मध्य प्रदेशातील महेश्वर या नगरीची स्थापना देवी अहिल्यादेवी होळकर यांनी केली आहे. महेश्वरमध्ये देवी अहिल्यादेवी यांनी अनेक मंदिरे बांधली आहेत. त्यापैकी एक मंदिर म्हणजे, भगवान जगन्नाथ मंदिर. ओडिशा, पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिरात जे धार्मिक सोहळे होतात, तिथे जशी रथयात्रा होते, तसाच सोहळा महेश्वरमध्ये व्हावा या उद्देशानं हे भगवान जगन्नाथ मंदिर उभारण्यात आलं. माता नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या या भगवान जगन्नाथ मंदिरात, भगवान जगन्नाथांसह, भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा यांच्याही मूर्ती स्थापित आहेत. महेश्वर येथील जगन्नाथ मंदिरात दरवर्षी स्नान पौर्णिमा आणि रथयात्रा यासारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. (Maheshwar Nagar)
आता या मंदिरातही देवाचे स्नान झाले असून भगवान जगन्नाथ या स्नानामुळे आजारी पडले आहेत. आजारी असलेले भगवान जगन्नाथ 15 दिवस आराम करणार असून, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मंदिरातील पुजारी वेगवेगळ्या जडीबुटींचा काढा तयार करीत आहेत.
माता नर्मदेच्या काठावर असलेल्या महेश्वरमध्ये भगवान जगन्नाथ मंदिर हे भारतीय स्थापत्यशास्त्राचा अजोड नुमना मानण्यात येतं. देवी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या या मंदिरात भगवान विष्णूचे रूप असलेल्या भगवान जगन्नाथांची पुरी येथील जगन्नाथ मंदिराप्रमाणे आराधना करण्यात येते. येथेही भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा यांच्या मूर्ती स्थापित आहेत. या मंदिरातही सध्या रथयात्रेची तयारी चालू आहे. (Social News)
त्यासाठी मंदिरात गेल्या पंधरा दिवसापासून विविध धार्मिक विधी सुरु कऱण्यात आले आहेत. या सर्वात देवाचे स्नान हा प्रमुख विधी असतो. दरवर्षी स्नान पौर्णिमेला भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना नर्मदेच्या पाण्याने अभिषेक केला जातो. येथेही 108 घडे देवाच्या स्नानासाठी वापरले जातात. हे पाणी थंड असते. त्यामुळे या थंड पाण्यामुळे भगवान जगन्नाथ आजारी होतात. त्यानंतर पुढचे 15 दिवस भगवान जगन्नाथ विश्रांती करतात. आता या महेश्वरी येथील मंदिरातही आजारी असलेल्या भगवान जगन्नाथांना 15 दिवसांची विश्रांती देण्यात येत आहे. त्यानंतर महेश्वर येथेही 27 जून रोजी भव्य अशी रथयात्रा काढण्यात येणार आहे. भगवान जगन्नाथ यांच्यावर सध्या मंदिरात उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी हिमालयातील विशेष औषधी वनस्पती महेश्वरला आणण्यात येतात. महंत हृदय गिरी यांच्या देखरेखीखाली या वनस्पतींच्या पानांपासून काढा करण्यात येतो. यात तुळशी, पारित, जाअश्वगंधा, गिलॉय, नाकेगसर, लेंडी पीपळ यासह अन्य 15 औषधी वनस्पतींचा समावेश असतो. (Maheshwar Nagar)
हा औषधी काढा दररोज सकाळी आणि संध्याकाळी देण्यात येतो. याशिवाय देवाला या 15 दिवसात केशर-बदामाचे दूध, ताजे फळांचा रस आणि हलके अन्न देखील दिले जात आहे. यासोबत मलयगिरी चंदन, मुलतानी माती, मध, कापूर, हळद, गुलाबजल आणि कस्तुरीपासून तयार केलेला लेप भगवानांच्या शरीरावर लावला जातो. सेवेदरम्यान, प्रत्येक औषध आणि मलम देण्यापूर्वी मंत्रांचा जप केला जातो. या सर्वांमुळे भगवान जगन्नाथ लवकर बरे होतात, आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी पुन्हा तयार होतात. मंदिरातील पुजा-यांच्या सांगण्यानुसार घरातील लहान मुलं आजारी पडल्यावर त्यांची जशी काळजी घेतली जाते, त्यांचे कोडकौतुक केले जाते, तशीच काळजी भगवान जगन्नाथ यांची घेतली जाते. भगवान जगन्नाथ आजारी असतांना त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा हेही विश्रांती घेत असल्यामुळे मंदिराचे दरवाजे 15 दिवस भाविकांसाठी बंद करण्यात आले आहेत. (Social News)
===========
हे देखील वाचा : Jagganath Yatra : भगवान जग्गनाथची मूर्ती लाकडापासून का बनवली जाते?
===========
भगवान जगन्नाथ ही 15 दिवसांची विश्रांती घेतली की, रथयात्रेसाठी सज्ज होणार आहेत. 26 जून रोजी ब्रह्म मुहूर्तातील मंगला आरतीने मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले जाणार आहेत. या दिवशी भगवान जगन्नाथांची परंपरेनुसार पूजा करुन त्यांना पुन्हा त्यांच्या आसनावर विराजमान करण्यात येणार आहे. त्यानंतर दुस-या दिवशी, म्हणजे, 27 जून रोजी महेश्वर नगरमध्ये एक भव्य रथयात्रा काढण्यात येईल. पारंपारिक गाणी, संगीत, ढोलकी आणि भजन पथके यांच्यासह काढण्यात येणारी ही रथयात्रा संपूर्ण शहरात फिरते, यात हजारो भाविक सहभागी होतात. महेश्वरमध्येही या रथयात्रेसाठी भव्य असे रथ तयार कऱण्यात आले आहेत. (Maheshwar Nagar)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics