आषाढी एकादशी झाली की, वेध लागतात ते श्रावण महिन्याचे. व्रत वैकल्यांचा महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. या महिन्यात प्रत्येक दिवस काहीतरी खास असतो आणि आपण तो साजरा करतो. हिंदू धर्मियांचा पवित्र महिना म्हणून देखील या श्रावणाला ओळखले जाते. या महिन्यात अनेक लोकं विविध नियम पाळताना दिसतात.
श्रावणात जेवणाचे काही विशिष्ट नियम आपल्याला पाहायला मिळतात. कोणी एक महिनाभर एकच वेळेला जेवतात, कोणी महिनाभर उपवास करतात, कोणी फळंच खातात, कोणी मीठ खात नाही. यात सर्वात जास्त पाळली जाणारी एक बाब म्हणजे बहुसंख्य घरांमध्ये या महिन्यात मांसाहार वर्ज्य असतो. भगवान शंकराला समर्पित असणाऱ्या या महिन्यात बहुसंख्य घरांमध्ये मांसाहार होत नाही. आपण आज जाणून घेऊया श्रावणात नक्की मांसाहार का वर्ज्य असतो?
आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या धर्मात कोणत्या ऋतूमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये हे सुंदर पद्धतीने सांगितले आहे. आपल्या घरात देखील पिढ्यानपिढ्या जेवढे शक्य असतील तेवढे जेवणाचे नियम पळाले जातात. त्यामुळे आजच्या पिढीला देखील याबाबत माहिती असते. आता श्रावणात मांसाहार करू नये याला धार्मिक कारण तर नक्कीच आहे, सोबतच वैज्ञानिक कारण देखील आहे.
श्रावण महिना हा पावसाळ्यात येतो. पावसामुळे आधीच विविध आजारांनी डोके वर काढलेले असते. शिवाय या ऋतूमध्ये सूर्यप्रकाश कमी वेळ असतो किंबहुना तो नसतोच. पावसामुळे वातावरणामध्ये आर्द्रता आणि गारवा वाढलेला असतो. याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपली पचनशक्ती नेहमीपेक्षा अधिक कमी होते.
मांसाहार केल्यानंतर तो पाचला नेहमीपेक्षा जास्तच वेळ लागतो. मग हा मांसाहार सर्वांना केल्यास तो पचायला अधिकच जास्त वेळ लागतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपल्या शरीरात पचनाचे सम अग्नी आणि मंद अग्नी असे दोन प्रकार असतात. सम अग्निमध्ये शरीराला अन्न पचायला ५ ते ६ तास लागतात. तर मंद अग्नीमध्ये अन्न पचायला ७ ते ८ तास लागतात. कमकुवत पचनशक्तीमुळे मांसाहारी अन्न आतड्यांमध्ये तसेच राहून सडण्यास सुरुवात होते.
परिणामी जेवण लवकर न पचल्यामुळे याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो. त्यामुळेच श्रावण महिन्यात या कारणांमुळे मांसाहार टाळला जातो. या दिवसांमध्ये तर अनेक सहकारी पदार्थ खाण्यास देखील मज्जाव केला जातो. त्यामुळे श्रावण महिन्यात जे अन्न शरीराला पचवणे कठीण असते ते खाल्ले जात नाही.
======
हे देखील वाचा : जाणून घ्या श्रावणी सोमवारची ‘ही’ माहिती
======
श्रावण महिन्यात पाण्याचे विविध स्रोत हे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होतात. म्हणूनच या दिवसात मासे न खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रदूषित पाण्यातल्या माशांचे सेवन केल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शिवाय वातावरणात आर्द्रता असल्याने जनावरांवर देखील अनेक संसर्ग असतात. म्हणूनच श्रावण महिन्यात मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो.
याशिवाय यामागील अजून एक महत्वाचे कारण म्हणजे, श्रावण हा प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो. जर या ऋतूमध्ये मांसाहार केला तर त्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. प्रेग्नंट प्राण्यांना खाल्यास त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतात. प्रेग्टनंट जीव खाल्यास हार्मोनल डिस्टरबन्स होते.