Home » नवरा माझा नवसाचामध्ये दिसणार होते लक्ष्मीकांत बेर्डे पण…

नवरा माझा नवसाचामध्ये दिसणार होते लक्ष्मीकांत बेर्डे पण…

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sachin P
Share

मराठी चित्रपटांबद्दल मराठी किंवा अमराठी कोणत्याही प्रेक्षकांना विचारले तर त्यांच्या तोंडात सर्वप्रथम एकच नाव येते आणि ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आपल्या विनोदी भूमिकांनी लक्ष्मीकांत यांनी प्रेक्षकांच्या मनात ‘लक्ष्या’ ही ओळख निर्माण केली जी आजतागायत कायम आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. मराठी सिनेसृष्टीला अगदी लखलखता तारा असलेला सगळ्यांचा लाडका लक्ष्या आज आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी आणि सिनेमे कायम आपल्याला त्याच्या स्मरणात ठेवतात.

मराठी मनोरंजनविश्वतील लोकप्रिय त्रिकुट म्हणजे सचिन, लक्ष्या आणि अशोक सराफ. या तिकडीने संपूर्ण मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. यांनी एकत्र केलेले सर्वच सिनेमे सुपरडुपर हिट झाले. सचिन यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक चित्रपटात अशोक आणि लक्ष्या ही जोडी ठरलेलीच होती. सचिन यांनी या दोघांशिवाय त्यांचा एकही सिनेमा केला नाही.

Sachin P

सचिन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली. हा सिनेमा प्रचंड गाजला यातही सचिन यांनी लक्ष्याला घेण्याचे नक्की केले होते. त्यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘हाच माझा मार्ग एकला’ यात त्यांनी याबाबदल खुलासा देखील केला आहे.

२००३ मध्ये सचिन हे गणपतीपुळ्याला गेले होते. तिथे असताना त्यांना ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमाची कथा सुचली. त्यानंतर त्यांनी ही कथा त्यांच्या कुटूंबाला ऐकवली आणि त्यांना देखील ही कथा आवडली. त्यानंतर पुढे सचिन यांनी मोठ्या आनंदाने आणि उत्सुकतेने या सिनेमावर काम करण्यास सुरुवात केली. सर्वात आधी या सिनेमाचे नाव ठेवले होते, ‘चला ना गडे’. मात्र नंतर एका प्रेक्षकाने दिलेल्या सल्ल्यामुळे सचिन यांनी चित्रपटाचे नाव बदलले.

हाच माझा मार्ग एकला या आत्मचरित्रात सचिन यांनी सांगितले आहे की, नवरा माझा नवसाचा या सिनेमात त्यांनी सचिन, सुप्रिया, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे काम करणार हे ठरवले होते. त्यावेळी लक्ष्मीकांत खूप आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. सचिन त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. भेटल्यावर त्यांनी त्यांना सांगितले, “लवकर बरा हो. सप्टेंबरमध्ये आपल्याला सिनेमाचे शूटिंग सुरु करायचे आहे.” हे ऐकून लक्ष्मीकांत यांनी आश्चर्य चकित होऊन सचिन यांना विचारले, “आपल्याला ?” त्यावर सचिन म्हणाले, “हो, तू माझ्या एका नवीन सिनेमात काम करायचे आहेस.

=======

हे देखील वाचा : बिग बॉसमधून योगिता आणि निखिल पडले बाहेर

=======

अजून शूटिंगला तीन महिने आहेत, तोपर्यंत लवकर बरा हो !!” ते ऐकल्यावर लक्ष्मीकांत खुश झाले. पण या गोष्टीला एक महिना उलटूनही त्यांच्या तब्येतीत अजिबातच फरक पडला नव्हता. लक्ष्मीकांत यांच्या आग्रहाखातर सचिन यांनी सिनेमाच्या शूटिंगची तारीख सप्टेंबर महिन्यावरून ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. पण लक्ष्मीकांत यांची तब्येत काही सुधरत नव्हती. शेवटी लक्ष्मीकांत यांनी सचिन यांना बोलावून त्यांच्या तब्येतीबद्दल सांगितले की, “डॉक्टरांनी मला शूटिंग करून अधिक धोका पत्करून घेऊ नका असे सांगितले आहे. तर तू माझ्यासाठी थांबू नको. सिनेमाचे शूटिंग चालू कर.”

त्यानंतर सचिन यांनी देखील नाइलाजाने ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमाचे शूटिंग सुरु केले. यानंतर पुढी काही काळातच लक्ष्मीकांत यांचे निधन झाले. सचिन यांना आजही लक्ष्मीकांत जाण्याची आणि या सिनेमात न दिसण्याची सल कायम आहे. दरम्यान येत्या सप्टेंबरमध्ये सचिन यांचा ‘नवरा माझा नवसाचा २’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.