विचलीत होते, अशी तक्रार मग खेळाडूंनी केली. मग काय,ऑलिंम्पिक व्हिलेजमधून चक्क तिला बाहेर जाण्यास सांगण्यात आले. लुआनानं हा निर्णय खेळाडूपणानं स्विकारला असून तिनं ऑलिंम्पिक व्हिलेजला रामराम केला आहे. (Luana Alonso)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.