वो स्त्री है… कुछ भी कर सकती है…हा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल. पण याची प्रचीती इतिहासात अनेकदा आलीच आहे. २९ ऑगस्ट १९६९, रोममधून फ्लाइट TWA 840 टेक ऑफ करणार होती आणि इज्रायलच्या बेन गुरियन एयरपोर्टवर जाणार होती. प्रवासी फ्लाइटची वाट पाहत होते. त्या प्रवाशांमध्ये एक नाव होतं, लैला खालिद.. ती वेटिंग लाउंजमध्ये बसलेली होती आणि सलीम इसावी नावाचा एक माणूस तिच्या आसपास फिरत होता. तो तीचाच पार्टनर होता. पण फ्लाइटमध्ये चढण्याआधी ते एकमेकांशी बोलत तर नव्हतेच, पण एकमेकांकडे पाहतही नव्हते. थोड्या वेळाने प्लेन टेक ऑफ झालं. टेकऑफनंतर एअर होस्टेस जेवण घेऊन आली, पण लैलाने तिला खायला नको म्हणून सांगितलं. (Leila Khaled)
ती तिला म्हणाली, मला थंडी वाजतेय, मला ब्लँकेट आणि एक कप कॉफी हवी. कॉफी पिऊन तिने ब्लँकेट अंगावर घेतलं आणि सीटवर पसरली. आतापर्यंत फ्लाइटमध्ये सगळं ठीक होतं. पण फ्लाइटमध्ये यायच्या आधी तिने तिच्या कमरेत एक पिस्तूल आणि हँड ग्रेनेट लपवलेलं होतं. तेव्हा आतासारखी स्ट्रीक्ट चेकिंग नव्हती, त्यामुळे लैला बिंधास प्लेनमध्ये चढली. तेवढ्यात तिचा पार्टनर सलीम तिच्या बाजूने गेला आणि डायरेक्ट कॉकपिटमध्ये शिरला. आता लैला घाईत उठली आणि त्याच्या मागून जायला निघाली. त्या गडबडीत तिचं पिस्तूल जमिनीवर पडलं आणि हँड ग्रेनेट तिच्या हातात राहीलं. आजूबाजूच्या लोकांचं तिच्याकडे लक्ष गेलं, सलीमने पायलटवर बंदूक धरली आणि लोकांना समजलं की प्लेन हायजॅक झालं आहे.. लैला खालिद आणि तिचा पार्टनर सलीम इसावी यांनी प्लेन हायजॅक करून आपल्या कंट्रोलमध्ये घेतलं आणि थोड्याच वेळात इज्रायलमध्ये खबर पोहोचली की, फ्लाइट TWA 840 हायजॅक झालं. (Top Stories)
लैला खालिद वय वर्ष फक्त २४, या प्लेन हायजॅकिंग नंतर, ती जगातली पहिली प्लेन हायजॅक करणारी स्त्री बनली. तिने फ्लाइट TWA 840 हायजॅक का केलं? त्यामागचा तिचा उद्देश काय? हे सगळच आपण जाणून घेणार आहोत. (Leila Khaled)
ते हायजॅकिंग झालेलं प्लेन लैला खालिदने हायफा शहरावरून घ्यायला लावलं आणि पुढे ते दमिश्कमध्ये लँड केलं. सलीमने प्लेनच्या कॉकपिटमध्ये बॉम्ब लावला. पण त्या आधीच त्यांनी सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं होतं. त्यानंतर कॉकपिटमधला बॉम्ब फुटला आणि अर्धं प्लेन उद्ध्वस्त झालं. सगळे सुखरूप होते. लैला आणि सलीमला अटक झालीच पण तोवर तिचा उद्देश पूर्ण झाला होता. तर त्यांच्या नेमका उद्देश काय होता?.. त्यांना या हायजॅकिंगमुळे फक्त जगाचं लक्ष पॅलेस्टाईनकडे वळवायचं होतं.(Top Stories)
पण मग प्रश्न असा येतो की, तिने असं का केलं? तर त्या आधी तिच्या बद्दल थोडं जाणून घेऊ. लैला खालिदचा जन्म १९४४ मध्ये पॅलेस्टाईन मधल्या हैफा शहरात झाला. ती चार वर्षांची असताना नाकबा ही भयानक घटना घडली. आता नाकबा म्हणजे काय? तर नाकबा हा अरबी शब्द, ज्याचा अर्थ संकट, आपत्ति असा होतो. १९४७ मध्ये यूनायटेड नेशनने पॅलेस्टाईनचं दोन भागात विभाजन केलं, एक भाग यहुदी लोकांसाठी म्हणजे इस्रायल आणि दूसरा भाग अरबांसाठी केला. पण १९४८ मध्ये इस्रायलने स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषणा केली आणि त्यानंतर यहुदी सैन्याने म्हणजे झायोनिस्ट सैन्याने पॅलेस्टाईनवर हल्ले केले. ज्यामध्ये ५०० हून अधिक गावं उद्ध्वस्त झाली.(Leila Khaled)
ज्याचा परिणाम असा झाला की, ७ ते ८ लाख पॅलेस्टाईनीस् त्यांची घरं सोडून पळाले आणि लेबनॉन, जॉर्डन, सीरिया आणि गाझासारख्या ठिकाणी राहायला गेले. नाहीतर तिथे त्यांचं जगणं मुश्किल झालं असतं. त्यात लैला तिच्या फॅमिली सोबत लेबनॉनला राहायला गेले. कारण तीची जागा झायोनिस्ट सैन्याने हल्ले करून ताब्यात घेतली आणि त्या दिवसापासून तिच्या मनात राग तयार होत गेला. तिला वाटायला लागलं की, आपल्याकडून आपलं घर, आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आणि तिला याचा बदला घ्यायचा होता. ती काही वर्षांनी पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन (PFLP) मध्ये सामील झाली. या संघटनेचा एकच उद्देश होता की, सशस्त्र लढ्याशिवाय पॅलेस्टाईन स्वतंत्र होणार नाही आणि याच संघटनेत असताना वयाच्या २४ व्या वर्षी तिने सलीमसोबत पहिलं हायजॅकिंग केलं.(Top Stories)
या हायजॅकिंगनंतर तिच्या हातात AK47 असलेले फोटो सगळीकडे लावले गेले. ती पॅलेस्टाईनची पोस्टर गर्ल म्हणून फेमस झाली. सिरियाच्या सैन्याने तिला अटक केली आणि तीन आठवड्यांनी ती सुटली. याला कारण म्हणजे तिला सिरियामध्ये अटक झाली होती आणि सिरिया पॅलेस्टाईनच्या सपोर्टमध्ये होता. ते अशा आतंकवादी कारवायांना इज्रायलविरुद्धच्या संघर्षाचा भाग मानायचे आणि म्हणूनच PFLP ला काही अरब देशांचा पाठिंबासुद्धा होता.
ती म्हणायची की, “यूरोपियन झायोनिस्ट माझ्या शहरात राहतात कारण ते यहुदी आहेत आणि त्यांच्याकडे पॉवर आहे. मी आणि माझे लोक बाहेर राहतो कारण आम्ही पॉवर नसलेले पॅलेस्टाईंनी अरब आहोत. पण आमच्याकडेही एक दिवस इतकी पॉवर असेल की आम्ही पॅलेस्टाईन पुन्हा मिळवू आणि मग त्याला अरब, यहुदी आणि स्वातंत्र्यप्रेमींसाठी स्वर्ग बनवू.”(Leila Khaled)
या नंतर ४ सप्टेंबर १९७०, लैला खालिद पुन्हा एकदा जगासमोर आली. पण यावेळेस तिने ६ वेळा चेहऱ्याची सर्जरी केली आणि आपला लुक बदलला. लैला दुसऱ्यांदा प्लेन हायजॅक करणार होती. या वेळेची ही मुव्हमेंट जॉर्डनचा राजा किंग हुसैन बिन तलाल याच्या विरोधात होती. कारण हजारो पॅलेस्टाईनींनी जॉर्डनमध्ये आश्रय घेतला होता आणि तिथून ते आपले रेजिस्टेंस मूव्हमेंट बिल्ड करत होत. जॉर्डनच्या राजाला इस्रायलशी चांगले संबंध ठेवायचे होते. त्याला वाटायचं PFLP ही आतंकवादी संघटना आहे आणि ती देशात अस्थिरता पसरवते. तो पॅलेस्टाईनींना त्रास द्यायचा, म्हणून PFLPनी ठरवलं की, जॉर्डनच्या राजाला धडा शिकवायचा.(Top Stories)
या वेळेस लैलासोबत तिचा पार्टनर होता पॅट्रिक. एम्स्टरडममधून ते दोघं न्यूयॉर्कला जाणाऱ्या इज्रायली एयरलाइन्सच्या एलएआय २१९ बोइंग ७०७ विमानात चढले. यावेळी तिला एकापेक्षा जास्त साथी हवे होते, पण ते शक्य झालं नाही. लैलाने या वेळेस दोन हँड ग्रेनेट लपवले होते. प्लेन टेक ऑफ झाल्यावर तिने कॉकपिटकडे पळाली. पण पायलटने आतून दरवाजा लॉक केलेला होता कारण पायलटला आधीच असं काहीतरी घडेल याचा अंदाज आला होता. इतक्यात प्लेनमधल्या मार्शल्सनी गोळीबार सुरू केला. पैट्रिकच्या पायाला गोळी लागली. मग लैलाने पायलटला धमकी दिली, “दरवाजा उघड, नाहीतर ग्रेनेटचा पिन काढीन.” पण पायलट स्मार्ट होता. त्याने प्लेन खालच्या दिशेने डाइव्ह करायला सुरुवात केली. त्यामुळे झालं असं की, सीट बेल्ट घातलेल्या प्रवाशांना काही झालं नाही, पण लैला जमिनीवर पडली. प्रवाशांनी तिला बेदम मारलं आणि प्लेन लंडनला पोहोचल्यावर दोघांना अटक झाली.(Leila Khaled)
===============
हे देखील वाचा : Chenab Bridge : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आर्च ब्रिजचे उदघाटन; ‘ही’ आहेत या ब्रिजची वैशिष्ट्ये
===============
या दरम्यान तिच्या साथीदारांनी तिला सोडवण्यासाठी प्लेन हायजॅक केले आणि त्या दोघांना सोडवण्यासाठीची मागणी केली. २४ दिवस ब्रिटिश जेलमध्ये राहिल्यानंतर १ ऑक्टोबर १९७० ला लैला खालिदला सोडवण्यात आलं. पण ती जेव्हा पोलिसांच्या ताब्यात होती तेव्हा सुखात होती. जेलरशी तिचे चांगले संबंध बनले. सुटकेनंतर तिने क्रिसमसला जेल कर्मचाऱ्यांना काही कार्ड्स पाठवली.
तीची सुटका झाल्यानंतर इज्रायल बराच काळ तिला शोधत राहिला आणि ती सतत आपले लोकेशन बदलत राहिली. तिने PFLP मध्ये काम सुरू ठेवलं. ती चे गव्हेरा, लेनिन, आणि फिदेल कॅस्ट्रो यांच्यापासून प्रेरित झाली. १९७३ मध्ये तिने ‘My People Shall Live’ ही आत्मचरित्र लिहिलं. ज्यात तिने पॅलेस्टाईन स्वातंत्र्यासाठीचा त्यांचा लढा, नाकबामुळे झालेला त्रास आणि हायजॅकिंगच्या कारवाया याबद्दल लिहिलं आहे. त्यात ती असंही म्हणते की, “जिथे दडपशाही आहे, तिथे प्रतिकार आहे आणि विमान अपहरण हा पॅलेस्टाईन लोकांच्या हक्कांसाठीचा लढा होता.” (Leila Khaled)
सध्या ती जॉर्डनमधील अम्मान येथे आपल्या पती फयाज रशीद आणि दोन मुलांसोबत राहते आणि अजूनही PFLP शी कनेक्टेड आहे. १९८६ मध्ये स्थापन झालेल्या पॅलेस्टाईन वुमन ऑर्गनायझेशनची पहिली सेक्रेटरी होती आणि त्या संस्थेच्या ‘द वुमन्स व्हॉइस’ मासिकाची संपादक होती. तिने महिलांच्या हक्कांसाठी युनायटेड नेशन्सपर्यंत लढा दिला. एका इंटरव्ह्यूत ती म्हणाली, “जर मला हायफाला जायची संधी मिळाली, ते अजून तिथे आहे का? हे मी सगळ्यात आधी माझं घर पाहीन.