Home » Air Defence : भारताने नष्ट केली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम, जाणून घ्या या प्रणालीबद्दल

Air Defence : भारताने नष्ट केली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम, जाणून घ्या या प्रणालीबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Air Defence
Share

दहशतवाद्यांनी २२ एप्रिलला काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर गोळीबार केला आणि त्यात अनेक निर्दोष पर्यटकांचा मृत्यू झाला. या निर्दयी आणि घृणास्पद हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध झाला. याच हल्ल्याचा भारताने ७ मे रोजी बदला घेतला. पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर‘ नावाने एयर स्ट्राईक करत तिथल्या ९ अतिरेकी ठिकाणांना उध्वस्त केले. यात अनेक अतिरेकी देखील ठार झाले. भारताच्या या एयर स्ट्राईकचे सगळ्यांनीच कौतुक केले. मात्र या कारवाईमुळे पाकिस्तानच्या बुडाला मात्र चांगलीच आग लागली. या एयर स्ट्राईकमुळे पाकिस्तानने बेशुट गोळीबार करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले जे भारताने वेळीच निष्प्रभ केले. (Air Defence)

पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, फरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये LoC वर मोर्टार आणि तोफाखानांचा वापर करत हल्ला केला. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्वच हल्ले हाणून पाडले. भारतीय लष्कराने Drone Strike करत थेट लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली. ज्यामुळे पाकला मोठा हादरा बसला आहे. कारण कोणताही हवाई हल्ला रोखण्यात ही सिस्टम अत्यंत महत्त्वाची असते. पण त्याच सिस्टिमला मुळापासून उखडून भारताने पाकिस्तानला हादरवून टाकलं आहे. (Air Defence Radar System)

भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. भारतानं ड्रोनमार्फत पाकिस्तानची HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली उद्ध्वस्त केली आहे. ही प्रणाली पाकला त्यांचा जवळचा मित्र असलेल्या चायनाने दिली होती. हा भारताचा इलेक्ट्रिक वॉर फेअरमध्ये सर्वात मोठा विजय आहे. एअर डिफेन्स सिस्टम अर्थात हवाई संरक्षण यंत्रणा ही अशी यंत्रणा आहे जी हवाई हल्ल्यांपासून रक्षण करण्यासाठी वापरली जाते. यामध्ये अनेक तंत्रज्ञान आणि उपकरणांचा समावेश असतो जे शत्रूच्या हवाई हल्ल्यांना शोधून त्यांना नष्ट करण्यास किंवा त्यांचा प्रभाव कमी करण्यास सक्षम असतात. नक्की एअर डिफेन्स सिस्टिम काय असते? आणि तिचे काम काय असते जाणून घेऊया. (Marathi Trending NEws)

Air Defence

एअर डिफेन्स सिस्टिम म्हणजे काय?
एअर डिफेन्स रडार सिस्टिम ही अतिशय आधुनिक अशी एक तंत्रज्ञान प्रणाली आहे. या प्रणालीचा वापर करून हवाई क्षेत्रातील विविध हालचालींचा शोध घेता येतो. शिवाय या प्रणालीचा वापर करून हवाई क्षेत्राचे निरीक्षण करणे आणि त्याचा तपशील घेणे देखील सुकर होते. या सिस्टीमचा वापर करून हवाई क्षेत्रातील संशायत्मक गोष्टींचा अभ्यास करता येतो. यामुळे शत्रूच्या विमानाचा शोध घेणे सहज सोपे होते. (Marathi Latest News)

या आधुनिक तंत्रज्ञानामुळे देशाचे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण तर होतेच शिवाय हवाई क्षेत्राची सुरक्षा अधिक मजबूत होते. आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा एकमेकांशी जोडलेल्या असतात. यामुळे रडार, मिसाइल आणि कमांड सेंटर्स यांच्यात जलद माहितीची देवाणघेवाण होते. यामुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करणे शक्य होते. भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये आकाश आणि बराक यांसाख्या एअर डिफेन्स रडार सिस्टिमचा वापर केला जातो. (Marathi Top News)

एअर डिफेन्स रडार सिस्टिमचे काम
* रडार सिस्टिम रेडिओ लहरी उत्पन्न करते. या उत्पन्न झालेल्या लहरी हवेतून प्रवास करतात. जर हवेत एखादे विमान, क्षेपणास्त्रे असेल तर त्याला धडकून या लहरी परत येतात. यामुळे तज्ज्ञ व्यक्तीला हवाई क्षेत्रांमध्ये होणाऱ्या हालचालींचा शोध लागतो.

=======

हे देखील वाचा :  Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडकी!

Operation Sindoor : अटलजी यांच्या उत्तराने पाकिस्तानची चांगलीच तंतरली होती

=======

* रेडिओ लहरी परत आल्यावर रडार सिस्टिम प्रतिध्वनींचा अभ्यास करते. यामध्ये वस्तूची दिशा, स्थान, वेग, आणि उंचीबद्दल माहिती मिळते.

* रडार सिस्टिमला प्राप्त झालेला डेटा आणि इतर माहिती संगणाकाद्वारे प्रोसेस केली जाते. यामुळे संशयात्मक हवाई हालचालींबद्दल अचूक निरिक्षण करता येते आणि हल्ल्याची माहिती मिळते. कोणतीही संदिग्ध माहिती मिळाल्यास सिस्टिमद्वारे अलर्ट दिला जातो आणि हवाई हल्ल्यापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी पाऊले उचलता येतात. कमांड सेंटरद्वारे लक्ष्याची पुष्टी केल्यानंतर हल्ल्याचा प्रकार ठरवला जातो आणि मिसाइल, तोफ किंवा इलेक्ट्रॉनिक जॅमिंगद्वारे लक्ष्य नष्ट केले जाते किंवा त्याचा मार्ग बदलला जातो. (Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.