Home » ‘ली फ्रॉमेनी सिंड्रोम’ म्हणजे काय? वडिलांसह 3 मुलांचा झालायं मृत्यू

‘ली फ्रॉमेनी सिंड्रोम’ म्हणजे काय? वडिलांसह 3 मुलांचा झालायं मृत्यू

ब्राजीलमध्ये एका भयंकर आजारामुळे एकाच परिवारातील चार लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वडिलांसह तीन मुलांचा समावेश आहे.

by Team Gajawaja
0 comment
Li-Fraumeni syndrome
Share

ब्राजीलमध्ये एका भयंकर आजारामुळे एकाच परिवारातील चार लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वडिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. असे सांगितले जात आहे की, ५३ वर्षीय रेगिस फीटोसा मोटा हे अशा एका आजाराचा सामना करत होते जी अनुवंशिक होती. त्यांना जन्मापासूनच हा आजार होता, त्या कारणास्तव कॅन्सर होण्याचा धोका खुप वाढला गेला होता. असे सांगितले जात आहे की, या आजाराच्या कारणास्तव तीन मुलांचा मृत्यू २०१८ ते २०२२ दरम्यान झाला होता. तर वडिलांचा मृत्यू नुकताच झाला आहे.(Li-Fraumeni syndrome)

न्युयॉर्क पोस्टच्या रिपोर्ट्सनुसार, रेगिसचा जन्म ली-फ्रॉमेनी सिंड्रोम नावाच्या एका आजारामुळे झाला होता. ली-फ्रॉमेनी सिंड्रोम एक दुर्मिळ आजार आहे. त्यामुळे महिलांमध्ये कॅन्सरचा ट्युमर निर्माण होण्याची शक्यता ९० टक्के आणि पुरुषांमध्ये ७० टक्क्यांपर्यंत वाढली जाते. या दुर्मिळ आजारामुळे प्रभावित व्यक्तीला आपल्या आयुष्यात एकापेक्षा अधिक प्रकारच्या कॅन्सरच्या धोक्यांचा सामना करावा लागतो. हा आजार परिवारात अनुवंशिक रुपात ही असू शकतो. या आजाराबद्दल सर्वात प्रथम १९६९ कळले गेले. डॉ. फ्रेडरिक ली आणि डॉ. जोसेफ फ्रॉमेनी यांनी हा आजार शोधून काढला होता.

कोणत्या लोकांना आहे अधिक धोका?
या दुर्मिळ आजारामुळे कँन्सरचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण होते. ली-फ्रॉमेनी सिंड्रोमच्या कारणास्तव ब्रेस्ट कँन्सर, बोन सर्कोमा, एड्रेनोकोर्टिकल कार्सिनोमा, ब्रेन ट्युमर आणि एक्युट ल्युकेमिया होण्याचा धोका असतो. ऐवढेच नव्हे तर या दुर्मिळ स्थितीमुळे प्रभावित लोकांच्या फुफ्फुसात, थायरॉइड, किडनी आणि जननग्रंथीमध्ये कॅन्सर होण्याचा धोका असतो. एकूणच पाहता, ली-फ्रॉमेनी सिंड्रोम असणाऱ्या लोकांमध्ये एकापेक्षा अधिक प्रकारचा कँन्सर होण्याचा धोका असतो. (Li-Fraumeni syndrome)

हेही वाचा- Basil Leaves Health Benefits: तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

तीन मुलांचा मृत्यू
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रेगिस फीटोसा यांचा सर्वाधिक लहान मुलाचे वयाच्या १० व्या वर्षी ल्युकेमियाच्या कारणास्तव २०१८ मध्ये निधन झाले. तर त्याचा दुसरा मुलगा वयात्या २२ व्या वर्षी आणि २५ वर्षीय मुलीचा मृत्यू ब्रेन ट्युमरच्या कारणास्तव झाला. या दोन्ही मुलांनी आधीच ल्युकेमियावर मात केली होती. मात्र नंतर ब्रेन ट्युमर झाला. तेच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले. रेगिसला २०१६ ते २०२३ च्या मधे जवळजवळ ३ वेळा कँन्सरच्या आजाराबद्दल कळले होते. त्यामध्ये लिम्फोसाइटिक ल्युकेमिया, मल्टीपल मायलोमा आणि नॉन-हॉजकिन लिंफोमाचा समावेश आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.