भारत आणि चीन यांच्यातील तणाव आता कमी झाला असला तरी चीनकधी भारताच्या विरुद्ध भूमिका घेईल, याचा अंदाज व्यक्त करता येत नाही. बेभरवशाच्या याच चीनच्या आक्रमकवादी वर्तनावर वचक ठेवण्यासाठी आता भारत सरकार रोखठोख भूमिका घेण्याच्या विचारात आहेत. यातूनच केंद्र सरकारनं लेह ते पँगाँगला जोडणारा बोगदा बांधण्याची घोषणा केली आहे. लडाखच्या केला खिंडीतून 7-8 किमी लांबीचा ट्विन ट्यूब बोगदा भारत सरकार तयार करणार आहे. लडाखच्या केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने केंद्र सरकारला हा प्रस्ताव दिला असून यामुळे भारताची सीमा अधिक सुरक्षित होणार आहे. या बोगद्यामुळे लेह ते पँगाँग तलावापर्यंत प्रवासी वाहतूक सुलभपणे होणार आहे. मुख्य म्हणजे, चीनच्या सिमेवर तैनात असलेल्या लष्कराला या बोगद्याचा अधिक फायदा होणार आहे. (Leh To Pangong)
भारत चीन सिमा मजबूत करण्यासाठी भारत सरकारनं आणखी एक प्रशंसनीय पाऊल उचलले आहे. लेह ते पँगॉन्ग प्रवासाचा वेळ यामुळे लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडे हा प्रकल्प देण्यात येईल, अशी शक्यता आहे. लडाखमधील केला खिंडीतून 7 ते 8 किलोमीटर लांबीचा ट्विन-ट्यूब बोगदा तयार करण्याचा हा प्रस्ताव आहे. या बोगद्याची उंची समुद्रसपाटीपासून 18,600 फुटांपेक्षा थोडी जास्त असणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव आल्यावर लडाखच्या केंद्रशासित प्रदेश प्रशासनालाही सूचना देऊन याबाबत अधिक माहिती मागवली आहे. या मोहिमेसाठी सुमारे 6000 कोटी रुपये खर्च येईल असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र यातील खर्चापेक्षा त्यातून होणारा फायदा हा कितीतरी अधिकपट असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चीन भविष्यात कधीही लडाखजवळ अतिक्रमण करण्याचा विचारही करणार नाही. कारण भारतीय लष्कर त्यानंतर लेहपासून पँगाँग तलावापर्यंत काही क्षणात पोहचू शकणार आहे. यासंदर्भात केंद्रसरकारनं लगेच प्रस्तावाचा अभ्यास सुरु केला असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. (International News)
या बोगद्याचा दुहेरी फायदा आहे. लडाखमधील जनतेला हिवाळ्याच्या ऋतुमध्ये वेगळे जीवनमान जगावे लागते. आवश्यक वस्तू मिळत नाहीत. आरोग्याच्या समस्याही आहेत. या सर्वात लष्कराही सर्वाधिक फायदा होणार आहे. या बोगद्यामुळे लष्कराची क्षमता वाढणार आहे. सिमेवरील सुरक्षेच्या गरजेनुसार या भागात अधिक लष्करी जवानांना आणता येणार आहे. तसेच गरज नसेल तेव्हा पुन्हा त्यांना पूर्वस्थानी नेता येणार आहे. यामुळे एकाच जागी कित्येक दिवस तैनात रहाणा-या लष्करी जवानांनाही दिलासा मिळणार आहे. लडाख प्रशासनच या बोगद्यासाठी आग्रही असल्यामुळे भारत सरकार हा प्रकल्प विक्रमी वेळात पूर्ण करेल अशी आशा आहे. लडाख प्रशासनाने खार्दुंग ला, फोटू ला, नमिका ला आणि केला या चार खिंडींवर नवीन बोगद्यांची गरज सांगणारा रोडमॅप करुन भारत सरकारकडे सुपूर्द केला आहे. हा बोगदा तयार झाल्यावर या भागाचा सर्वार्थांनं विकास होणार आहे. (Leh To Pangong)
======
हे देखील वाचा : हे तर नवलच !
====
यात मुख्य भाग पर्यटनाचा असणार आहे. लडाख आणि परिसरात पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांची संख्या जास्त आहे. मात्र या सर्वांना विशिष्ट हंगामात यावे लागते. मात्र हा बोगदा झाल्यामुळे लडाखला येणा-या पर्यटकांची संख्या अधिक होणार आहे. तसेच स्थानिकांना रोगजाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. केला खिंड ही लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्ह्यातील चांगथांग प्रदेशातील एक उंच पर्वतीय खिंड आहे. येथूनच लेहला पँगॉन्ग सरोवराबरोबर जोडणारा देशातील सर्वात उंच खिंड तयार झाली आहे. केला खिंड हा केला त्सो, थारूक, सरकुंचर आणि तांगस्ते गाव आणि पँगॉन्ग तलावाचे प्रवेशद्वार आहे. मेंढपाळांचा वापर या खिंड परिसरात अधिक असतो. 18600 फूट उंचीवर केला खिंडीतून लेहला पँगॉन्ग त्सोशी जोडणारा मोक्याचा महत्त्वाचा रस्ता भारतीय लष्कराच्या 58 अभियंता रेजिमेंटने बांधला आहे. हा रस्ता दोन महिन्यांत पूर्ण झाला होता. लेह (झिंग्राल) ते पँगॉन्ग (तांगत्से) असा 41 किमीचा प्रवास यामुळे कमी झाला आहे. आता अशीच सुविधा या नवीन बोगद्यामुळे होईल अशी आशा आहे. (International News)
सई बने