Home » वारंवार Laptop गरम होतो का? दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान

वारंवार Laptop गरम होतो का? दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान

by Team Gajawaja
0 comment
Laptop Overheating
Share

आपण दिवसभर ऑफिस किंवा घरातून लॅपटॉपच्या माध्यमातून काम करताना काही वेळेस आपल्या लॅपटॉप मधून गरम हवा बाहेर फेकली जात असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, लॅपटॉप मध्ये हिट जनरेट झाल्यानंतर त्याच्या परफॉर्मेंन्सवर त्याचा थेट परिणाम होतो. लॅपटॉपमध्ये हलक्या स्वरुपातील हिटमुळे काही समस्या येत नाही. पण तुमचा लॅपटॉप ओव्हरहीटी होत असेल तर समजून जा की काहीतरी समस्या आहे. अशातच आम्ही तुम्हाला लॅपटॉप संदर्भातील काही टीप्स सांगणार आहोत ज्या तुमच्या नक्कीच कामी येतील. (Laptop Overheating)

लॅपटॉप गरम होण्यामागील कारणे
-धूळ
-लॅपटॉपचा बिघडलेला पंखा
-लॅपटॉप अत्याधिक उपयोग
-लॅपटॉप चुकीच्या ठिकाणी ठेवणे

धूळीपासून बचाव करा
लॅपटॉप मध्ये जनरेट होणारी हीट कंट्रोल करण्यासाठी आणि लॅपटॉप मधील वेंटिलेशन कायम ठेवण्यासाठी सीपीयू मध्ये फॅन असतो. मात्र जर लॅपटॉप योग्य पद्धतीने न ठेवल्यास त्याच्या पंख्यात धूळ जमा होण्यास सुरुवात होते. याच कारणास्तव लॅपटॉपमध्ये योग्य पद्धतीने वेंटिलेशन होत नाही आणि हीट जनरेट होऊ लागते. हीट पासून बचाव करण्यासाठी तुम्ही सुनिश्चित करा की फॅनमध्ये धूळ जमा होणार नाही.

ऑरिजनल चार्जरचा वापर करा
लॅपटॉपचे ओरिजनल चार्जर जरी खराब झाले तरीही दुसरे घेताना सुद्धा ओरिजनल घ्या. पण काही वेळेस असे होते की, लोक लॅपटॉपसह मिळणारा चार्जर नव्हे तर दुसऱ्या लोकल चार्जर किंवा अन्य कंपनीच्या चार्जरचा वापर करुन लॅपटॉप चार्ज करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, असे केल्याने तुमच्या लॅपटॉपसाठी समस्या उद्भवू शकते.

त्याचसोबत लोकल किंवा अन्य कोणत्याही चार्जरने आपला लॅपटॉप चार्ज करत असाल तर सावध रहा. कारण असे केल्याने लॅपटॉप मध्ये हीट जनरेट होण्याची अधिक शक्यता असते. जेणेकरुन अधिक मोठी समस्या सुद्धा उद्भवू शकते. अशाच नेहमी तुम्ही ओरिजनल चार्जरचा वापर करा. (Laptop Overheating)

हे देखील वाचा- आता ग्राहकांना खरेदी करता येणार नाही नवे सिम कार्ड, जाणून घ्या अधिक

ओव्हर चार्जिंग पासून रहा दूर
नेहमीच आपण असे पाहतो की, लॅपटॉपची बॅटरी कमी झाली असेल तर आपण चार्जर लावतो मात्र कधी कधी बटण सुरु करणे विसरतो आणि लॅपटॉप १०० टक्के चार्ज झाल्यानंतर सुद्धा चार्ज लावून ठेवतो. अशातच तो ओव्हर चार्ज होतो. त्यामुळे त्याचा प्रभाव लॅपटॉपच्या बॅटरीवर होऊ शकतो व त्याच्या माध्यमातून हीट जनरेट होण्यास सुरुवात होते. अशातच लॅपटॉप ओव्हर चार्जिंग पासून दूर रहा.


आणखी वाचा : 
प्रॉपर्टीत भाडेकरुला ठेवण्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात
DINKs ट्रेण्ड नक्की काय आहे? जो कपल्स करतायत फॉलो
भारताच्या स्कॉटलंडला पाहिलंत का ?

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.