Home » डॉ. आफिया सिद्दिकी (Aafia Siddiqui)- पाकिस्तानी आतंकवादाचा भयानक चेहरा

डॉ. आफिया सिद्दिकी (Aafia Siddiqui)- पाकिस्तानी आतंकवादाचा भयानक चेहरा

by Team Gajawaja
0 comment
Aafia Siddiqui
Share

अमेरिकेच्या टेक्सास राज्यात घडलेल्या एका घटनेनं पुन्हा एकदा पाकिस्तानचा अतिरेकी चेहरा समोर आला. यासोबत ‘लेडी अलकायदा’ म्हणून जिचा उल्लेख होतो त्या ‘आफिया सिद्दीकी (Aafia Siddiqui)’ हिच्या नावाचीही चर्चा चालू झाली आहे. 

सध्या ही आफिया अमेरिकेच्या तुरुंगात असून गेल्या आठवड्यात तिच्या सुटकेसाठी मोहम्मद सिद्दीकी याने डलास-फोर्थ वर्थ येथील एका यहूदी सभागृहातून चार यहुदींना बंधक म्हणून ताब्यात घेतले. त्याबदल्यात आपल्या बहिणीला, आफियाला सोडण्याची मागणी केली.  

पोलीसांनी अनेक तासांच्या योजनेनंतर या माथेफिरूला मारुन ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका केली. मात्र यानंतर अमेरिकन सुरक्षा संघटना आफिया सिद्दीकीबाबत अधिक जागृत झाले आहेत. आफिया सिद्दिकी (Aafia Siddiqui) फेडरल मेडिकल सेंटरमध्ये असून तिला तब्बल ८६ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. एवढी शिक्षा होण्यासाठी आफियानं काय केलंय, हे वाचलं की तिच्या खुनशी वृत्तीची कल्पना येते.  

Who Is Aafia Siddiqui and Why Was She Arrested? Attempting to Kill United  States Officers Charges Explained! - PHOOSI

मूळ पाकिस्तानी असलेल्या आफियानं अमेरिकेन विद्यापीठातून ‘न्युरोसाईटीस्ट’ म्हणून पदवी मिळवली आहे. उच्च शिक्षण घेत असताना आफियाचा परिचय कट्टरवाद्यांबरोबर झाला. त्यानंतर आफिया सिद्दिकी हे नाव आतंकवाद्यांच्या यादीत सामील झाले. अमेरिकेच्या मेसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी संस्थेमधून न्यूरोसायन्समध्ये पीएचडी केलेल्या आफियाच्या दहशतवादी कारवाया धडकी भरवणाऱ्या आहेत. केनियामध्ये अमेरिकेच्या दुतावासावर जो हल्ला झाला त्यात तिचा हात होता. 

अमेरिकेत वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर झालेल्या हल्ल्यामुळे अवघे जग हादरले होते. त्यावेळी अमेरिकेच्या संरक्षण विषयक धोरणाला मोठा हादरा बसला होता. त्यामुळे यामागचे गुन्हेगार शोधण्यासाठी एफबीआयनं अनेक संशयितांची चौकशी केली होती. यात आफिया साद्दिकीच्या पहिल्या नवऱ्याचा -अमजद खान याचाही समावेश होता. 

अनेक दिवस अमजद खानला चौकशीला सामोरं जावं लागलं. यातून सुटका झाल्यावर अमजद खान आफिदाला घेऊन पाकिस्तानला परत गेला. तिथे या दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच आफिदाने ९/११ हल्ल्यामागचा मास्टरमाइंड खालिद शेख मोहम्मदचा भाचा, अम्मार अल बलूचीबरोबर लग्न केलं. यानंतर आफिदा गायब झाली.  

Pakistani Prisoner In US Aafia Siddiqui, Whose Release Sought By Armed Man,  Serving 86 Years

अंतर्गत कारवायांमध्ये तिचा समावेश होता. अमेरिकन सैनिक तिचं मुख्य टार्गेट असत. अमेरिकन सैन्यातील अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा आरोप ठेऊन आफिदाला अटक करण्यात आली. तेव्हापासून ती तुरुंगात आहे. तिच्या सुटकेसाठी प्रयत्नही होत आहेत. 

अमेरिकेत निवासास असलेले पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांच्या हत्तेचाही कट आफिसानं रचला होता. याशिवाय २०११ मध्ये झालेल्या मेगोगेट प्रकरणातही आफिसाचे नाव आले आहे. आफिया तुरुंगात असली तरी तिच्या दहशतवादी कारवाया चालू आहेत. कमाल म्हणजे, जेलमध्ये राहून तिने एफबीआय अधिकाऱ्यांच्या हत्येचाही कट रचला होता. 

एफबीआयच्या ‘मोस्ट’ वॉटेंड यादीमध्ये आफियाचे नाव आहे. त्यामुळेच टेक्सासमध्ये ओलीस नाट्य झाल्यावर पुन्हा एफबीआय आफियाच्या तुरुंगातील सुरक्षेतवर भर देत आहेत. आफिया मात्र या सर्वांची मजा घेतेय असे चित्र आहे. तिच्या सुटकेसाठी ओलीस नाट्य झाले, पण तिने तिच्या वकीलांमार्फत या घटनेची निंदा केली आहे. आफियाच्या वकीलांनी या घटनेमध्ये आफिया किंवा तिच्या कुटुंबियांचा हात असल्याची शक्यता साफ फेटाळून लावली.  

हे देखील वाचा: पाकिस्तानमध्ये नवा इतिहास रचणाऱ्या आयशा मलिक (Ayesha Malik) नक्की आहेत तरी कोण?

कोरोना महामारीचा भयानक परिणाम! भारताच्या शेजारचा ‘हा’ देश झाला आहे कर्जबाजारी!

टेक्सासमधील ओलीस नाट्य आत्ता संपले आहे. मात्र यानिमात्ताने डॉ. आफिया सिद्दिकी या अतिजहाल अतिरेकी महिलेची पुन्हा चर्चा सुरु झाली. अमेरिकेच्या लष्करी मोहिमांची आफिसानं कायम निंदा केली आहे. यासंदर्भात तिची कट्टर मतं व्यक्त करीत अमेरिकेच्या धोरणांचा तिने जाहीर निषेध केला आहे. एरवी अतिरेकी संघटना महिलांना फार महत्त्व देत नाहीत. मात्र आफिया सिद्दिका (Aafia Siddiqui) हीचा उल्लेख ‘राष्ट्र की बेटी’ असा करतात. याच आफियाच्या सुटकेसाठी त्यांचे अथक प्रयत्न चालू आहेत. त्यातूनच टेक्सासची घटना झाल्याचे म्हटलं जातंय.

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.