Home » Religious : केवळ काही तासांसाठीच उमलणाऱ्या ब्रह्मकमळाच्या फुलाचे महत्व

Religious : केवळ काही तासांसाठीच उमलणाऱ्या ब्रह्मकमळाच्या फुलाचे महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Religious
Share

फुलं कोणाला आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आपल्याला ताजेताजेलदार वाटावे, आपल्या आजूबाजूचा परिसर प्रफुल्लित, सुगंधित व्हावा यासाठी फुलं अतिशय उत्तम पर्याय आहे. याच फुलांना हिंदू धर्मामध्ये देखील मोठे महत्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक फुलाचे खास महत्व आणि वैशिष्ट्य हिंदू धर्मातील पूजेमध्ये सांगितले जाते. गुलाब, मोगरा, जाई, चाफा आदी अनेक फुलं आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहेत. मात्र यामध्ये अजून एका अतिशय दुर्मिळ आणि अतिशय सुंदर अशा फुलाचा समावेश होतो, ज्याचे नाव आहे ‘ब्रह्मकमळ’. (Marathi News)

अनेकांसाठी हे नाव जरी नवीन नसले तरी बऱ्याच लोकांना या फुलाबद्दल जास्त माहिती नसेल. निसर्गाची अद्भुत किमया म्हणजे ब्रह्मकमळाचे फुल. ब्रह्मकमळाचे झाड हे एक निवडुंगासारखे दिसणारे असते. पण ते खऱ्या अर्थाने निवडुंग नसते. या झाडाला खोड, फांद्या नसतात झाडाच्या पानांनाच काळ्या येतात आणि त्यातून हे सुंदर फुल बहरते. मुख्य म्हणजे ब्रह्मकमळाचे फुल हे वर्षातून एकदाच उमलते आणि ते फक्त चार ते पाच तास फ्रेश राहते. त्यानंतर हे फुल कोमेजण्यास सुरुवात होते. असे मानले जाते की जो कोणी ब्रह्मकमळाचे फूल उमलताना पाहतो, तो खूपच नशीबवान असतो, त्याचे सौभाग्य वाढते आणि ज्या घरात ब्रह्मकमळाचे फूल उमलते तेथे माता लक्ष्मी कायम वास करते. (Todays Marathi Headline)

Religious

पावसाळा हा ऋतू हे ब्रह्मकमळाचे फुल येण्याचा काळ असतो. ब्रह्मकमळ हे फुल सृष्टीचे निर्माता असलेल्या खुद्द ब्रह्मदेवाचे फूल असल्याचे सांगितले जाते. या फुलावर ब्रह्म देव स्वतः विराजमान असतात आणि याच फुलापासून ब्रह्म देव प्रगट झाले असल्याची मान्यता आहे. ब्रह्मकमळ बाबत असे म्हटले जाते की, त्यावर वर्षातून एकदाच काही तास फुले येतात. या फुलाबद्दल असे मानले जाते की भगवान शंकराने ब्रह्मकमळातून गणेशाच्या विच्छेदित मेंदूवर पाणी शिंपडले होते. त्यामुळे या फुलाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. हे फुल महादेवाला विशेष प्रिय असल्याने या फुलाला विशेष महत्व आहे. (Top Marathi Headline)

ब्रह्मकमळाचे फूल घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते. घरातील व्यक्तीची राहिलेली कामे सुरळीत होतात. आर्थिक स्थिती मजबूत होऊन घरात सुख-समृद्धी येते. ही फुले भगवान शंकराला अर्पण केल्यास ते लगेच प्रसन्न होतात. त्याच बरोबर घरामध्ये लावल्यानेही भगवान शंकराची कृपा कुटुंब आणि घर या दोन्हींवर होते. असे मानले जाते की हे फूल उमलताच भाविकांचे नशीब बदलते. (Top Trending News)

काही ठिकाणी ब्रह्मकमळाचे फुल उमलल्यानंतर रात्री अंघोळ केली जाते त्यानंतर हे फुल तोडतात. शंकरास अर्पण करतात. त्यानंतर देवासमोर तुपाचा दिवा लावून शंकराची आरती केली जाते. अनेक लोकं हे फुल मंदिरात देखील वाहतात. हे फुल दिसायला देखील खूपच आकर्षक असते. अतिशय मोठे, पांढरेशुभ्र असणारे ब्रह्मकमळाचे फुल अनेक औषधी गुणधर्मांची देखील ओळखले जाते. थकवा दूर करण्यासाठी, डांग्या खोकला दूर करण्यासाठी आणि कर्करोगावर उपचार करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. (Marathi Latest News)

=========

हे देखील वाचा : Health Care : ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आरोग्यदायी फायदे, मनं आणि तनं राहिल शांत

=========

ब्रह्मकमळाचे फुल हे उत्तराखंड राज्याचे हे राज्यपुष्प म्हणून देखील ओळखले जाते. काही ठिकाणी, ब्रह्मकमळाला लिथोग्राफ करून स्मृतीचिन्ह म्हणून वापरले जाते. हे फूल तीन-चार फुलांच्या गटांमध्ये आढळते. हे पवित्र फूल विविध धार्मिक विधींमध्ये आणि विशेषतः भगवान बद्रीनाथाच्या पूजेत वापरले जाते. ब्रह्मदेवाचे प्रतीक म्हणून ह्या फुलाचे स्थान विशेष आहे. १९८२ साली ह्या फुलाच्या प्रतिमेसह भारत सरकारने एक टपाल तिकीट देखील जारी केले होते. आजही ब्रह्मकमळाचे दर्शन म्हणजे दैवी योग समजला जातो. कारण त्याला पाहण्याचा योग येणे हा एक दुर्मीळ आणि अपूर्व योग मानला जातो. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.