बहुतांश जणांना आपल्या घरात पाळीव प्राणी ठेवणे फार आवडते. बहुतांश लोक पाळीव प्राण्याच्या रुपात कुत्रे-मांजरी घरी आणतात. पण एखाद्याने जर घरात सिंह पाळला आहे या गोष्टीवर तुमचा विश्वास बसेल का? मात्र हे खरं आहे. कारण एका परिवाराने असे केले होते. पण त्याचा परिणाम अत्यंत वाईट झाला होता. ही घटना खरंतर १९७० मधील आहे. जेव्हा अजरबायजानच्या एका परिवाराने आपल्या घरात एक नव्हे तर २ सिंह पाळले होते. त्यांनी त्या सिंहांना आपल्या परिवारातील सदस्याप्रमाणे पाळले होते. पण झाले असे की, आपल्या मालकाच्या मृत्यनंतर मालकीणीच्या डोळ्यासमोरच तिच्या १४ वर्षाच्या मुलाला खाल्ले होते. (Lion Attack)
अपार्टमेंट मध्येच सिंहाला ठेवले होते
बर्बरोव परिवाराने सिंहाला आपल्या घरी पाळण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या पायात काही समस्या होती. परंतु मॉलिश करुन त्यांनी त्याचा पाय व्यवस्थितीत केला. सिंहाचे नाव परिवाराने किंग असे ठेवले. त्याला एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणेच वागवले जायचे. सिंह मोठा झाल्यानंतर त्याला सिनेमांमध्ये काम मिळू लागले होते. त्याच्या मालकाने त्याच्या मॅनेजरच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. १०० स्क्वेअर फूटच्या फ्लॅटमध्ये सिंह बर्बरोव परिवारासोबत आरामात रहायचा. शेजाऱ्यांना त्याची भीती वाटायची. पण घरातील मंडळींना कोणतीच समस्या नव्हती. एका सिनेमाच्या शूट दरम्यान, त्याने एका मुलावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ठार केली. येथे परिवाराची आवड थांबली नाही आणि त्यांनी आणखी एक सिंह घरी आणून पाळला.

मालकीणीच्य समोर मुलाला ठार केले
नवा सिंह हा आधीच्या सिंहासारखा हुशार नव्हता. त्याच्या इच्छा आणि सवयी फार वेगळ्या होत्या. जोपर्यंत लेव जीवंत होते तो पर्यंत त्यांना मास्टर प्रमाणे मानत होता. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर हाताबाहेर निसटून जात होता. लेव यांची पत्नी नीना हिला त्याला एका वेगळ्याच ठिकाणी ठेवण्याचा विचार करत होती. पण एके दिवशी मोठा कांड झाला.(Lion Attack)
हे देखील वाचा- ‘या’ दिवशी युएफओ आणि एलियनचे आगमन….
जेव्हा ती ऑफिसमधून घरी आली तेव्हा घर अस्थाव्यस्थ झाले होते. ती सिंहाचा खोलीत गेली, तेव्हा तो तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान, तिचा १४ वर्षाचा मुलगा आला आणि त्याच्यावर त्याने हल्ला केला. तेथेच मुलाचा मृत्यू झाला. हे पाहून नीना बेशुद्ध झाली पण जेव्हा शुद्धित आली तो पर्यंत पोलिसांनी किंग याला गोळी मारुन ठार केले होते.
