काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने फरार ललित मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. त्यांना फरार मानत असून केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत आहेत. आता ललित मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विधानांवरुन त्यांना घेरले आहे. त्यांनी असे म्हटले की, राहुल यांच्या विरोधात ब्रिटिश कोर्टात धाव घेणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ललित मोदी यांना फरार घोषित करण्यात आले आहे. मात्र आपल्या ट्विट मध्ये त्यांना दोषीच्या रुपात मानले गेले नाही आणि देशाचे एक सामान्य नागरिक आहे.(Lalit Modi on Rahul Gandhi)
राहुल गांधी मोदी आडवानावाच्या विधानावरुन सुरत कोर्टाने त्यांना दोषी मानले. यामुळेच त्यांना आपली खासदारकी गमावावी लागली. ललित मोदी यांनी काँग्रेस नेत्यांद्वारे त्यांना फरार बोलल्यानंतर प्रश्न उपस्थितीत केला आणि असे म्हटले की, ते का आणि कशा प्रकारे फरार आहेत? राहुलला त्यांनी पप्पू असे म्हटले आणि विचारले की, अखेर त्यांना कधी दोषी ठरवले गेले? त्यांनी असे म्हटले की, आणखी एका विरोधी नेत्यांकडे करण्यासाठी काहीही नाी किंवा त्यांच्याकडे माहिती ही चुकीची आहे.
ललित मोदी यांनी ट्विटमध्ये असे म्हटले की, ते राहुल गांधी यांच्या विरोधात कोर्टात धाव घेणार आहेत. राहुल गांधींना ठोस पुराव्यांसह येण्याचे आव्हान दिले आणि म्हटले की, त्यांनी स्वत:ला मुर्ख बनताना पाहणे उत्साहाचे असणार आहे. माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर ललित मोदी यांनी अशावेळी हल्लाबोल केला आहे जेव्हा काही दिवसांपूर्वी मोदी आडनावावरुन गुन्हा आणि मानहानी प्रकरणी राहुल गांधी यांना दोषी ठरवले गेले आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली. दोषी ठरवल्यानंतर गांधी यांची लोकसभेतील सदस्यता ही रद्द झाली आहे. आपल्या ट्विटमध्ये मोदी यांनी हॅशटॅगसह काँग्रेस नेत्यांचे आरके धवन, सीताराम केसरी, मोतीलाल वोहरा आणि सथीस चरण यांची नावे घेत त्यांची परदेशात संपत्ती असल्याचा ही दावा केला आहे.(Lalit Modi on Rahul Gandhi)
हे देखील वाचा- गेल्या काही वर्षात पुतिन यांना विरोध केलेल्या अनेकांचा रहस्यमय मृत्यू
ललित मोदी यांनी असे म्हटले की, नारायण दत्त तिवारी यांना सुद्ध विसरु नये. त्यांनी असे विचारले की, अखेर तुमच्या सर्वांकडे परदेशात संपत्ती कशी कमलनाथ यांना विचारा…मी पुरावे आणि पत्ता, फोटो सुद्धा पाठवू शकतो.ललित मोदी यांनी अन्य एका ट्विटमध्ये म्हटले की, भारताच्या जनतेला मुर्ख बनवू नका.. गांधी परिवाराला वाटते की, ते देशातील शासनाचे खरे हक्कदार आहेत. मोदी यांनी असे सुद्धा म्हटले की, ते स्वदेशात परत येतील मात्र त्यासाठी कठोर कायद्यांचे पालन करावे लागेल.