Home » ‘हे’ सोपे उपाय करा आणि मिळवा शांत झोप

‘हे’ सोपे उपाय करा आणि मिळवा शांत झोप

by Jyotsna Kulkarni
0 comment
Insomnia
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी आणि उत्तम शरीर स्वास्थ्यासाठी योग्य झोप खूपच आवश्यक असते. तज्ज्ञांच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ६ ते ८ तासांची झोप प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असते. मात्र कामामुळे आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला ही आवश्यक झोप देखील मिळत नाही. कधी कधी तर झोपच येत नाही आणि अनपेक्षितपणे आपल्याला निद्रानाशाचा त्रास सुरु होतो.

अशावेळेस झोप येण्याच्या गोळ्या देखील दिल्या जातात मात्र या गोळ्या घेणे अजिबातच चांगले नसते. मग काय करावे हा निद्रानाश कसा दूर करावा. तर यासाठी काही घरगुती अगदी छोटे उपाय देखील तुम्ही अवलंबू शकता जेणेकरून निद्रानाश दूर होईल आणि तुमहाला सुखाची शांत झोप लागेल.

तुळशी
तुळशीला धार्मिक महत्व तर आहेच सोबतच तुळशीचा वापर औषध म्हणून देखील केला जातो. तुळशीचा उपयोग आपण सर्दी, खोकला आदी आजारांमध्ये करत असतोच. मात्र तुम्हाला माहित आहे का की तुळशीच्या सेवनाने निद्रानाशाच्या समस्येवर मात करता येते. यासाठी झोपण्यापूर्वी तुळशीच्या पानांचा चहा प्यावा. यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

अश्वगंधा
निद्रानाशासाठी अश्वगंधा हे उत्तम औषध आहे. या वनस्पतीच्या पानांमध्ये फायदेशीर घटक आढळतात. जे निद्रानाश दूर करण्यात मदत करतात. अश्वगंधाचा वापर केल्याने तणावापासून आराम मिळतो. यासाठी एक ग्लास दुधात एक चमचा अश्वगंधा पावडर मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी करा.

कृष्णकमळाचा चहा
कृष्णकमळामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, हायपोग्लायसेमिक, हायपोलिपिडेमिक, वेदनाशामक गुणधर्म आहेत, जे अनेक रोगांवर औषधाप्रमाणे काम करतात. विशेषत: निद्रानाश झालेल्यांसाठी हे वरदानापेक्षा कमी नाही. कृष्ण कमळाचा चहा प्यायल्याने निद्रानाशात आराम मिळतो.

व्हॅलेरियन
१८ व्या शतकापासून निद्रानाश दूर करण्यासाठी व्हॅलेरियनचा वापर केला जात आहे. याच्या सेवनाने निद्रानाशाच्या समस्येत लवकर आराम मिळतो. अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की व्हॅलेरियनच्या सेवनाने निद्रानाशाची समस्या त्वरित दूर होते.

गरम दूध
एक कप गरम दुधामध्ये एक किंवा दीड चमचा दालचिनीची पूड घाला. हे मिश्रण झोपायच्या आधी प्या.

जायफळ
जायफळ हे झोपेचे औषध म्हणूनच ओळखले जाते. झोपण्यापूर्वी एक कप कोमट दुधात जायफळ पूड घालून प्यायल्यास चांगली झोप लागते. याशिवाय एक चमचा आवळाच्या रसात जायफळ पावडर मिसळून दिवसातून किमान तीन वेळा प्यायल्याने देखील लाभ मिळतो.

जिरे
झोप न येण्याचे कारण पोट खराब असणे हे देखील असू शकते. पोटाच्या समस्यांसाठी जिरे फायदेशीर आहे. एका कुस्करलेल्या केळीमध्ये एक चमचा जिरं पूड मिसळा. हे मिश्रण झोपायच्या आधी खा. एक वाटी पाणी गरम करून त्यात भाजलेलं जिरं घाला. झोपेच्या आधी हा चहा प्या.

लेव्हेंडर
झोपायच्या आधी एक कप लेव्हेंडर- टी प्यायल्याने शरीराला आराम मिळतो. यामुळे मानसिक थकवा आणि तणाव कमी होतो. लव्हेंडर ही औषधी वनस्पती मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी देखील कार्य करते.

काळ्या मनुका
काळ्या मनुक्यात भरपूर अॅटी-ऑक्सिडंट, पॉलीफेनॉल, रेस्वेरट्रॉल आढळतात, जे झोपेचे चक्र सुधारते. सेवनाने शरीरातील मेलाटोनिन आणि सेरोटोनिनची पातळी वाढते. ज्यामुळे तुम्हाला रात्री गाढ झोप लागण्यास मदत होते.

केशर
केशरमध्ये सफ्रानल संयुगे असतात, जे शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढवतात. ज्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटते. परिणामी, ताणतणाव कमी झाल्याने गाढ झोप लागते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.