भारतात राहताना लागणारे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे, ‘आधारकार्ड’. भारतात आधारकार्ड म्हणजे आपल्या ओळखीचा आणि निवासाचा एक मोठा पुरावा आहे. देशातील कोणत्याही कोपऱ्यात गेल्यानंतर आधारकार्डचा वापर करून आपण आपले कोणतेही काम करून घेऊ शकतो. आधार कार्ड हे भारत सरकारद्वारे जारी केलेले १२-अंकी अद्वितीय ओळखपत्र आहे, जे बायोमेट्रिक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहितीवर आधारित आहे. यात व्यक्तीच्या बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि चेहऱ्याची प्रतिमा यांसारख्या बायोमेट्रिक माहितीचा समावेश असतो. हे आधारकार्ड अगदी एक दिवसाच्या बाळापासून कितीही वयस्कर असलेल्या व्यक्तीला काढता येणे. भारतात राहत असताना आधारकार्ड बाळगणे आवश्यक आहे. (Aadhar Card)
भारतातील सर्वच व्यक्तींच्या आधार कार्डचे डिझाइन एक सारखेच असते. त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती वगळता आधारकार्डचा फॉरमॅट हा सगळ्यांचा एक सारखाच आहे. मात्र यात एक ‘ब्लु आधार कार्ड’ नावाचा एक प्रकार आहे. हे आधार कार्ड आपल्या सामान्य आधार कार्डपेक्षा जरासे वेगळे असते. हे आधार कार्ड सरकारने खास लहान मुलांसाठी काढले आहे. पण नक्की ब्लू आधार कार्ड म्हणजे काय?, त्याचा उपयोग काय?, हे आधार कार्ड कोण काढू शकते? आदी सर्वच गोष्टींची माहिती जाणून घेऊया. (Top Stories)
सामान्यपणे आधार कार्डसाठी पाच आणि पाचपेक्षा जास्त वयाची व्यक्ती ग्राह्य धरली जाते. मग पाच पेक्षा कमी वय असलेल्या मुलांचे काय? तर अशा ० ते ५ वर्ष वय असलेल्या मुलांसाठी सरकारने ब्लु आधार कार्ड काढले आहे. याच ब्ल्यू आधार कार्डला बाल आधार कार्ड असे म्हटले जाते. ब्लू आधार कार्डला बनवण्यासाठी बायोमेट्रिकची आवश्यकता नसते. ब्लू आधार कार्ड मुलाच्या जन्मावेळी बर्थ डिस्चार्ज सर्टिफिकेट आणि आई वडिलांच्या आधार कार्डनुसार तयार केला जातो. (Blue Aadhar Card)
५ वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांसाठी ब्लू आधार कार्ड बनवण्यात आले आहे. ब्लू आधार कार्ड हे इतर नागरिकांच्या आधार कार्ड पेक्षा थोडे वेगळे असते. या आधार कार्डचा रंग निळा असतो आणि त्यामुळेच त्याला ब्लू आधार कार्ड असे म्हटले जाते. हे ब्लू आधार कार्ड ५ वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांसाठी काढण्यात येते. तसेच वयाचे ५ वर्षे पूर्ण होईपर्यंत हे ब्लू आधार कार्ड वैध असते. यानंतर त्यांची बायोमेट्रिक माहिती अपडेट करावी लागेल. ही माहिती कोणत्याही आधार केंद्रावर जाऊन अपडेट करता येऊ शकते. (Marathi News)

ब्लू आधार कार्डला भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरणद्वारे जारी केले जाते. हा १२ आकड्यांचा युनिक नंबर असतो, हे आधारकार्ड ५ वर्षांखालील मुलांसाठीच बनवला जातो. हे आधारकार्ड बाळाच्या ५ वर्षांसाठीच व्हॅलिड असतं. त्यानंतर या आधारकार्डला अपडेट करावं लागतं. या ब्लू आधार कार्डचा ५ वर्षांनंतर वापर केला जाऊ शकत नाही. या आधारकार्डवर फक्त मुलांचा फोटो असतो. ऑनलाइन ब्लू आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी UIDAI वेबसाइटवर जावं लागतं. यात आधारकार्ड रजिस्ट्रेशनमध्ये मुलांची माहिती देण्यासोबतच आई वडिलांचा नंबर सुद्धा लिहिलेला असतो. रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी एनरोलमेंट सेंटर बुक करावे लागते. (Top Trending Headline)
एनरोलमेंट सेंटरवर पालकांचे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि मुलाचा जन्म दाखला यासारखी आवश्यक कागदपत्रे तपासली जातात. त्यानंतर, आधार कार्ड ६० दिवसांच्या आत जारी केले जाते. ते दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवले जाते. हे आधार कार्ड ५ वर्षांनी अपडेट करावे लागते. (Top Marathi News)
ब्लू आधार कार्ड कसे काढायचे?
– UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्या. (Marathi News)
– ‘माय आधार’ टॅबवर क्लिक करा आणि ‘बुक ॲन अपॉइंटमेंट’ पर्याय निवडा.
– ‘UIDAI द्वारे संचालित आधार सेवा केंद्रावर अपॉइंटमेंट बुक करा’ हा पर्याय निवडा.
– तुमचे शहर निवडा आणि ‘अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करा.
– तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा एंटर करा. ‘Get OTP’ वर क्लिक करा.
– तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका. (Latest Marathi Headline)
– भेटीची तारीख निवडा आणि या तारखेला आधार केंद्राला भेट द्या.
– आधार केंद्रावर, पालकांपैकी एकाला त्यांचे आधार कार्ड आणि मुलाच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत सादर करावी लागेल.
– मुलाचे पासपोर्ट आकाराचे फोटो जमा करावे लागेल आणि मुलाचे आधार कार्ड अर्ज भरावा लागेल.
– नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक एसएमएस प्राप्त होईल.
– काही दिवसांनंतर, बाल आधार कार्ड पोस्टाने पाठवले जाईल किंवा ते UIDAI वेबसाइटवरून ऑनलाइन देखील डाउनलोड केले जाऊ शकते.
========
America VS India : आता भारतीय तांदळावर ट्रम्प नाराज !
========
५ वर्षानंतर आधार कसे अपडेट करायचे?
मुलाचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त असेल, तेव्हा बायोमेट्रिक माहिती बाल आधारमध्ये अपडेट करावी लागते. यासाठी अपॉइंटमेंट बुक करावी लागेल. यानंतर सर्व आवश्यक कागदपत्र घेऊन तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. मुलाचा बायोमेट्रिक डेटा आधार केंद्रावर घेतला जाईल, त्यानंतर हा डेटा मुलाच्या आधार कार्डमध्ये समाविष्ट केला जाईल. ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. बायोमेट्रिक डेटा अपडेट केल्यानंतर मुलाच्या आधार क्रमांकामध्ये कोणताही बदल केला जात नाही. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
