Home » Vrindavan : जाणून घ्या प्रेमानंद महाराजांना प्रत्यक्ष भेटण्याची प्रक्रिया

Vrindavan : जाणून घ्या प्रेमानंद महाराजांना प्रत्यक्ष भेटण्याची प्रक्रिया

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vrindavan
Share

मधल्या काही काळापासून सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहत आहोत. क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघं अनेकदा प्रेमानंद महाराजच्या दर्शनाला जात असतात. प्रेमानंद महाराज भारतातील प्रसिद्ध संतांपैकी एक म्हणून ओळखले जातात. प्रेमानंद महाराज, राधाराणीचे परम भक्त आहेत, हे वृंदावनचे प्रसिद्ध संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भजन आणि सत्संगामुळे ते देशभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी अनेक भक्त, सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि नेते वृंदावनला येतात. (Marathi News)

प्रेमानंद महाराजांचा आश्रम हा केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. येथे नियमितपणे कीर्तन, भजन, सत्संग यांचे आयोजन केले जाते. आश्रमामध्ये गरजूंसाठी अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, तसेच आरोग्य शिबिरे यांचेही आयोजन केले जाते. महाराज स्वतः भक्तांशी संवाद साधतात, त्यांच्या शंकांचे निरसन करतात. त्यांचे भक्तगण दुरून दूरून प्रवास करून वृंदावनमध्ये केवळ त्यांच्या दर्शनासाठी येतात, महाराजांचे दर्शन घेतात आणि त्यांच्या प्रवचनांमधून प्रेरणा घेतात. अशा प्रकारे, प्रेमानंद महाराज हे आजच्या काळातील एक तेजस्वी संत आहेत. (Todays Marathi Headline)

प्रेमानंद महाराजच्या अमूल्य वचनांचे व्हिडिओ खूपच लोकप्रिय होतात. महाराजांच्या तोंडातून अमृततुल्य वचन प्रत्यक्ष ऐकणे आणि आपल्या समस्यांबद्दल त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची मनसा बऱ्याच लोकांची असते. सामान्य माणसांना प्रेमानंद महाराजांना भेटण्याची इच्छा आहे, मात्र त्यांना माहीतच नाही की, महाराजांना कसे भेटावे? महाराज कुठे असतात? त्यांना भेटण्याची प्रक्रिया कशी आहे? आज या लेखातून आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत. (Top Trending News)

Vrindavan

प्रेमानंद महाराजांना कसे भेटायचे?
हजारो लोक दररोज प्रेमानंद महाराजांची भेट घेतात. प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी आणि प्रश्नोत्तरांसाठी त्यांच्या आश्रमाची एक प्रक्रिया आहे. प्रेमानंद महाराज वृंदावनमध्ये राहतात. महाराज वृंदावनातील प्रेम मंदिराजवळ छटिकारा रोडवरील श्री कृष्ण शरणम नावाच्या सोसायटीत राहतात. जर तुम्हाला रात्री महाराजांचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही दुपारी २:३० वाजता त्यांच्या आश्रमातील श्री राधाकेली कुंज येथे जाऊ शकता. हा आश्रम इस्कॉन मंदिराजवळील परिक्रमा रोडवरील भक्तिवेदांत रुग्णालयाच्या समोर आहे. प्रेमानंद महाराजांचा सत्संग ऐकण्यासाठी तुम्हाला दोन दिवस लागतात. महाराजांचे शिष्य भक्तांना दररोज सकाळी ९:३० वाजता आश्रमात वेगवेगळे टोकन देतात. या टोकनच्या मदतीने तुम्ही दुसऱ्या दिवशी महाराजांना भेटायला जाऊ शकता. (Latest Marathi Headline)

जर तुम्हाला प्रेमानंद महाराजांशी एकांतात बोलायचे असेल तर त्यासाठी तुम्ही वेगळे टोकन घेऊ शकता. टोकन घेतल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता आश्रमात यावे लागते. यामध्ये, तुम्हाला आश्रमात सुमारे एक तास महाराजांकडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. तुम्हाला टोकन मिळाले नाही तरी संध्याकाळी ७:३० वाजता तुम्हाला महाराजांचे दर्शन करता येईल. जर तुम्हाला प्रेमानंद महाराजांना भेटायचे असेल तर सर्वात महत्वाचे आहे की, तुमच्याकडे आधारकार्ड असावे, आधारकार्ड असल्याशिवाय तुम्हाला आत सोडले जाणार नाही. (Top Marathi News)

========

Panar Leopard : ४०० मनुष्यबळी भारतातल्या सर्वात डेंजर बिबट्याचा दरारा!

Lefthanders : जागतिक डावखुरा दिन : जाणून घ्या डावखुऱ्या लोकांबद्दल अद्भुत माहिती

========

दरम्यान प्रेमानंद महाराज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. लहानपणी त्यांचे नाव अनिरुद्ध कुमार पांडे होते. त्यांच्या कुटुंबात आध्यात्मिक वातावरण होते. त्यांचे वडील, आजोबा आणि मोठा भाऊ भगवंताची भक्ती करत असत, याचा प्रभाव प्रेमानंद महाराजांच्या जीवनावर पडला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे पठण सुरू केले. तेराव्या वर्षी त्यांनी ब्रह्मचारी होण्याचा निर्णय घेतला आणि घराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. संन्यास घेतल्यानंतर प्रेमानंद महाराज वाराणसीला गेले, जिथे ते गंगा नदीत दररोज तीन वेळा स्नान करत आणि ध्यान करत. ते दिवसातून एकदाच जेवण घेत. पुढे महाराज वृद्धावनमध्ये आले. वृंदावनमध्ये त्यांनी राधा वल्लभ संप्रदायात प्रवेश केला आणि राधाराणी आणि श्रीकृष्णाच्या भक्तीत आपले जीवन समर्पित केले. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.