Lok Sabha Election 2024 : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी टप्प्याटप्प्याने मतदानाला सुरूवात झाली आहे. अशातच वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला निवडणुकीत मतदान करता येते. पण ऐन निवडणुकीत तुम्हाला मतदान कार्डसंबंधित काही माहिती हवी असल्यास एका एसएमएसच्या माध्यमातून मिळवू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
निवडणूक आयोगाद्वारे कोणत्याही मतदाराकडे मतदान कार्ड असणे अत्यावश्यक आहे. अशातच मतदान कार्ड नसल्यास तुम्ही आधार कार्ड, लाईट बीलासह अन्य ओखळपत्रांच्या माध्यमातूनही मतदान करू शकता. पण मतदान कार्डसंबंधित काही माहिती जाणून घ्यायचे असल्यास काय करावे?
पोलिंग बूथ जाणून घ्या
आपले मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट electoralsearch.eci.gov.in ला भेट द्या. यानंतर तुमचे वोटर आयडी कार्ड किंवा EPIC क्रमांक भरा. आता सिक्युरिटी कोड भरा. आता तुम्हाला तुमचे नाव, बूथ स्तर अधिकारी, आपला मतदारसंघ, विधानसभा सीट आणि मतदार केंद्राबद्दलची माहिती मिळेल.
मतदान कार्डच्या माध्यमातून जाणून घ्या महत्त्वाची माहिती
मतदान कार्डसाठी वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा. यामध्ये लॉग इन करून काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊ शकता. याशिवाय कॉलच्या माध्यमातूनही मतदान कार्डाविषयी जाणून घेऊ शकता. यासाठी 1950 वर कॉल करा. पण आधी एसटीडी कोड लावण्यास विसरू नका. मेसेजच्या माध्यमातूनही पोलिंग लोकेशन आणि वोटर कार्ड मिळवू शकता. यासाठी आपल्या रजिस्टर्ज मोबाइल क्रमांकावरून 1950 वर मेसेज आणि मागितलेले डिटेल्स भरा. यानंतर तुम्हाला मतदान कार्डसंबंधित सर्व माहिती मिळेल.