कोणतेही चांगले, शुभ काम करायचे असेल, नवीन लहान किंवा मोठी खरेदी करायची असेल तर आपल्याकडे नेहमीच शुभ दिन, शुभ मुहूर्त बघण्याची परंपरा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये मुहूर्ताला खूपच महत्व आहे. एका वर्षांमध्ये जरी अनेक शुभ दिन, शुभ मुहूर्त असले तरी साडे तीन मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्व आहे. असे म्हटले जाते की, या साडे तीन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी शुभ काम करण्यासाठी इतर काहीच पाह्यची गरज नसते. हा पूर्ण दिवसच शुभ आणि लाभदायक असतो. (Muhurt)
या साडे तीन मुहूर्तांबद्दल आपण अनेकदा ऐकले, वाचले आहे. मात्र याबद्दल अधिक माहिती कोणालाच जास्त नसेल. आता येणाऱ्या गुढीपाडव्याचा मोठा आणि पूर्ण मुहूर्त येत आहे, त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया साडे तीन मुहूर्तांबद्दल. कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्याची सुरुवात शुभ मुहूर्तावर केली जाते. कारण या शुभ मुहूर्ताचा संबंध शुभतेशी, लाभाशी जोडला जातो. हिंदू धर्मात असणारे हे साडेतीन मुहूर्त म्हणचे पुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळी पाडवा. यात पुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा हे पूर्ण मुहूर्त तर दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. (Sade Tin Muhurt)
साडेतीन मुहूर्त म्हणजे काय?
साडेतीन मुहूर्त म्हणजे स्वयंसिद्ध मुहूर्त. कोणताही मुहूर्त काढण्यासाठी पंचांग शुद्धी, नक्षत्र, शुद्धी, तारा बल, चंद्र बल पहावे लागते. पण वर्षातले काही दिवस असे असतात की, त्या दिवशी उत्तम तिथी, नक्षत्र आणि योग असा पूर्ण संयोग होतो. या योगावर, या दिवशी कुठलाही वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नसते. तसेच या दिवशी खरेदी केलेली संपत्ती अक्षय राहते, ती घेणाऱ्याला लाभते आणि कायम वृद्धिंगत होते. त्यामुळे हे मुहुर्त साधून सोने चांदी घर वाहन आदी खरेदी आवर्जून केली जाते. (Marathi Latest News)
गुढीपाडवा (GudhiPadwa)
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असतो. गुढीपाडवा हा साडे तीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. याच दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. यादिवशी लोकं नवीन वस्तूंची खरेदी करतात. आपल्या नवीन व्यवसायाचा शुभारंभ करतात. या दिवशी गुढी उभारली जाते. देवदर्शनाला जातात, गोडधोडाचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला जातो. साडे तीन मुहुर्तांपैंकी एक असल्यामुळे गुढीपाडवा या सणाला खूपच विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.(Marathi Trending News)
अक्षय तृतीया (Akshay Trutiya)
अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहुर्तापैकी दुसरा महत्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी सुरु केलेले कार्य, किंवा खरेदी कधी क्षय होत नाही कायम अक्षय राहते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीच क्षय किंवा नाश होत नाही असा दिवस. या दिवशी सुरु केलेल्या कमल मोठे यश मिळते, अशी मान्यता आहे. अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीया या तिथीला येतो. क्षय नसलेली तिथी असल्याने यादिवशी दान- धर्म, खरेदी, नवीन कार्यचा प्रारंभ तसेच जप- तप आदी गोष्टी केल्या जातात. अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक सोने खरेदी करण्यास अधिक प्राधान्य देतात.(Top Stories)
=======
हे देखील वाचा : Shalivahan Shake : जाणून घ्या शालिवाहन शके म्हणजे काय?
Mata Mahishasur Mardine : वाराणसीची माता स्वप्नेश्वरी !
=======
विजयादशमी (Vijayadashmi, Dasra)
दसरा हा सण देखील साडेतीन मुहूर्तापैंकी तिसरा महत्वाचा मुहूर्त आहे. अश्विन महिन्यातील दशमीला विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन तसेच शस्त्रपूजन ही केले जाते. हा दिवस विजयाचा दिवस असल्याने, या दिवशी कोणतेही कार्य मुहूर्त न बघता करता येतात. सोने-चांदी, दागिने, घर, वाहन यांची खरेदी करतात.(Marathi Top News)
बलिप्रतिपदा (Balipratipada)
कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा दिवस देखील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून या दिवसाला मानले जाते. या दिवसाला बलिप्रतिपदा देखील म्हणतात. हा दिवस नवीन कार्याच्या शुभारंभासाठी महत्त्वाचा मानला जातो. सर्व व्यापारी वर्गाचे लोक या दिवशी वही खात्याचे पूजन करतात. यादिवशी सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते. पाडव्याला पत्नी पतीचे औक्षण करते. (Social News)