Home » Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Lord Shiv
Share

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा संपूर्ण वर्षातला एकमेव दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा. दिवाळीच्या पंधरा दिवसांनी कार्तिक पौर्णिमा येते. या दिवसाला अनेक अर्थानी मोठे महत्त्व प्रदान आहे. याच दिवशी देव दिवाळी साजरी करतात, कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याचा हा दिवस. यासोबतच कार्तिक पौर्णिमेला देवी देवता काशीला येऊन भगवान शंकरांची पूजा करतात आणि या ठिकाणी दिवे लावले जातात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा असून त्यानंतर दान केले जाते. (Lord Shiva)

अशी मान्यता आहे की, या दिवशी गंगा स्नान केल्याने अक्षय्य पुण्य प्राप्त होते आणि मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी बरेच लोक उपवास करतात आणि सत्यनारायणाची पूजा करतात. या दिवशी भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधत आज आम्ही तुम्हाला भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या एका युद्धाबद्दल माहिती देणार आहोत. हो… भगवान शिव आणि विष्णू यांच्यामध्ये एक मोठे घनघोर युद्ध झाले होते. या युद्धाचे कारण देखील तसेच महत्त्वाचे होते. जाणून घेऊया याच युद्धाबद्दल. (Marathi News)

हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकश्यपूने पृथ्वीवर उत्पात माजवला. त्याने आपली राक्षससेना सज्ज केली. सर्वत्र पृथ्वीवर धुमाकूळ घातला. शक्ती मिळवण्यासाठी मंदार पर्वतावर हिरण्यकश्यपूने खडतर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. ब्रह्मदेवांनी हिरण्यकश्यपूला काय हवे ते विचारले. ‘हे भगवन, तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. ‘ असा वर त्याने ब्रह्मदेवांकडे मागितला. (Todays Marathi HEadline)

Lord Shiv

ब्रह्मदेवांनी त्याला इच्छित वर दिला. हा वर प्राप्त झाल्यावर हिरण्यकश्यपूचे सामर्थ्य वाढले. त्याने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला. त्याच्या उन्मादामुळे सर्व देव त्रस्त झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली. भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा वध मीच करेन असे जाहीर केले. हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा पुत्र होता. प्रल्हाद परम विष्णुभक्त होता. एकदा हिरण्यकश्यपूने प्रल्हादला विचारले, तुला या जगात प्रिय काय आहे? (Top Stories)

प्रल्हादने मला विष्णूचे नामस्मरण सर्वात प्रिय आहे असे सांगितले. या उत्तराने हिरण्यकश्यपू संतापला. त्याने प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून द्या असा आदेश आपल्या सेवकांना दिला. सेवकांनी प्रल्हादाला कड्यावरून फेकून दिले. पण विष्णूंच्या शक्तीमुळे तो वाचला. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्‍न केले. त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले, मोठमोठ्या सर्पांच्या कोठडीत कोंडले, भोजनामध्ये विषप्रयोग केला, त्याला आगीत ढकलले पण या भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने या सर्वांचा काही उपयोग झाला नाही. (Top Trending Headline)

हिरण्यकश्यपूने संतापून विचारले सांग, तो विष्णू कोठे आहे? तेव्हा प्रल्हाद म्हणाला की,हे सर्व जगच नारायणाने व्यापले आहे, जळी स्थळी विष्णू वास करत आहेत. प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकश्यपू गरजला मग या खांबामध्ये आहे का तुझा विष्णू? प्रल्हादाने यावर होकारार्थी उत्तर दिले. हे ऐकताच हिरण्यकश्यपूने त्या खांबावर गदेने प्रहार केला. त्या खांबातून भयंकर आवाज उत्पन्न झाला आणि मनुष्याचे धड तसेच सिंहाचे तोंड असलेला भगवान श्री विष्णूंचा नरसिंह अवतार प्रकट झाला. श्री नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. ही कथा आपणास माहित आहेच. (Top Marathi News)

हिरण्यकश्यपूचा वध करताना भगवान नरसिंह प्रचंड क्रोधीत झाले. हिरण्यकश्यपूचा वध झाला तरी त्याचा राग शांत होईना. त्यांच्या आवाजाने तीन्ही लोक डळमळू लागले. देव भयभीत झाले. त्यांना शांत करण्यासाठी शक्तिशाली अवताराची गरज भासू लागली. परिस्थितीचा अंदाज घेऊन भगवान शंकरानी शरभ अवतार धारण केला. हा शरभ अवतार अद्भुत होता. चेहरा सिंहाचा, आठ पाय, दोन शक्तिशाली पंख, एक हजार सुदृढ हात आणि कपाळी चंद्र असलेला हा भव्य अवतार पृथ्वीवर अवतरला. (Latest Marathi Headline)

पण, या भीषण वृत्तानंतर नरसिंह भगवानाचा राग शांत झाला नाही. त्यांच्या रागामुळे संपूर्ण विश्व घाबरले. ही परिस्थिती पाहून सर्व देवता महादेवांकडे गेले आणि त्यांनी भगवान नरसिंहांचा राग शांत करावा अशी प्रार्थना केली. मग शिवाने प्रथम वीरभद्रला नरसिंह शांत करण्यासाठी पाठवले पण वीरभद्रदेखील त्यांचा राग शांत करु शकले नाही, शेवटी महादेवाने सर्वेश्वराचा अवतार घेतला. (Top Trending News)

=======

Lord Shiva : भगवान शिव आणि विष्णू यांची एकत्र पूजा केले जाणारे भारतातील एकमेव लिंगराज मंदिर

Tripurari Purnima : त्रिपुरारी पौर्णिमेला ‘अशा’ पद्धतीने करा भगवान शिव आणि विष्णू यांची पूजा

=======

शिवच्या या स्वरुपाला शरभ अवतार असेही म्हणतात, ज्यात माणूस, पक्षी आणि सिंह यांचा समावेश होता. सर्वेश्वराच्या अवतारात महादेवाने भगवान नरसिंहाचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. त्यानंतर सलग अठरा दिवस सर्वेश्वर भगवान आणि नरसिंह भगवान यांचे युद्ध चालू होते. या युद्धाचा शेवट नव्हता. जेव्हा नरसिंहांच्या क्रोधाचा काळ कमी होऊ लागला, तेव्हा त्यांना जाणवले की शिवने आपला राग शांत करण्यासाठीच हे स्वरुप घेतलं आहे. मग नरसिंह भगवान शांत झाले आणि श्रीविष्णूमध्ये विलीन झाले. काही पौराणिक कथांनुसार, शिवच्या शरभ अवताराचे रुप फारच भयंकर होते. त्यांच्यासमोर नरसिंह स्वरुपाची शक्ती संपली आणि भगवान नरसिंहाने आत्मसमर्पण केले आणि शांत झाले. (Social News)

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.