Home » बालपणीच्या मैत्रिणींना मिळाला समलैंगिकतेचा सन्मान

बालपणीच्या मैत्रिणींना मिळाला समलैंगिकतेचा सन्मान

by Team Gajawaja
0 comment
LGBTQ Photographs
Share

केरळातील एक वेडिंग फोटोशूट सध्या जोरदार चर्चेत आहे. यामध्ये एखादा वर किंवा वधू नव्हे तर दोन तरुणींनी एकमेकींसोबत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्य असे की, या दोघी ही बालपणीच्या मैत्रिणी आहेत. पण या निर्णयापर्यंत पोहचण्यासाठीचा त्यांचा मार्ग हा मात्र खडतर होता. त्यांना आपल्या घरातील मंडळींसह समाजाच्या विरोधाचा जोरदार सामना करावा लागला. (LGBTQ Photographs)

घरातल्यांनी सोडली साथ पण….
केरळातील एर्नाकुलम जिल्ह्यात राहणार फातिमा नूरा आणि आदिला नसरीन या दोघी बालपणीच्या मैत्रिणी आहेत. त्यांनी एकत्रित एकाच महाविद्यालयापर्यंत शिक्षण ही घेतले. याच दरम्यान दोघांमध्ये मैत्रीचे नाते हे प्रेमात बदलले. दोघींनी एकमेकींसोबत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. पण नूरा आणि आदिला हे कंजरवेटिव्ह परिवारातील असून त्यांना त्या दोघींचे नाते मान्य नव्हते. त्यामुळे घरातील मंडळींनी त्यांना जबरदस्तीने वेगळे केले.

LGBTQ Photographs
LGBTQ Photographs

त्यानंतर नूरा आणि आदिला यांनी आपल्या नात्याला एक नाव मिळावे म्हणून केरळ हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने त्यांना एकत्रित राहण्याची परवानगी ही दिली. त्यानंतर दोघी एकत्रित राहू लागल्या, दरम्यान, आता ही त्या दोघींच्या घरातील मंडळी त्यांचे नाते संपवण्यासाठी दबाव टाकत आहेत.(LGBTQ Photographs)

LGBTQ+ कम्युनिटीतील मंडळी झाली नातेवाईक
नूरा आणि आदिला यांच्या घरातील मंडळींना त्यांचे हे नाते हायकोर्टाच्या निर्णयानंतर अद्याप मान्यच नाही. फोटोशूटमध्ये दोघींचे ही नातेवाईक उपस्थिती राहिले नाहीत. अशातच LGBTQ+ कम्युनिटीतील दुसऱ्या लोकांनी त्यांना आपलेसे केले आणि त्यांना साथ दिली. फोटोशूटमध्ये काही समलैंगिक जोडपी ही आली होती. यापूर्वी सुद्धा नूरा आणि आदिला कायद्याच्या पाठिंब्यासाठी LGBTQ+ कम्युनिटीत आल्या होत्या.

हे देखील वाचा- समलैंगिकतेचा सन्मान करणारा “Pride Month”

एकत्रित राहणार पण लग्नाला कायदेशीर मान्यता नाही
केरळ हायकोर्टाने नूरा आणि आदिला यांना एकत्रित राहण्यास परवानगी दिली आहे. पण त्यांच्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळणार नाही असे ही स्पष्ट केले आहे. दोघींना कपल्सला दिल्या जाणाऱ्या सुविधा मिळणार नाहीत. पण तरीही त्या दोघींना एकत्रित रहायचे आहे. दोघींना आता लग्न करायचे नाही, पण त्यांचे असे म्हणणे आहे की, भविष्यात कधी ना कधी तरी लग्न करुच भले ते त्याला कोणी कायदेशीर मानेल अथवा नाही. दरम्यान, सुप्रीम कोर्टात समलैंगिकतेच्या लग्नाला कायदेशीर मान्यता देण्यासंदर्भात सुनावणी सुरु आहे. तर जगभरातील १२० देशांमध्ये समलैंगिकता हा अपराध नसल्याचे मानले जात नव्हते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.