उद्या अर्थात १८ ऑगस्ट रोजी श्रावणातला चौथा आणि शेवटचा सोमवार आहे. आषाढी एकादशीनंतर जेव्हा विष्णू चार महिने निद्राधीन होतात, तेव्हा या सृष्टीची जबाबदारी भगवान शंकर उचलतात. या चार महिन्याचा काळालाच चातुर्मास म्हटले जाते. याच चातुर्मासात श्रावण हा अतिशय पवित्र महिना येतो. हा संपूर्ण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. अशातच या श्रावणात येणाऱ्या सोमवाराला तर अनन्यसाधारण महत्व आहे. श्रावणातल्या सोमवारी शिवाची खास पूजा आणि अभिषेक केला जातो. शंकराला शिवामूठ वाहिली जाते. श्रावणात चार तर कधी पाच सोमवार येतात. यंदा श्रावणात चार सोमवार आले असून, उद्याचा सोमवार हा शेवटचा आणि चौथा सोमवार आहे. (Shravan Somavar)
शिवाय उद्या श्रवणी सोमवार असून गजकेसरी आणि गजलक्ष्मी हे खास योग्य देखील जुळून येत आहे. त्यामुळेच या सोमवारचे महत्व अधिकच वाढले आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त केली जाते. देवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होऊन अडचणी दूर होतात. सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच व्रत करण्याचा संकल्प करावा. संकल्प केल्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीचे दुध अर्पण करावे. त्यानंतर फुल, तांदूळ, कुंकू, बेलाचे पान अर्पण करावे. शिवाला यादिवशी १०८ किंवा १००८ बेलपत्र अर्पण करणे देखील फलदायी मानले जाते. या सर्व गोष्टी अर्पण करताना ऊँ महाशिवाय सोमाय नम: किंवा ऊँ नम: शिवाय। या मंत्राचा जप करावा. जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ श्रेष्ठ आहे. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी. या व्रतामध्ये एकभुक्त अर्थात एकाचवेळी रात्री जेवावे. दिवसा फलाहार तसेच दुध घेतल्यास चालते. (Marathi News)
चौथ्या श्रावणी सोमवारी शंकराला शिवामूठ म्हणून जव वाहावे. लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते. शिवामूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने। शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’ असा मंत्र म्हणावा. किंवा शिवा शिवा महादेवा… माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, अशी प्रार्थना करावी. शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. (Todays Marathi Headline)
श्रावण सोमवार खुळभर दुधाची कथा
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनांत आलं आपल्या महादेवाचा गर्भारा दुधानं भरावा. परंतु हें घडेल कसं? अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ति सांगितली. दवंडी पिटली, “गांवांतल्या सर्व माणसांनीं आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारीं महादेवाच्या देवळीं पूजेला यावं.” सर्वांना धाक पडला. घरोघरचीं माणसं घाबरून गेलीं. कोणाला कांहीं सुचेनासं झालं. त्याप्रमाणं घरांत कोणीं दूध ठेवलं नाहीं. वासरांना पाजलं नाहीं, मुलांना दिलं नाहीं.सगळे दूध देवळांत नेलं. गांवचं दूध सगळं गर्भार्यात पडलं, तरी देवाचा गर्भारा भरला नाहीं. (Top Marathi News)
दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती, तिनं घरचं कामकाज आटपलं, मुलांबाळांनाखाऊं घातलं, लेकिसुनांना न्हाऊं घातलं, गाईवासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं, चार तांदुळाचे दाणे घेतले, दोन बेलाचीं पानं घेतलीं, आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळांत आली. मनोभावें पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. ” जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गर्भार्यात घातलं. तुझ्या गर्भारा भरला नाहीं, माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही. पण मी आपली भावें भक्तीनं अर्पण करतें.” असं म्हणून राहिलेलं दूध गर्भारीं अर्पण केलं. पूजा घेऊन मागं परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गर्भारा भरून गेला. हें गुरवानं पाहिलं, राजाला कळवलं, परंतु त्याचा कांहीं केल्या पत्ता लागेना.(Top Trending News)
दुसर्या सोमवारीं राजानं शिपाई देवळीं बसवले. तरीही शोध लागला नाहीं. चमत्कारही असाच झाला. पुढं तिसर्या सोमवारी राजा बसला. म्हातारीचे वेळेस गर्भारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. “तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांचे हायहाय माथीं आले. हें देवाला आवडत नाहीं, म्हणुन गर्भारा भरत नाहीं.” “याला युक्ति काय करावी?” मुलांवांसरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनीं आनंद करावा. देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा; म्हणजे देवाचा गर्भारा भरेल. देव संतुष्ट होईल.” म्हातारीला सोडून दिलं. गांवांत दवंडी पिटविली. (Top Stories)
==============
हे देखील वाचा : Ekadshi : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ‘अजा एकादशी’
===============
चवथ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलांबाळांना गाईवासरांना दूध ठेऊन उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहातात तों देवाचा गर्भारा भरून आला. राजाला आंनद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकी. सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदूं लागली. तसं तुम्ही आम्ही नांदूं. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचांउत्तरी सुफळ संपूर्ण. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics