आपल्याला अनेकदा आपले भाबडे मन प्रश्न विचारत असेल की, विमानाने प्रवास किती छान, ट्राफिक नाही, हॉर्न नाही, प्रदूषण नाही, उन्हात फिरायचे नाही, सिंग्नल नाही. फक्त स्वछंदी आकाशात फिरायचे. फक्त आपलेच विमान अखंड आकाशात असते. आकाशातून होणाऱ्या या विमान प्रवासाला ना कोणते नियम आणि ना कोणते कायदे. मात्र असे अजिबातच नाही. विमानातून प्रवास करताना अनेक नियम आहेत. जे आपण जर ऐकले तर आपल्याला देखील आश्चर्य वाटेल की किती अभ्यासपूर्वक हे नियम बनवले आहेत.
आता विमानाने प्रवास म्हणजे अर्थातच आकाशातून आपण पृथ्वी बघणार. सर्वात उंचावरून खाली बघणे म्हणजे फक्त आणि फक्त पृथ्वीचे सौंदर्यच आपल्याला दिसते. यात समुद्र, डोंगर, दऱ्या आदी सर्वच दिसतात. एवढ्या मोठ्या आकाशात फिरताना विमान कधी हरवत नाही. ते बरोबर त्याच्या गंतव्य ठिकाणी पोहचते. त्यासाठी विमानांना आधीच ज्या ठिकाणी जायचे त्यासाठी त्यांचा मार्ग ठरलेला असतो. तो मार्ग पायलटला बदलता येत नाही. मात्र कदाचित तुम्हाला महित नसेल की विमानांना त्यांच्या प्रवासात दोन अशी ठिकाणं आहेत जिथून जाता येत नाही. प्रशांत महासागर आणि हिमालय पर्वत या ठिकाणावरून विमानं उडत नाहीत हे तुम्हाला माहीत आहे का? यामागे एक महत्वाचे आणि मोठे कारण आहे, कोणते ते जाणून घेऊया.
हिमालय पर्वत हा आपल्या देशाचा मुकुट आहे. या पर्वताला अनेक बाजूने महत्व प्राप्त आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी या हिमालय पर्वताचे दर्शन घेत त्याचे सौंदर्य आपण याची देही याची डोळा पाहावे अशी इच्छा असते. हा पर्वत आपण टीव्हीवर, सोशल मीडियावरही अनेकदा पाहतो. मात्र प्रत्यक्ष पाहण्यात वेगळाच आनंद आहे. अनेकदा विमानाने प्रवास करताना वाटते आता जर हिमालय दिसला तर बर होईल.मात्र असे कधीच शक्य होणार नाही. कारण हिमालयावरून आणि प्रशांत महासागरावरून विमान नेण्यावर निर्बंध आहेत. यामागील कारणही तसेच आहे.
हिमालय पर्वतावरून विमान न नेण्याचे मुख्य कारण म्हणजे हिमालयाचे सतत बदलत राहणारे हवामान आणि खराब हवामान. येथील हवामान विमानांच्या उड्डाणासाठी अजिबातच अनुकूल नाही. सतत बदलते हवामान विमानांसाठी अत्यंत धोकादायक असते. विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनुसार हवेचा दाब ठेवला जातो. परंतु हिमालयातील वाऱ्याची स्थिती असामान्य आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
हिमालयाची उंची हे सर्वात मोठे कारण आहे
हिमालय पर्वतावरून विमान न उडण्याचे दुसरे कारण म्हणजे त्याची उंची. हिमालय पर्वताची उंची सुमारे २९ हजार फूट आहे. विमाने सरासरी ३० ते ३५ हजार फूट उंचीवर उडतात. पण हिमालयाची उंची विमानांसाठी धोकादायक आहे. आपत्कालीन परिस्थिती विमानात फक्त २० ते २५ मिनिटे पुरेल एवढाच ऑक्सिजन असतो. या कठीण काळात विमान केवळ ८ ते १० हजार फूट उंचीवरच उडू शकते. जेणेकरून प्रवाशांना श्वास घेण्यात कोणताही त्रास होऊ नये. मात्र या विशाल पर्वतावरून ३० ते ३५ हजार फुटांवरून ८ ते १० हजार फुटांवर फक्त २० ते २५ मिनिटांत येणे शक्य नाही आहे.
हिमालय पर्वत असलेल्या परिसरात कोणतीही नेव्हिगेशन सुविधा नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत विमान एअर कंट्रोलशी संपर्क साधूच शकणार नाही. आपत्कालीन परिस्थितीत, विमानाला कमीत कमी वेळेत नजीकच्या विमानतळावर लँडिंग करावे लागते. मात्र हिमालय पर्वताच्या प्रदेशात दूरवर कोणतेही विमानतळ नाही. यामुळे विमानांना लॅब फिरून जावे लागेल. म्हणून त्यांचा मार्ग हिमालयाच्या वर बनवला गेला नाही आहे.
प्रशांत महासागरावरून विमान का उडत नाही?
विमान कंपन्या अनेकदा आपत्कालीन परिस्थिती हाताळू शकतील अशा ठिकाणाहून टेक ऑफ करतात आणि गरज पडल्यास उतरण्यासाठी जागा उपलब्ध करून देतात. पॅसिफिक महासागर किंवा हिमालय पर्वत रांगांच्या तुलनेत येथे नेव्हिगेशन रडार सेवा नगण्य आहे. अशा परिस्थितीत संपर्क तुटतो आणि विमानाचा रस्ता चुकू शकतो. अशा परिस्थितीत विमान कंपन्या या मार्गांवरून उड्डाण करत नाहीत.