Home » LIC च्या माध्यमातून गृह कर्ज घेत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

LIC च्या माध्यमातून गृह कर्ज घेत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

by Team Gajawaja
0 comment
LIC Home Loan
Share

जर तुम्ही स्वत:चे घर खरेदी करण्यासाठी एलआयसीच्या माध्यमातून गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्या संबंधित नियमांबद्दल अधिक जाणून घ्या. अन्यथा तुम्हाला एलआयसीकडून कर्ज घेणे महागात पडू शकते. कारण एलआयसीने व्याज दरात वाढ करुन आधीच्या तुलनेपेक्षा अधिक महाग केले आहे. यामध्ये सध्याच्या कर्जधारकांची ईएमआयची रक्कम वाढली जाणार आहे आणि नव्या कर्ज धारकांना कर्जावर अधिक व्याज ही द्यावे लागणार आहे. एलआयसीने नोकरदार वर्गातील लोकांना कर्ज फेडण्यासाठी ३० वर्षाचा कालावधी दिला आहे. तर सेल्फ-इंप्लॉइडसाठी ही मर्यादा २५ वर्षांसाठी आहे. (LIC Home Loan)

भारतीय जीवन बीमा निगमची सहाय्यक कंपनी एलआयसी फाउसिंग फाइनान्स लोकांना घर, जमीन, दुकानासारखी संपत्ती खरेदी करण्यासाठी कर्ज देते. एलआयसीच्या माध्यमातून गृह कर्ज घेण्याऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. एलआयसीच्या वेबसाइटनुसार, वाढ केल्याने बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट १६.४५ टक्के झाला आहे. आता कर्जधारकांना ८.६५ टक्क्यांनी व्याज दराने गृह कर्ज दिले जाणार आहे. ८०० सिबिल स्कोर असणाऱ्या नोकरदार आणि प्रोफेशनल्सला १५ कोटींपर्यंते कर्ज ८.३० टक्के दराने मिळणार आहे.

तर ७५०-७९९ क्रेडिट स्कोर असणाऱ्या लोकांना ८.४० टक्के दराने ५ कोटींपर्यंतचे कर्ज मिळू शकते. एलआयसीच्या नव्या व्याज दरानंतर ७००-७४९ सिबिल स्कोर असणाऱ्यांना ८.७० टक्के दराने ५० लाखांपर्यंत कर्ज दिले जाऊ शकते. या प्रकारे समान सिबिल स्कोरवर ५० लाख ते २ कोटीपर्यंतच्या कर्जासाठी ८.९० टक्के व्याज दर ठेवण्यात आला आहे.

गृह कर्जाचे प्रकार
एलआयसीने असे म्हटले आहे की, ३० लाखापर्यंतच्या कर्जासाठी संपत्तीचे मूल्य ९० टक्के असेल. तर ३० लाख ते ७५ लाखापर्यंतच्या कर्जावर संपत्तीच्या मुल्यावर ८० टक्के असणार आहे. एलआयसी हाउसिंगकडून दिले जाणारे गृह कर्ज पुढीलप्रमाणे आहे. (LIC Home Loan)

-स्थानिक व्यक्तीसाठी गृहकर्ज
-एनआरआयसाठी गृहकर्ज
-प्लॉटसाठी कर्ज
-गृह सुधार लोन
-गृह नवीनीकरण लोन
-टॉप अप लोन
-बॅलेंन्स ट्रान्सफर लोन

हे देखील वाचा- २०२३ मध्ये येणार जागतिक मंदी, जाणून घ्या तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम?

जर तुम्ही नोकरी करत आहात तर तु्म्हाला एलआयसीचे होम लोन स्वस्त पडू शकते. तसेच तुमचा ईएमआय ही कमी राहिल, कारण नोकरदार वर्गाला कर्ज फेडण्यासाठीची मर्यादा ही ३० वर्षापर्यंतची आहे. जर तुम्ही नोकरी करत नाहीत तर तुम्हाला अधिक ईएमआय द्यावा लागेल. कारण सेल्फ इंप्लॉइड आणि अन्यसाठी हा कालावधी २५ वर्षाचा आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.